AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : आधी आगरकरांचा निर्णय, नंतर बीसीसीआय पदाधिकारी जे वागले ते रोहित शर्माला नाही पटलं, नेमकं घडलं काय?

Rohit Sharma : 2023 मध्ये अपूर्ण राहिलेलं स्वप्न 2027 मध्ये पूर्ण करण्याचा त्याने ध्यास घेतलेला. त्यासाठी रोहित मेहनत घेत होता. पण रोहित शर्माचं हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता नाहीय.

Rohit Sharma : आधी आगरकरांचा निर्णय, नंतर बीसीसीआय पदाधिकारी जे वागले ते रोहित शर्माला नाही पटलं, नेमकं घडलं काय?
Rohit Sharma Image Credit source: PTI
| Updated on: Jul 17, 2026 | 3:56 PM
Share

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूचं वर्ल्ड कप खेळणं स्वप्न असतं. रोहित शर्माही याला अपवाद नाही. भारतीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने भरपूर योगदान दिलं आहे. दीर्घकाळ त्याने भारतीय क्रिकेटची सेवा केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2023 वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण दुर्देवाने हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. ऑस्ट्रेलियन टीमने भारतीय क्रिकेट संघाचं वनडे वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न उधळून लावलं. त्यानंतर पुढच्याच वर्षी रोहितच्या नेतृत्वाखाल टीम इंडियाने टी20 चा वर्ल्ड कप दुसऱ्यांदा जिंकला. टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहितने टी20 मधून निवृत्ती जाहीर केली. काही काळाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला. पण रोहित शर्मा वनडे क्रिकेट खेळत होता.

2023 मध्ये अपूर्ण राहिलेलं स्वप्न 2027 मध्ये पूर्ण करण्याचा त्याने ध्यास घेतलेला. त्यासाठी रोहित मेहनत घेत होता. पण रोहित शर्माचं हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता नाहीय. टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टी20 सीरीजमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर वनडे सीरीज सुरु आहे. याच मालिकेतील लॉर्ड्सवर होणारा शेवटचा वनडे सामना रोहितच्या करिअरमधील लास्ट वनडे मॅच ठरु शकते. त्यानंतर रोहितला पुन्हा संधी मिळणार नाही. त्याला निवृत्ती स्वीकारावी लागेल. सध्या या अशा बातम्या सुरु आहेत. पण रोहितने त्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही.

त्यामुळे रोहित निराश

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार रोहित शर्मा लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर शेवटचा वनडे सामना खेळणार आहे. वर्ल्ड कपसाठी तुझा विचार होणार नाही असं अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने रोहित शर्माला कळवलं आहे. रोहितच्या जागी यशस्वी जैस्वाल सारख्या युवा खेळाडूला संधी मिळेल. निवड समितीचा हा निर्णय रोहित शर्माला पटलेला नाही. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, त्याने काही बीसीसीआय पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पण त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रोहित निराश आहे. रोहित शर्मा सध्या सुरु असलेल्या इंग्लंड दौऱ्यात प्रभाव पाडू शकलेला नाही.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली