‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबियांवर मोठा आरोप

Ketan Agrawal Case : आज केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत लग्न जमवणाऱ्या मित्तल कुटुंबावर मोठे आरोप केले असून त्यांची चौकशीची मागणी केली आहे.

सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं, केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबियांवर मोठा आरोप
Vishal Agrawal on Mittal Family
Image Credit source: Google
| Updated on: Jul 17, 2026 | 3:55 PM

पुण्यातील लोहगडावर केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आली आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीने ही हत्या केल्याचे समोर आले आहे. अशातच आज केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत लग्न जमवणाऱ्या मित्तल कुटुंबावर मोठे आरोप केले असून त्यांची चौकशीची मागणी केली आहे. विशाल अग्रवाल यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

मित्तल कुटुंबियांवर गंभीर आरोप

विशाल अग्रवाल यांनी म्हटलं की, मित्तल यांनी आम्हाला शब्द देवून लग्न जमवलं होत, मुलगी संस्कारी आहे अस सांगितलं होत. त्यांना सिया अशी आहे हे माहिती असताना पण त्यांनी लग्न जमवल. त्यांनी हे षडयंत्र केल असावं असा आरोप विशाल अग्रवाल यांनी केला आहे. अजून एक केतन जाऊ नये हीच मागणी आहे. जर मुलगा मुलगी पसंद नसेल तर नाही म्हणून सांगा. मात्र कोणाचा खून करू नका. आज मला न्याय हवा आहे. फास्ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवलं जावं. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. माझे नातेवाईक नरेंद्र मित्तल यांनी पण त्यांनी असं का केल असाव हा सवाल आहे. त्यांची चौकशी व्हायला हवी.

आरोपींना शिक्षा मिळावी

पुढे बोलताना विशाल अग्रवाल यांनी म्हटलं की, ‘मी माझ्या मुलाच 26 वर्षे पालन पोषण केलं. असं कुणासोबतही होऊ नये. माझी न्यायव्यवस्थेकडे अशी मागणी आहे की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी. ही शिक्षा लवकरात लवकर मिळावी. या प्रकरणात आणखी काही आरोपी असतील तर त्यांनाही शिक्षा मिळावी. मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मी पंतप्रधानांना पत्र लिहून एवढीच मागणी केली आहे की, लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा मिळाली पाहिजे.

सिया गोयलला फसवलं जात असल्याचा दावा तिच्या पालकांकडून केला जात आहे, त्यामुळे तिला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? या प्रश्नावर विशाल अग्रवाल यांनी सांगितलं की, ‘मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे की आरोपींना 100 टक्के शिक्षा मिळेल. माझी मागणी हीच आहे की त्यांना लवकरात लवकर शिक्षा मिळावी.’

सियाच्या पालकांवरही भाष्य

एकीकडे सियाचे पालक ती दोषी असेल तर लोहगडावरून ढकलून द्या असं म्हणत आहेत आणि दुसरीकडे तिला वाचवण्यासाठी वकील बदलले जात आहेत, त्यांची ही भूमिका दुटप्पीपणा आहे का? या प्रश्नावर बोलताना विशाल अग्रवाल यांनी सांगितले की, 100 टक्के हा दुटप्पीपणा आहे, जर त्यांना एखाद्या गोष्टीवर विश्वास नसेल तर त्यांनी न्यायालयाकडून तपासणी करायला हवी. तसेच मित्तल कुटुंबीय हे लग्न जमवणारे होते, त्यांचीही पोलीस चौकशी व्हायला हवी.

Follow Us