AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather update : गरज असेल तरच घराबाहेर पडा, IMD कडून मोठा इशारा, महाराष्ट्रावर मोठं संकट

राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे, विदर्भात काही जिल्ह्यांचं तापमान तर 45 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. दरम्यान पुढील काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Weather update : गरज असेल तरच घराबाहेर पडा, IMD कडून मोठा इशारा,  महाराष्ट्रावर मोठं संकट
राज्यात पुन्हा उष्णतेची लाट Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 20, 2026 | 5:01 PM
Share

राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा 42 अंश सेल्सिअसच्याही पुढे पोहोचला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तर उन्हाने कहर केला आहे. पुढील काही दिवस राज्यात असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे.  नागपूरसह विदर्भात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भात अजून आठवडाभर उन्हाची तीव्रता कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिलासादायक बातमी म्हणजे यंदा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून विदर्भात दाखल होण्याची शक्यता आहे.

नागपूरमध्ये 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद 

नागपुरात तापमानाचा पारा 45. 5 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. तापमानात वाढ झाल्याने उकडा देखील वाढला आहे. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उष्णतेचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे.   उष्माघाताचा धोका वाढल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहान हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. मंगळवारी विदर्भातील 3 जिल्ह्याचं तापमान हे 46 अंश सेल्सिअस इतक होतं, तर तीन जिल्हयाचं तापमान 45 अंश सेल्सिअस इतंक होतं. दरम्यान पुढील काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

वर्धा तापला  

दरम्यान वर्धा जिल्ह्यात देखील उष्णता चांगलीच वाढली आहे.  वर्ध्यात सलग दोन दिवस ४६.५ अंश सेल्सिअस एवढ्या प्रचंड  तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने नागरिक हैराण झाले आहेत.  सकाळपासूनच उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत.  दरम्यान  तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहान करण्यात येत आहे.

मुंबईवरही मोठं संकट 

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज शहरातील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जाण्याची शक्यता असून, आर्द्रतेचे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे “हॉट अँड ह्युमिड” वातावरणाचा सामना मुंबईकरांना करावा लागेल. सकाळपासूनच मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात उकाडा जाणवत असून, दुपारच्या वेळेत उष्म्याची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भागांत ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्या सरींचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

समुद्रकिनारी भागात दमट वारे वाहत असल्याने नागरिकांना अधिक घाम आणि अस्वस्थतेचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याने नागरिकांना दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. पुरेसे पाणी पिणे, हलके कपडे वापरणे आणि उन्हात दीर्घकाळ राहणे टाळावे, असा सल्लाही देण्यात आला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईत उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा