यंदाच्या खरीप हंगामात सर्वात मोठं संकट, चिंता वाढवणारा पावसाचा अंदाज, सरकारनेच दिला महत्त्वाचा इशारा!

पाऊस जूनमध्ये येईल. त्यानंतर त्यापेक्षा कमी पाऊस जुलै महिन्यात असेल. त्यापेक्षा कमी पाऊस हा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात असेल, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

यंदाच्या खरीप हंगामात सर्वात मोठं संकट, चिंता वाढवणारा पावसाचा अंदाज, सरकारनेच दिला महत्त्वाचा इशारा!
maharashtra monsoon rain update
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 21, 2026 | 4:07 PM

Maharashtra Weather Update : यंदाचा खरीप हंगाम जवळ आला आहे. मान्सूनच्या आगमनालाही अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. असे असतानाच यंदा महाराष्ट्रात पाऊस कसा असेल. पाऊस चांगला असेल तर त्यानुसार कोणते पीक घ्यावे, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत. दरम्यान, याच खरीप हंगामाची सरकारची तयारी कशी आहे, याचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. या बैठकीनंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची तयारी, शेतकरी कर्जमाफीस शेतकऱ्यांना दिले जाणारे क्रॉप लोन याची माहिती दिली. तसेच राज्यात यंदा पाऊस किती असेल, याचाही अंदाज त्यांनी सांगितला आहे.

यंदा पाऊस कसा असेल?

पावसाच्या अंदाजावर बोलताना फडणवीस म्हणाले की, यावर्षीच्या खरीप हंगामात एल निनोचे संकट आहे. आज आम्हाला हवामान खात्याने माहिती दिलेली आहे. या माहितीनुसार दीर्घकाळ पावसाची सरासरी ही 88 टक्के असेल. वेगवेगळ्या भागात पवासाची ही सरासरी वेगळी असेल. विशेषत: पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात एल निनोची तीव्रता जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानाच्या अंदाजाच्या नुसार खरीप हंगामाचे नियोजन कसे करता येईल, याबाबत चर्चा झालेली आहे.

पावसाच्या दोन दिवासांतही मोठं अंतर येण्याची शक्यता

यावेळी उतरत्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता आहे. पाऊस जूनमध्ये येईल. त्यानंतर त्यापेक्षा कमी पाऊस जुलै महिन्यात असेल. त्यापेक्षा कमी पाऊस हा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात असेल, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली. तसेच पावसाच्या दोन दिवासांतही मोठं अंतर येण्याची शक्यता आहे. पावसात अंतर येण्याची शक्यता असल्याने त्याचा ताण पिकावर पडतो. हा ताण पडू नये म्हणून जलयुक्त शिवारची कामे वेगाने करण्याचा आदेश आम्ही दिलेला आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.

एल निनोच्या संकटाचा सामना करण्यासाठी प्लॅनिंग

गेल्या काही वर्षातील एल-निनोचे वर्ष आहेत, त्यातील 2015 सालचे वर्ष आपल्यासाठी खूप कठीण होते. त्या काळात पावसाची कमतरता मराठवाड्यात 39 टक्के कमी पाऊस झाला होता. तिथे फक्त 61 टक्केच पाऊस झाला होता. अशी स्थिती आपल्यावर आली तर काय करावं याचं नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक जिल्ह्याला या प्रकारचे प्लॅनिंग करण्याचा आदेश देण्यात आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

Follow Us