AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khavdya Dongar Case: खवड्या डोंगर प्रकरणात अपडेट, तिघांचे अंत्यसंस्कार वेगवेगळ्या ठिकाणी, पण.. चांदगुडे कुटुंबाचा महत्त्वाचा निर्णय

Kunal Chandugade Khavdya Dongar Case: खवड्या डोंगर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. खवड्या डोंगरावरुन तीन लोकांचा मृत्यू झाला होता आता याच चांदगुडे कुटुंबाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Khavdya Dongar Case: खवड्या डोंगर प्रकरणात अपडेट, तिघांचे अंत्यसंस्कार वेगवेगळ्या ठिकाणी, पण.. चांदगुडे कुटुंबाचा महत्त्वाचा निर्णय
| Updated on: Sep 02, 2026 | 12:59 PM
Share

Kunal Chandgude Case: महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरुन पडून तीन लोकांचा मृत्यू झाला. एका झटक्यात संपूर्ण कुटुंब संपले. सुरुवातीला आयफोनचा वाद होता असं म्हटलं जात होते, पण नंतर मात्र या प्रकराणाला वेगवेगळ्या दिशा फुटलेल्या पाहायला मिळाल्या. चांदगुडे कुटुंबातील अंतर्गत वाद असल्याचे नंतर समोर आले. या कुटुंबात अंतर्गत इतका कलह होता की तो त्यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळीही जाणवला.  पण अंत्यसंस्कार जरी वेगवेगळ्या ठिकाणी झाले असले तरीही आता मात्र या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे.

कुणाल चांदगुडे, संगीता चांदगुडे आणि मुरलीधर चांदगुडे यांचे अंत्यसंस्कार वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले होते. मुरलीधर यांच्यावर अंत्यसंस्कार हे त्यांच्या गावी करण्यात आले होते. तर संगीता आणि कुणाल यांच्यावर त्यांच्या माहेरी संगीता यांच्या वडिलांनी अंत्यसंस्कार केले.  आता त्यांचा तेराव्याचा कार्यक्रम मात्र एकाच ठिकाणी करणार आहे. अशी पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. आता या बाबतीत किती तथ्य आहे हे सांगता येत नाही.

या पोस्टमध्ये तिघांचा फोटो आहे, यात ठिकाण, वेळ याची माहिती दिली आहे. तिघांचा फोटो लावलेला असून तेराव्याच्या कार्यक्रमाचे ठिकाण हे जालन्यात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तर हा कार्यक्रमाची तारीख ही आजचीच म्हणजे 2 सप्टेंबर 2026 ची असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आता ही पोस्ट खरी आहे की Ai ने बनवलेली याबाबतची माहिची अद्याप समोर आलेली नाही.

कुणाल चांदुगडे हा खवड्या डोंगरावरुन उडी मारायला गेला होता. यावेळी त्याची आई संगीताने खूप विनंती केली पण तो काही ऐकत नव्हता, त्याच्या वडिलाने त्याला मागे खेचण्यासाठी त्याच्या जवळ गेले. पण या झटापटीत त्यांचाच पाय घसरला आणि ते दोघे खाली पडले. डोळ्यासमोर मुलाचा आणि नवऱ्याचा मृत्यू पाहून संगीता या स्वत:ला सावरु शकल्या नाही, त्यांनी ही या डोंगरावरुन उडी मारली आणि आपले आयुष्य संपवलं. चांदगुडे कुटुंबाच्या अंतानंतर त्यांच्या घरच्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या.

Follow Us
काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीत? नाशिकमध्येच... राहुल गांधींच्या उपस्थितीत
काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीत? नाशिकमध्येच... राहुल गांधींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोदी म्हणाले गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका, अन् बाजारात मोठी घसरण!
Gold And Silver Rate Hike | पंतप्रधान मोदी म्हणाले गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका, अन् बाजारात मोठी घसरण! सोनं तब्बल ₹4,950 तर चांदी ₹8,000 ने घसरली
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियनच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियन यांच्या वडिलांची CBI तपासानंतर पहिली प्रतिक्रिया समोर
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर...
Disha Salian Case Update | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर तपास CBIकडे, आता सत्याचा शोध लागणार?
गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा...
Sanjay Raut | गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात
कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! कोर्टात आज काय घडणार
Shivsena | ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू