धनंजय मुंडे बाजीरावसारखे अजय योद्धे, करुणा शर्मांनी पहिल्यांदाच केले कौतुक
धनंजय मुंडे यांनी नाशिकमध्ये केलेल्या धार्मिक कार्यक्रमांवर करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांना "बाजीरावसारखा अजय योद्धा" म्हटले आहे. त्यांच्या राजकीय हालचाली आणि वाल्मिक कराड यांच्यावरही त्यांनी भाष्य केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी इगतपुरीमध्ये विपश्यना केली होती. त्यानंतर आज धनंजय मुंडे नाशिकमध्ये धार्मिक कार्यक्रमांसाठी दाखल झाले आहेत. नाशिक शहरातील प्रसिद्ध रामकुंडावर धनंजय मुंडे काही धार्मिक विधींमध्ये सहभागी झाले. आता यावर करुणा मुंडेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे बाजीरावसारखे अजय योद्धे आहेत, असे करुणा शर्मा म्हणाल्या.
करुणा मुंडे यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांना धनंजय मुंडे नाशिकमधील कार्यात सहभागी झाले, त्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले. धनंजय मुंडेंचे पद गेलेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काहीही काम नाही. ते शांत राहून पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे काही लोक अशी बातमी पसरवत आहे की धनंजय मुंडे परत मंत्री होणार, पण ते होणार नाही. हे सर्वांना माहिती आहे, असे करुणा शर्मांनी म्हटले.
धनंजय मुंडे बाजीरावसारखा अजय योद्धा
प्रत्येक राजकीय व्यक्ती स्ट्रॅटर्जी प्लॅनर ठेवतो. अगोदर पंकजा ताई डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. पाच वर्षे त्यांच्याकडे काही काम नव्हतं. त्यांनी शिवशक्ती यात्रा काढली. यानंतर त्यांचा ग्राफ वाढत गेला आणि आज त्या मंत्री झाल्या. त्याप्रमाणेच स्ट्रॅटर्जी प्लॅनर असतो. त्या स्ट्रॅटर्जी प्लॅनरचे सांगितलं असेल की असं असं करा. प्रत्येकाची सेम स्ट्रॅटर्जी असते. जे नेगिटिव्ही सुरु आहे, त्यानुसार पॉझिटिव्ह गोष्टी आल्या तर बातम्या तशाच येतात, असेही करुणा शर्मा म्हणाल्या. धनंजय मुंडे अॅक्टिव्ह होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. धनंजय मुंडे बाजीरावसारखा अजय योद्धा आहे, अशा शब्दात त्यांनी धनंजय मुंडेंचे कौतुक केले.
सगळे प्रॉपर्टी विकून बीडच्या विकासामध्ये खर्च करा
यानंतर करुणा शर्मांनी वाल्मिक कराडवरही निशाणा साधला. सरकारच्या निर्णयाचे मी अभिनंदन करते. वाल्मिकची प्रॉपर्टी सर्वांना माहिती आहे की खंडणी जमिनी हिसकावून घेणे, लोकांचे मर्डर, चोरी, दारूचे धंदे आणि कला केंद्र हे सगळे काळे करणारे करून कारभार केलेला आहे. गोरगरीब लोकांचे पैसे खाऊन वाल्मिकने प्रॉपर्टी जमा केलेली आहे. ती सगळी प्रॉपर्टी विकून बीडच्या विकासामध्ये खर्च करा, अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली.
