Ketan Agarwal Murder Case : सोनमला ‘गुरु’ मानायची सिया! होणाऱ्या नवऱ्याला मारण्यासाठीच फॉलो केल्या अनेक स्टेप्स

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल याच्या हत्येनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. या भयानक हत्याकांडानंतर पोलीस सर्वच पैलूंनी तपास करत आहेत. पण सिया हिने केतन याला कसं मारलं याची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर दोघांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Ketan Agarwal Murder Case : सोनमला गुरु मानायची सिया! होणाऱ्या नवऱ्याला मारण्यासाठीच फॉलो केल्या अनेक स्टेप्स
| Updated on: Jun 24, 2026 | 11:54 AM

Ketan Agarwal Murder Case : गेल्या काही दिवसांपासून मारहाण, वाद यांमुळे होणाऱ्या हत्येचं प्रमाण वाढत आहे. पण जे जोडपे सोशल मीडियावर अनेकांना कपल गोल्स देत होते, त्याचं आयुष्यातील वास्तव तर भयानक असल्याचं समोर आलं. एकीकडे राजा रघुवंशी तर दुसरीकडे केतन अग्रवाल… एकाचं लग्न झालं होतं, तर दुसऱ्याचं होणार होतं… राजा याला पत्नी सोनम हिने डोंगरावरन खाली ढकललं आणि स्वतःगायब असल्याचं भासवलं. तर दुसरीकडे, केतन यांचं सिया हिच्यासोबत लग्न होणार होतं. पण त्याआधीच सिया हिने बॉयफ्रेंड चेतन याच्या मतदीने केतन याची हत्या केली… सांगायचं झालं तर, इंदूरमधील गाजलेल्या ‘सोनम रघुवंशी’ प्रकरणाची चर्चा शमते न शमते तोच, महाराष्ट्रातील पुण्यात घडलेल्या एका घटनेने लोकांसमोर पुन्हा एकदा एक अस्वस्थ करणारा प्रश्न उभा केला: प्रेमापोटी कोणावर तरी विश्वास ठेवणं हीच आता सर्वात मोठी जोखीम ठरत आहे का? पुण्यातील केतन अग्रवाल या तरुण व्यावसायिकाच्या मृत्यूकडे सुरुवातीला केवळ एक अपघात म्हणून पाहिले गेलं होतं. पण सत्य फार भयानक होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, लोहगड किल्ल्यावर फोटो सेशन करत असताना 350 ते 400 फूट खोल दरीत केतन पडला… असं सिया हिने पोलिसांनी सांगितलं. पण गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिसांच्या तावडीतून सूटत नाही. प्रकरणाची चौकशी सुरु केल्यानंतर जे सत्या पोलिसांकडून समोर आलं, ते भयानक होतं… पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, ज्या सिया हिच्यासोबत केतन सप्तपदी घेणार होता, त्याच सियाने होणाऱ्या पतीची हत्या केली. सिया हिने बॉयफ्रेंड चेतन याच्या मतदीने केतन याची हत्या केली…
पहिले राजा, आता केतन… एकसारखी कहाणी…

जेव्हा पुणे पोलिसांनी सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांना अटक केली, तेव्हा सोशल मीडियावरील लोकांना लगेचच सोनम रघुवंशीचे नाव आठवलं. यामागे देखील मोठं कारण आहे, केवळ एवढंच नव्हतं की दोन्ही प्रकरणांमध्ये बॉयफ्रेंडचा सहभाग होता; तर त्यामागचं मुख्य कारण म्हणजे या दोन्ही घटनांमधील तपशील एकमेकांशी हुबेहूब जुळणारं वाटत होतं. दोन्ही प्रकरणांमध्ये, प्रेम, हास्य, आणि आनंद दर्शवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले.

सोशल मीडियावर व्यक्त केलं दुःख

केतन याच्या निधनानंतर सिया हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं… ‘मझ्या मनाला माहिती आहे, तू अद्यापही येथेच आहेस…’, तेव्हा सिया हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, असं अनेकांना वाटलं. तिची पोस्ट देखली सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. आता लोक विचारत आहे की, ते दुःख होतं की फक्त एक नाटक होतं?

एक प्रश्न जो दोन्ही प्रकरणांमध्ये उपस्थित होत आहे…

राजा रघुवंशा याच्या हत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले, आता केतन याच्या मृत्यूनंतर देखील, तेच प्रश्न पुन्हा विचारण्यात आले आहेत. ‘जर कोणत्या नात्यात राहायचं नाही… जर मन बदललं असेल, जर कोणी आवडत नसेल… तर थेट हत्या हाच एक मार्ग आहे का?’ कायदेतज्ज्ञांच्या मते, अशा प्रकरणांमध्ये सर्वात भयावह बाब म्हणजे केवळ झालेली हत्या नव्हे, तर त्यामागील कट-कारस्थान; कारण नियोजनाचा अर्थच असा होतो की, विश्वासाचा वापर एक शस्त्र म्हणून करण्यात आला.

Follow Us