AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रशांत किशोर यांच्याबद्दल तटकरे पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. यावर प्रतिक्रिया देताना आता तटकरे यांनी मोठं विधान केलं आहे.

प्रशांत किशोर यांच्याबद्दल तटकरे पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...
Sunil TatkareImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 07, 2026 | 5:52 PM
Share

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. दरम्यान त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी या भेटीबद्दल मोठं विधान केलं आहे. प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हे मलाच माहिती नाही, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले तटकरे? 

प्रशांत किशोर यांना राजकीय सल्लागार नेमल्याची माझ्याकडे माहिती नाही, पण जर त्यांची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाली असती तर मला त्याची नक्की माहिती असती. दुसरं महत्त्वाचं म्हणजे राज्य नेतृत्वामध्ये त्यांचा सल्ला वगैरे याचा काही प्रश्नच येत नाही. कारण आम्ही एनडीएमध्ये सहभागी होत असताना सर्वांनी मिळून हिरहिरीने तो निर्णय घेतला. तो निर्णय घेतल्यानंतर तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत आम्ही पाहिली, त्यातून आम्हाला यश प्राप्त झालं. त्यामुळे पक्षात दोन मतप्रवाह वगैरे वगैरे ही चर्चा गैरवाजवी आहे, त्यामध्ये वेगळा अर्थ असण्याचं काही कारणच नाही, असं यावेळी तटकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, माझ्याबद्दल नाराजगी आहे, अशा तुमच्या ज्या काही बातम्या सांगतात, त्यामुळे तुमचं सूत्र काय सांगतं ते मला माहिती नाही, पण मला माझं गोत्र माहीत आहेना. अख्खा महाराष्ट्र ज्या नेत्यांनी पालथा घातला, त्या मोजक्या नेत्यांपैकी मी एक आहे. मी सलगपणे राज्यातील मतदारसंघ सांगू शकतो, मला सगळी माहिती आहे. त्यामुळे कोणाला काय वाटतं? इतपत विचार करण्यासारखी सध्याची स्थिती नाहीये. मी 41 वर्ष राजकारणात आहे. माझी राजकारणाची सुरुवात ही काँग्रेसचा रोहा तालुका सरचिटणीस म्हणून 1985 ला झाली. मला 85 साली विधानसभेचं तिकीट मिळालं. त्यामुळे माझा 41 वर्षांचा राजकीय प्रवास असाच झालेला नाहीये. मी सलग 41 वर्षीय राजकीयदृष्ट्या अति संवेदनशिल असलेल्या जिल्ह्यात काम करत आहे, म्हणजे थोडं फार काही तरी असेलच ना? असं यावेळी सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...