हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात निघालेल्या राजेंद्र पाटील-यड्रावकरांना पोलिसांनी रोखले

हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात निघालेल्या राजेंद्र पाटील-यड्रावकरांना पोलिसांनी रोखले

आता महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. | Hutatma din in Belgaum

Rohit Dhamnaskar

|

Jan 17, 2021 | 12:10 PM

कोल्हापूर: सीमा लढ्यातील हुतात्म्यांना (Hutatma din) अभिवादन करण्यासाठी बेळगावात निघालेले राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटकच्या सीमेवर अडवण्यात आले आहे. कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांनी त्यांचा ताफा रोखल्याचे समजते. यावेळी राजेंद्र पाटील- यड्रावकर आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर यड्रावकर यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणबाजी केली. त्यामुळे आता महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. (Karnatak Police stop convoy of Rajendra Patil Yadravkar going for paying homage to Hutatma in Belgaum)

आज देशाचे गृहमंत्री अमित शाह बेळगावात येत आहेत. अशावेळी राज्यघटनेनुसार देशाच्या कोणत्याही भागात जाण्याचा सामान्य नागरिकांचा हक्क नाकारला जात आहे. आम्ही कर्नाटक पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करतो, असे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंकडून हुतात्म्यांना अभिवादन

सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी बेळगावसह सीमा भागातील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले. एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, “बेळगाव सीमा भागातील हुतात्म्यांचं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सर्वोच्च बलिदान आहे. बेळगाव आणि सीमा भाग महाराष्ट्रात येईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे शिंदे यांनी म्हटले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण बेळगाव आणि सीमाभागासाठीची न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू. बेळगाव आणि सीमाभाग महाराष्ट्रात येईल, असा आम्हाला विश्वास आहे. सीमा लढ्यात तुरुंगवास भोगल्याने माझा आणि सहकारी सीमा भाग समन्वयक मंत्री छगन भुजबळ यांचं या लढ्याशी भावनिक नातं आहे. आम्ही हुतात्म्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

अमित शाहांचा बेळगाव दौरा, महाराष्ट्र एकीकरण समितीला भेटण्यास नकार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी बेळगावात येणार आहेत. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीने अमित शाहांच्या भेटीची मागणी केली होती. मात्र अमित शाहांनी ही भेट नाकारली आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. त्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने अमित शाहांकडे भेटीसाठीची मागणी केली होती.

संबंधित बातम्या:

बेळगावसाठी 70 हजार पानांचे पुरावे तयार, एन. डी. पाटलांनी रुग्णालयातूनच येडीयुरप्पांना ठणकावलं

अमित शाहांची खिल्ली उडवली, कॉमेडियन थेट पोलीस ठाण्यात

अमित शाहांचा बेळगाव दौरा, महाराष्ट्र एकीकरण समितीला भेटण्यास नकार

(Karnatak Police stop convoy of Rajendra Patil Yadravkar going for paying homage to Hutatma din in Belgaum)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें