अनिल परब यांची कोट्यावधींची संपत्ती ईडीकडून जप्त, कारवाईनंतर किरीट सोमय्या म्हणतात…

| Updated on: Jan 04, 2023 | 4:36 PM

शिवसेना ठाकरेगटाचे नेते अनिल परब यांची एवढ्या कोट्यावधीची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. त्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल परब यांची कोट्यावधींची संपत्ती ईडीकडून जप्त, कारवाईनंतर किरीट सोमय्या म्हणतात...
किरीट सोमय्या
Follow us on

मुंबई : शिवसेना ठाकरेगटाचे नेते अनिल परब (Anil Parab Sai Resort Case) यांची एवढ्या कोट्यावधीची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी अनिल परब यांच्यावरील कारवाईवर भाष्य केलंय.

अखेर अनिल परब यांचा हिशेब पूर्ण होतोय. ईडीने अनिल परब यांच्यावर कारवाई सुरु केली आहे. आता तर फक्त अनिल परब यांच्या साई रिसॉर्टवर कारवाई होतेय. नंतर नंबर अनिल परब यांचा…, असं किरीट सोमय्या म्हणालेत.

रत्नागिरीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने मनी लॉन्डिंगचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अनिल परब यांची वारंवार चौकशी झाली. जवळपास चार ते पाच दिवस ही चौकशी झाली होती. साई रिसॉर्टशी संबंधित दहा कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त केल्याची माहिती मिळतेय. यात साई रिसॉर्टसह अन्य ठिकाणच्या मालमत्तेचा समावेश आहे.

रत्नागिरीतील केबल व्यावसायिकांचीही चौकशी या प्रकणात करण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी करून ग्रामसेवक, तलाठी यांचेही जबाब नोंदवण्यात आले होते. आता या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी 31 तारखेला एक ट्विट करत महाविकास आघाडीला इशारा दिला होता. नव्या वर्षात या नेत्यांची चौकशी होणार, असल्याचे संकेत दिले होते. आता अनिल परब यांच्यावर कारवाई झाली आहे.

किरीट सोमय्या यांचं इशारा देणारं ट्विट