खेड्यातील मुलंही कमी नसतात, कराडच्या चारुदत्त साळुंखेची गरुडझेप!

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते देखील इतिहास घडवू शकतात, याचंच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे चारुदत्त साळुंखे! (Charudatta Salunkhe selected as researcher at Bhabha Atomic Research Centre)

खेड्यातील मुलंही कमी नसतात, कराडच्या चारुदत्त साळुंखेची गरुडझेप!
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 3:58 PM

कराड (सातारा) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते देखील इतिहास घडवू शकतात, याचंच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे चारुदत्त साळुंखे! कराडच्या चारुदत्त साळुंखे यांची भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये संशोधक म्हणून निवड झाली आहे. त्यांची अखिल भारतीय स्तरावर झालेल्या GATE 2020 या परीक्षेतून निवड करण्यात आली आहे. त्यांनी सबंध देशातून 48 वा क्रमांक मिळवत ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे नसल्याचे दाखवून दिले (Charudatta Salunkhe selected as researcher at Bhabha Atomic Research Centre).

चारुदत्त साळुंखे मूळचे चाफळ (ता.पाटण जि. सातारा) सारख्या ग्रामीण भागाचे रहिवासी आहेत. त्यांनी आदर्श प्राथमिक विद्यामंदिर कराड येथून प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यांचे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण शिवाजी हायस्कूल कराड येथे झाले. दहावीला ते 94.55 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाले (Charudatta Salunkhe selected as researcher at Bhabha Atomic Research Centre).

चारुदत्त साळुंखे यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या अ‍ॅटॉनॉमस कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली. CoEP कॉलेजमधून शेवटच्या वर्षाला असताना एकाहून एक वरचढ प्रायव्हेट कंपन्यामधून नोकरीच्या संधी हातात असतानादेखील त्यांनी खाजगी क्षेत्रात जॉब न करता शासकीय सेवांत अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अखिल भारतीय स्तरावर झालेल्या GATE 2020 या परीक्षेतून सबंध देशातून 48 वा क्रमांक मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला.

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर

या यशाच्या जोरावरच साळुंखे यांची सबंध देशाच्या टेक्नीकल क्षेत्राला दिशा देणाऱ्या भाभा अनुसंशोधन केंद्राच्या संशोधक पदाच्या मुलाखतीसाठी निवड झाली. तंत्रज्ञान संशोधन म्हणजेच टेक्नीकल रिसर्च इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात भाभा अनुसंशोधन केंद्रातील मुलाखत सर्वात कठीण समजली जाते. सबंध देशातील या क्षेत्रातील तज्ज्ञ मुलाखतकार सर्वोत्कृष्ट अशा संशोधकांची निवड करतात. तब्बल दीड तास चाललेल्या मुलाखतीमधून चारुदत्त साळुंखे यांची संशोधक म्हणून निवड होऊन ते यशस्वी झाले.

दरम्यान, “सबंधित स्पर्धापरीक्षा आणि यातील संधी याविषयी प्रत्येक गरजूला मार्गदर्शन करण्याची माझी तयारी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगू नये”, असं आवाहन चारुदत्त साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना केलं आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल चारुदत्त साळुंखे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.