कोरोनाचा धसका, कोकणातील मुलींचा मुंबई आणि पुण्यातील मुलांसोबत लग्न करण्यास नकार

देशासह राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरात कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळले (Village girl refuse marry with mumbai and pune city boy) आहेत.

कोरोनाचा धसका, कोकणातील मुलींचा मुंबई आणि पुण्यातील मुलांसोबत लग्न करण्यास नकार

रत्नागिरी : देशासह राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरात कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळले (Village girl refuse marry with mumbai and pune city boy) आहेत. कोरोनाच्या या थैमानामुळे आता कोकणातल्या गावाकडच्या मुलींनी या दोन शहरातील मुलांवर लग्नासाठी काट मारली असल्याचे समोर आलं आहे. या दोन मोठ्या शहरातील मुलगा आपल्या मुलीसाठी देणार नाही अशी भूमिकाही मुलींच्या पालकांनी घेतली आहे. त्यामुळे आता या दोन शहरातील मुलांवर संक्रात आल्याचे पाहायला (Village girl refuse marry with mumbai and pune city boy) मिळत आहे.

दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यासोबत या दोन शहरात कोरोनाचा धोकाही वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता या शहरातील मुलांना मुलगी पसंत सोडाच पण या भागातील मुलगा नकोच अशीच भूमिका गावकडील मुलींच्या पालकांनी घेतली आहे. आज मुंबई, पुण्यात कोरोनाचा धोका बघता धकाधकीच्या या दोन शहरात मुलगी काय द्यायची असा सवाल लग्न करावयाच्या मुलीचा बापाला पडला आहे.

लांजा तालुक्यातील अंकिता खानविलकर ही विलवी गावात राहते. अंकिताचे लग्न करायचे होते. पण कोरोनामुळे आता मुलं बघताना मुंबई आणि पुण्यातला नको अशीच भूमिका अंकिताने सुद्धा घेतली आहे. “सध्या कोरोनामुळे मुंबई आणि पुण्यातील कुटुंबाची अवस्था काय होतेय ते मी डोळ्यांनी पाहातेय. त्यामुळे एकवेळ दोन घास कमी देवून गावाकडे सुखात ठेवणारा मुलगा मी निवडेन”, असं अंकिताने सांगितले.

एरवी कोकणातल्या मुलींना मुंबई आणि पुण्यातील मुलांची क्रेझ जास्त होती. आपल्या आयुष्याचा जो़डीदार हा अशा मोठ्या शहरातील असावा असं अनेक मुलींच मत होतं. पण कोरोनामुळे आता हा ट्रेण्ड बदलत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भविष्यात या दोन शहरातील मुलांना गावाकडील मुलगी मिळेल का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.


Published On - 3:25 pm, Sat, 11 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI