ॲट्रॉसिटी कायद्याचा एवढा दुरुपयोग पाहिला नव्हता, भाजप करुणा शर्मा यांच्या पाठीशी : चंद्रकांत पाटील

भाजप करुणा शर्मा यांच्या पाठीशी आहे. त्यांना न्यायालयात साथ देणे व त्यांच्यासाठी आंदोलन करण्याबाबत भाजप विचार करेल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात माध्यामांशी बोलत होते.

ॲट्रॉसिटी कायद्याचा एवढा दुरुपयोग पाहिला नव्हता, भाजप करुणा शर्मा यांच्या पाठीशी : चंद्रकांत पाटील
karuna sharma chandrakant patil

मुंबई : करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्या गाडीमध्ये पिस्तूल आढळल्यानंतर त्यांच्या गाडीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर करुणा शर्मा यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शर्मा यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तसेच  आज त्यांच्या सांताक्रूझ येथील घरी बीड पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलं. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अ‌ॅट्रॉसिटीचा एवढा दुरूपयोग कधीही पाहिली नव्हता. भाजप करुणा शर्मा यांच्या पाठीशी आहे. त्यांना न्यायालयात साथ देणे व त्यांच्यासाठी आंदोलन करण्याबाबत भाजप विचार करेल, अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Pati) यांनी दिली. ते पुण्यात माध्यामांशी बोलत होते. (karuna sharma is fighting lonely bjp will give full support to her said chandrakant patil)

आंदोलन करण्याबाबत भाजप विचार करेल

“करुणा शर्मा परळी येथे गेल्यानंतर त्यांना गुन्ह्यात गोवण्यात आले. त्यांच्या बनावट आवाजात क्लिप तयार करून व्हायरल करण्यात आली. त्यांच्या गाडीत एक महिला पिस्तूल ठेवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या गाडीच्या चालकावरही अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲट्रॉसिटी कायद्याचा इतका दुरुपयोग कधी पाहिला नव्हता. करुणा शर्मा एकट्या लढत आहेत. अशा स्थितीत भाजपा करुणा शर्मा यांच्या पाठीशी राहील. त्यांना न्यायालयात साथ देणे व त्यांच्यासाठी आंदोलन करण्याबाबत विचार करेल,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

 बीड पोलिसांकडून करुणा शर्मा यांच्या सांताक्रूझमधील घरी सर्च ऑपरेशन 

बीड पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या करुणा शर्मा यांच्या सांताक्रूझ येथील घरी बीड पोलिसांनी आज सर्च ऑपरेशन केलं. करुणा शर्मा यांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय. मात्र त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी आज बीड पोलिसांनी तब्बल 4 तास सर्च ऑपरेशन केलं. डीवायएसपी सुनील जायभाये यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. करुणा शर्मा यांच्या गाडीत त्या परळीत गेल्या असताना पिस्तुल सापडलं होतं. त्यानुसार त्या गाडीच्या चालकावर गुन्हाही दाखल आहे. शिवाय करुणा यांच्यावर अ‌ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पिस्तुलाशी संबंधित दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने घराच्या तपासणीसाठी ही टीम पाठवल्याचं बीडच्या एसपीनी सांगितलंय. त्यामुळे या सर्च ऑपरेशनमधून बीड पोलिसांच्या हाती नक्की काय लागले आहे हे पाहणं महत्वाचं आहे.

इतर बातम्या :

सरसकट युती किंवा आघाडी करणार नाही, नवाब मलिक यांचं मोठं विधान; राष्ट्रवादीही ‘स्वबळा’च्या मूडमध्ये?

राणेंना चिपी विमानतळाचं श्रेय घेण्याचा अधिकार नाही, फुशारक्या मारताना भान ठेवा; विनायक राऊतांचा जोरदार हल्ला

प्रताप सरनाईकांचे अनधिकृत बांधकाम, 21 कोटींचा दंड वसूल करा; सोमय्यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

(karuna sharma is fighting lonely bjp will give full support to her said chandrakant patil)

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI