AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेतनच्या पँटमध्ये दडलंय केतनच्या खुनाचं गूढ? सियाने हत्येचा कट…पोलिसांना तो पुरावा सापडणार का?

मोबाईल फोन सियाकडे होता. मग यासाठी चेतनच्या कस्टडीचा काय संबंध? आरोपींनी हत्या करण्याचा सराव केला होता? ते घटनास्थळी जाऊन पाहायचं आहे, असं सांगितलं जातंय. मग सात दिवसांत का गेला नाही? असा सवाल चेतनच्या वकिलांनी उपस्थित केला.

चेतनच्या पँटमध्ये दडलंय केतनच्या खुनाचं गूढ? सियाने हत्येचा कट...पोलिसांना तो पुरावा सापडणार का?
ketan agarwal and siya goyal and chetan chaudharyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 29, 2026 | 5:30 PM
Share

Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील कोट्यधीश कुटुंबातील केतन अग्रवाल हत्याकांडात रोज खळबळजनक खुलासे होते आहेत. या प्रकरणाच्या मुळात जाण्यासाठी पोलिसांकडून आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची कसून चौकशी केली जात आहे. आतापर्यंतच्या चौकशीत दोघांनीही केतनला मारण्यासाठी कट रचला होता, असे प्रथमदर्शन स्पष्ट होते, असे म्हटले जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली. तर पोलीस कोठडी देऊ नये, अशी मागणी करत आरोपी चेतन चौधरीच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे. या युक्तिवादात चेतनच्या वकिलांनी खळबळजनक दावे केले आहेत. या कटात चेतन सहभागी नव्हताच, असा दावा त्यांनी केला.

न्यायालयात नेमकं काय घडलं?

अॅड. राम सहाणे यांनी आरोपी चेतन चौधरीची बाजू मांडली. युक्तिवादादरम्यान एफआयआरमध्ये चेतनचे फक्त दोन वेळा नाव आलेले आहे. सिया सारखं चेतनचं नाव घेते. घटनास्थळाचा पंचनामा, सामानाची जप्ती, समोर बसून चौकशी करणे यासाठी 7 दिवस पोलीस कोठडी आधीच दिलेली आहे. लोहगडावर आधी सियाचं नाट्यरूपांतर केलं आणि चेतनचे नाट्य रूपांतर करायचं असं सांगितलं जातंय. चेतनची पॅन्ट जप्त करायची आहे? हुडी, मोबाईल, गाडी जप्त केलेली आहे. तेव्हाच पॅन्ट जप्त का केली नाही? असा सवाल चेतनच्या वकिलांनी उपस्थित केला.

चेतनच्या कस्टडीचा काय संबंध?

मोबाईल फोन सियाकडे होता. मग यासाठी चेतनच्या कस्टडीचा काय संबंध? आरोपींनी हत्या करण्याचा सराव केला होता? ते घटनास्थळी जाऊन पाहायचं आहे, असं सांगितलं जातंय. मग सात दिवसांत का गेला नाही? काहीतरी दाखवायचं म्हणून दोन कारणं दिली जात आहेत. कस्टडी वाढवून मागितली जात आहे, असेही आरोपी चेतनचे वकील यावेळी म्हणाले.

पॅन्ट मागितली असती तर ती पण दिली असती

प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्ही गाडी स्वतः आणून दिली. पॅन्ट मागितली असती तर ती पण आणून दिली असती. आम्हाला तर सर्व मिडियाकडून कळतंय, असे म्हणत चेतनला आता पोलीस कोठडी देऊ नये, अशी मागणी चेतनच्या वकिलाने न्यायालयाकडे केली.

Follow Us
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका