Ketan Agarwal Murder : 400 फूट खोल दरीत ढकलल्यानंतर केतनची बॉडी कशी होती? रेस्क्यू टीमच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं धक्कादायक…
पुण्यातील केतन अग्रवालच्या लोहगड हत्याकांडाने देश हादरला आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी त्याला 400 फूट खोल दरीत फेकले. रेस्क्यू टीमने मृतदेहाची धक्कादायक अवस्था सांगितली: डोक्याला गंभीर दुखापत, हात-पायांवर खोल घाव. मृतदेह काढणे आव्हानात्मक होते. विशेष म्हणजे, होणाऱ्या नवऱ्याचा मृत्यू समोर असूनही सियाच्या चेहऱ्यावर कोणतेही दुःख नव्हते, जी पोलिसांना संशयास्पद वाटली.

पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल याची 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर हत्या करण्यात आली. त्याची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी केतनला 400 फूट खोल दरीत फेकून दिलं. त्यात केतनचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर असंख्य गोष्टी समोर आल्या आहेत. पोलिसांनी आरोपींनाही पकडलं असून त्यांनी कबुलीही दिली आहे. पहिल्यांदाच प्रत्यक्षदर्शींनी 400 फूट खोल पडल्यानंतर केतनची बॉडी कशी होती? याची माहिती दिली आहे.
एका वृत्तवाहिनीशी रेस्क्यू टीमचे सदस्य सुनील गायकवाड यांनी या घटनेची माहिती दिली. लोहगड किल्ल्यावर पोहचल्यावर आम्हाला एक मुलगा दरीत पडल्याचं कळलं. त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याचंही समजलं. जेव्हा आम्ही डेडबॉडी जवळ जाऊन पाहिलं तेव्हा त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती. त्याच्या डोक्याला सर्वात मोठा मार लागलेला होता. त्याचं डोकं फुटलं होतं. दबलेलं होतं. त्याच्या डोक्यावरच मोठा वार झाला असावा किंवा तो डोक्यावर आपटला असावा असं वाटत होतं. या शिवाय त्याच्या हाताला आणि पायालाही जबर मार लागलेला होता. त्याच्या हातापायावरील खोल घाव स्पष्टपणे दिसत होते, असं सुनील गायकवाड यानी सांगितलं.
बॉडी आणणं कठीण झालं…
किल्ल्याच्या भौगोलिक स्थितीमुळे मृतदेह बाहेर काढणं कठीण होतं. हे आव्हानात्मक काम होतं. आम्हाला बरंच वर चढून जावं लागलं. त्या ठिकाणी उतार अधिक होता. शिवाय खडी होती. त्यामुळे बॉडी बॅगमध्ये त्याचं शरीर पॅक करून सुरक्षित वर आणण्यात आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या, असंही सुनील गायकवाड म्हणाले.
पुणे ग्रामीण पोलीस ठाण्याकडून रेस्क्यू टीमला सकाळी 10.30 वाजता फोन आला होता. त्यानंतर रेस्क्यू टीम लगेच घटनास्थळी गेली. सर्व अडचणींचा सामना करत आम्ही 11.30 वाजेपर्यंत आमचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलं. दुपारी 12.30 ते 1.30 पर्यंत कायदेशीर कारवाई पूर्ण करून मृतदेह रुग्णवाहिकेकडे सोपवला, अशी माहितीही त्यांनी दिली.
सर्व रडत होते, पण…
या प्रकरणात पोलिसांना सियाच्या हावभाववरूनच हत्येची कुणकुण लागली होती. रेस्क्यू टीमनेही त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. जेव्हा दरीतून केतनचा मृतदेह काढला जात होता. तेव्हा त्या ठिकाणी प्रचंड गर्दी जमा झाली होती. केतनला ओळखणारे लोक, त्याचे नातेवाईक किंचाळत होते, रडत होते, हंबरडा फोडत होते. सिया पण घटनास्थळी उपस्थित होती. आमच्या काही लोकांनी तिला जवळून पाहिलं. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण बाकीच्या रडणाऱ्या लोकांच्या तुलनेत ती अत्यंत शांत होती. आपल्या होणााऱ्या नवऱ्याचा इतका भयानक अंत झाल्यानंतरही ती रडत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. दु:ख नव्हते आणि भीतीही दिसत नव्हती. ती अत्यंत शांत डोक्याने सर्व काही पाहत होती, असं गायकवाड म्हणाले.
