AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Murder : केतनला संपवणाऱ्या सिया गोयल हिला मोठा धक्का, जवळच्या लोकांनीच…. चक्रावणारी अपडेट समोर

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्याकांडात प्रमुख आरोपी असलेल्या सिया गोयल हिच्या अटकेनंतर पहिल्यांदाच तिच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 18 जूनला लोहगडावरून पडून केतनाचा मृत्यू झाला, याप्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत.

Ketan Agarwal Murder : केतनला संपवणाऱ्या सिया गोयल हिला मोठा धक्का, जवळच्या लोकांनीच.... चक्रावणारी अपडेट समोर
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयलला मोठा धक्का
| Updated on: Jun 26, 2026 | 11:55 AM
Share

पुण्यातील प्रसिद्ध बिझनेसमन विशाल अग्रवाल यांचा तरुण मुलगा केतन अग्रवाल याचा लोहगडावरून पडून मृत्यू झाला. आधी अपघात वाटणाऱ्या या केसमध्ये नंतर मोठा ट्विस्ट आला. केतनची होणारी पत्नी सिया हिनेच तिच्या मित्रासह मिळून केतनला संपवण्याचा प्लान आखला आणि 18 जूनला त्याला लोहगडावरून धक्का दिला. शेकडो फूट खोल दरीत कोसळल्यामुळे केतनचा जीव गेला. या घटनेने फक्त पुणे, अथवा राज्यालाच नव्हे तर अख्खा देशाला हादरवलं आहे. सध्या सिया गोयल आणि तचा प्रियकर चेतन चौधरी अटकेत असून त्यांना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. सियाच्या अटकेनंतर घरच्यांना मोठा धक्का बसला असून तिचे वडील, प्रवीण गोयल हे सध्या रुग्णालयात दाखल आहेत. याच दरम्यान सियाला आता मोठा धक्का बसला आहे, कारण तिच्या जवळच्या लोकांनीच या केसमध्ये मोठी मागणी केली आहे.

केतनच्या मृत्यूनंतर सियाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते केतनबद्दल भरभरून बोलले, त्याचं खूप कौतुकही केलं आणि या केसमधील दोषींना सोडू नका, त्यांना कठोर शिक्षा करा अशी मागणी त्यांनी केली.

काय म्हणाले प्रवीण गोयल ?

हॉस्पिटलमध्ये असूनही सियाच्या वडिलांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “ही अत्यंत दुःखद घटना आहे. केतन गेलाय, यावर विश्वास ठेवणं अजूनही मला कठीण जात आहे. अग्रवाल कुटुंबाने आपला मुलगा गमावला, पण केतनवर त्यांचं जेवढं प्रेम होते, त्याहून अधिक प्रेम मी त्याच्यावर करत होतो. माझा त्याच्याशी इतका जिव्हाळा निर्माण झाला होता की, मी त्याला माझ्या स्वतःच्या मुलासारखेच मानू लागलो होतो. अशा एका उत्तम मुलाला गमावल्यामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे.” असं म्हणत गोयल यांनी शोक व्यक्त केला.

माझी मुलगी दोषी असेल तर

या केसमध्ये सियाला अटक केल्यावर, तिचं नाव समोर आल्यावर त्यांना मोठा धक्का बसला आहे. ” या दुर्दैवी घटनेबाबत एकमेव दिलासा तेव्हाच मिळेल, जेव्हा दोषीला शक्य तितकी कठोर शिक्षा होईल. ज्याप्रमाणे आमचा केतन त्या किल्ल्यावरून खाली पडला, त्याचप्रमाणे या हत्येसाठी जो कोणी दोषी असेल, मग ती माझी स्वतःची मुलगी का असेना, ती दोषी असेल तर तिलाही त्याच ठिकाणावरून खाली ढकलून दिले पाहिजे.” अशी मागणी त्यांनी केली.

लग्न ठरल्यावर सिया खुश होती

” अग्रवाल कुटुंबावर जे मोठं संकट ओढवलं आहे; यापेक्षा अधिक दुःखद घटना दुसरी असूच शकत नाही, असं एक वडील म्हणून मी सांगेन,” असं ते म्हणाले. ” केतन सियाच्या लग्नाबाबत आमच्या खूप अपेक्षा होत्या. हे नातं जुळल्यापासून सिया खूप आनंदी होती. ती म्हणायची, ‘केतन खूप छान आहे; मला खूप चांगलं सासर आणि नणंद मिळाली आहे. मी खूप आनंदी आहे ” असा दावा सियाच्या वडिलांनी केला. सियाबाबत काही गोष्टी लपवून ठेवल्या असा आरोप केतनच्या वडिलांनी केला होता, त्यावरही सियाचे वडील स्पष्ट बोलले – काही गोष्टी माहिती असत्या, तर आम्ही ते सांगितसं असतं, तर कदाचित आचा दिवस पहावा लागला नसता.

सिया- चेतनच्या प्रेमसंबंधांबद्दल काय म्हणाले वडील ?

चेतनसोबतच्या आपल्या मुलीच्या संबंधांबद्दल बोलताना सियाचे वडील प्रवीण गोयल म्हणाले, “आम्हाला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. सिया ही 19 वर्षांची एक साधी-भोळी मुलगी आहे; 19 वर्षांची मुलगी खरोखरच असं काही करू शकते का? चेतन कुठून आला होता, याची मला काहीच कल्पना नाही; मी त्याचा चेहरा कधी पाहिला नव्हता किंवा त्याच्याशी कधी बोललोही नव्हतो. आम्ही त्याचं नावही यापूर्वी कधी ऐकलं नव्हतं.” असा दावा गोयल यांनी केला.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?