AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करुणा शर्मांनी दिली धनंजय मुंडे यांना मोठी ऑफर, दुसऱ्या पत्नीसोबत त्यांच्या घरी…

धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊनही त्यांनी अजूनही शासकीय बंगला सोडला नसल्याने वाद निर्माण झालाय. धनंजय मुंडे शासकीय बंगला कधी सोडणार यावरून टीका होत असतानाच करुणा शर्मा यांनी मोठी ऑफर दिली आहे.

करुणा शर्मांनी दिली धनंजय मुंडे यांना मोठी ऑफर, दुसऱ्या पत्नीसोबत त्यांच्या घरी...
karuna sharma dhananjay munde
| Updated on: Aug 13, 2025 | 1:49 PM
Share

धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद जाऊन काही दिवस उलटली आहेत. मात्र, त्यांनी अजूनही शासकीय बंगला सोडला नाहीये. धनंजय मुंडेंनी बंगला सोडला नसल्याने छगन भुजबळ यांना मंत्री होऊनही शासकीय निवासस्थान मिळू शकले नाही. माझ्या मुलीची शाळा मुंबईत आहे आणि माझे आजारपण सुरू असल्याचे कारण मुंडेंची यावर दिले. धनंजय मुंडे यांनी शासकीय बंगला अघ्याप सोडला नसल्याने त्यांच्यावर मोठा दंड लावण्यात आलाय. धनंजय मुंडे हे शासकीय बंगला कधी सोडणार यावरून चर्चा सुरू असतानाच करुणा शर्मा मुंडे यांनी मोठे विधान केले.

करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांचे मुंबईत तीन ते चार घर आहेत. पवई, मलबार हिल आणि सांताक्रूझमध्येही. जर धनंजय मुंडेंना घर नसेल तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत माझ्या घरी यावे. मी त्यांना माझ्या घरात घेईल. पुढे त्या बोलताना म्हणाल्या की, धनंजय मुंडेंसाठी 42 लाख रुपयांचा दंड काहीच नाहीये. धनंजय मुंडे पुन्हा कधीही मंत्री होणार नाहीत, त्यांना त्यांचे आमदारपदही गमवावे लागणार आहे.

न्यायालयाने धनंजय मुंडे यांना 10,000 रुपयांचा दंडही लागू केला आहे. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर उपस्थित केलेल्या प्रश्नाचे करुणा मुंडे यांनी स्वागत केले आहे. करुणा मुंडे म्हणाल्या की, जेव्हा त्यांनी निवडणूक लढवली तेव्हा निवडणूक आयोग धनंजय मुंडेंना पाठिंबा देत होते. करुणा मुंडे म्हणाल्या की, निवडणूक आयोग सत्तेत असलेल्या मोठ्या नेत्यांसाठी काम करते.

आता करुणा मुंडे यांनी दिलेली ऑफर धनंजय मुंडे स्वीकारणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. धनंजय मुंडे यांनी सततच्या टीकेनंतरही सातपुडा हे निवासस्थान रिकामे केले नाहीये. यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. आता धनंजय मुंडे दंड कधी भरणार आणि शासकीय बंगला कधी सोडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तब्येतीचे कारण देत थेट राजीनामा दिला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.