किंगमेकर शिवाजी कर्डिलेंच्या दोन्ही मुलींचा निकाल लागला!

अहमदनगर : नगरच्या राजकारणात नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत असणारे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या दोन्ही मुली निवडून आल्या आहेत. कर्डिलेंची तिसऱ्या कन्या ज्योती गाडे यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळवला, तर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप यांनीही राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत दणदणीत विजय मिळवला. विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या अहमदनगर महापालिकेत अखेर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली …

किंगमेकर शिवाजी कर्डिलेंच्या दोन्ही मुलींचा निकाल लागला!

अहमदनगर : नगरच्या राजकारणात नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत असणारे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या दोन्ही मुली निवडून आल्या आहेत. कर्डिलेंची तिसऱ्या कन्या ज्योती गाडे यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळवला, तर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप यांनीही राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत दणदणीत विजय मिळवला.

विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या अहमदनगर महापालिकेत अखेर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी 18, तिसऱ्या क्रमांकावर भाजप 14 आणि काँग्रेस 5 चौथ्या क्रमांकावर फेकली आहे. सत्तेसाठी आता काय राजकीय समीकरणं जुळतात याकडे लक्ष लागलंय.

भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना तीन मुली आहेत. पहिली मुलगी कोतकरांच्या घरात, तर दुसरी जगतापांच्या घरात आणि तिसरी मुलगी शिवसेनेच्या गाडे परिवारात दिली आहे. त्यामुळे हे तीनही परिवार राजकारणात कोणत्याही पक्षाचे असले तरी राजकीय स्वार्थासाठी आतून एकत्रच असतात. यात नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत असतात ते आमदार शिवाजी कर्डिले.

कार्डिलेंचे मोठे जावई संदीप कोतकर काँग्रेसचे माजी महापौर, तर कर्डिलेंची मुलगी सुवर्णा कोतकर या देखील काँग्रेसच्या माजी उपमहापौर आणि सध्या नगरसेविका आहेत.

कार्डिलेंचे दुसरे जावई संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर कर्डिलेंची दुसरी मुलगी शीतल जगताप देखील नगरसेविका आहेत. यावेळी पुन्हा एकदा शीतल जगताप यांनी विजय मिळवला आहे.

आता तिसऱ्या मुलीनेही राजकारणात प्रवेश केलाय. कर्डिले यांचे तिसरे जावई अमोल गाडे, आता त्याची पत्नी ज्योती गाडे या शिवसेनेच्या गाडे परिवारातील असून त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. आता त्यामुळे पुन्हा सोयऱ्या-धायऱ्यांच्या राजकारणाची चर्चा रंगू लागली आहे.

कर्डिले हे राहुरी मतदारसंघाचे आमदार असून नगर तालुक्यतील बुऱ्हानगर भागात राहतात. मात्र त्यांचे काही मतदार हे नगर तालुक्यात आणि शहराच्या काही भागात येतात. त्यामुळे नगर शहराच्या राजकारणात त्यांचं मोठं वर्चस्व मानलं जातं. तर त्यांचे व्याही भानुदास कोतकरांचे केडगाव भागात वर्चस्व आहे. गेल्या 40 वर्षांपासून केडगाव परिसरात कोतकर कुटुंबाची दहशत आहे. भानुदास कोतकर यांना तीन मुलं आहेत, तर मोठ्या मुलाची पत्नी ही कर्डिले यांची मुलगी आहे. त्यामुळे कोतकर कोणत्याही पक्षात असले तरी त्याला आतून कर्डिलेंचा पाठींबा असतोच, अशी चर्चा शहरात नेहमीच असते.

संबंधित बातम्या :

अहमदनगर : तीन मुली तीन पक्षात, म्हणूनच कर्डिले किंगमेकर!
नगरमध्ये भाजप आमदाराच्या मुलीची राष्ट्रवादीकडे तिकिटाची मागणी
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *