कसबा निवडणूक हरले, देवेंद्र फडणवीस संतापले, म्हणाले… एखादा निकाल लागला म्हणून…

पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड येथे झालेल्या पोटनिवडणूक भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवून हा सामना बरोबरीत राखला. कसबा पेठ येथील निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव करून कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला.

कसबा निवडणूक हरले, देवेंद्र फडणवीस संतापले, म्हणाले... एखादा निकाल लागला म्हणून...
DEVENDRA FADNAVIS AND NANA PATOLE Image Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 7:37 PM

मुंबई : पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड येथे झालेल्या पोटनिवडणूक भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवून हा सामना बरोबरीत राखला. कसबा पेठ येथील निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव करून कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला. तर चिंचवड येथे भाजपच्या अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादीच्या नाना काटे यांचा पराभव केला. याचे पडसाद विधानसभेत उमटले. काँग्रेसचे नाना पटोले यांनी हा मुद्दा छेडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचले. त्यामुळे फडणवीस यांच्या संतापाचा पारा चढला.

विधानसभेच्या कामकाजाची सुरवातच संजय राऊत यांच्या ‘त्या’ विधानावरून झाली. अध्यक्षानी हक्कभंग समितीचीच सदस्यांची नेमणूक करण्याची घोषणा सभागृहात केली त्याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हरकत घेतली. एकीकडे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये खडाजंगी होत असतानाच दोन्हीकडील सदस्यांचे लक्ष कसबा आणि चिंचवड येथील निकालाकडे लागले होते.

हे सुद्धा वाचा

कसबा येथे काँग्रेस आणि चिंचवड येथे भाजप जिंकत असल्याचा कल येऊ लागला. विधान परिषद निवडणुकीत भाजपला नागपूर आणि अमरावतीची जागा गमवावी लागली. तर, भाजपचा गेल्या ३० वर्षांपासून असलेला कसबा हा बालेकिल्लाही ढासळला. यावरून नाना पटोले यांनी फडणवीस यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.

कसबा येथे भाजपचा ११ हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे भाजपाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. तर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे काँग्रेसचे निवडून आलेले नवे सदस्य रविंद्र धंगेकर यांना सभागृहात जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी करत चांगला टोला लगावला.

नाना पटोले यांच्या या टोल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा संताप वाढला. नाना एखादा निकाल लागला म्हणून तो सभागृहात सांगण्याची गरज आम्हाला लागत नाही. कसबा येथील जो काही कौल आला त्याचे आम्ही थोडे आत्मचिंतन करु.

फक्त कसबाचा निकाल पाहू नका. तीन राज्यांचा निकाल पहा. तिथे काँग्रेस दिसतही नाही. त्यामुळे थोडे आत्मचिंतन तुम्हीही करा, त्याची काळजी तुम्ही करा, असा प्रतिहल्ला फडणवीस यांनी केला.

नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या वादात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत निवडणुकीचा निकाल अधिकृत जाहीर केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र उमेदवारांना दिले जाते. निवडणूक आयोगाने तशी अधिकृत माहिती कळविल्यानंतरच नव्या सदस्यांच्या जागेची व्यवस्था नक्की केली जाईल, असे आश्वस्त केले.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.