VIDEO: कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात फ्री स्टाईल हाणामारी, ई-पासवरून रंगला वाद

कोरोनानंतर प्रदीर्घ कालाखंडानंतर कोल्हापूरातील अंबाबाई मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची आता गर्दी वाढत असल्याने वादावादीच्या घटना घडत आहेत. आजही महिला आणि पुरुषांमध्ये फ्री स्टाईलने हाणामारीची घटना मंदिर परिसरात घडली आहे.

VIDEO: कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात फ्री स्टाईल हाणामारी, ई-पासवरून रंगला वाद
kolhapur ambabai free style fighting
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 12:06 PM

कोल्हापूरः कोरोनानंतर (Corona) प्रदीर्घ कालाखंडानंतर कोल्हापूरातील अंबाबाई मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची आता गर्दी वाढत असल्याने वादावादीच्या घटना घडत आहेत. अंबाबाईच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासर (Maharashtra) अनेक राज्यांतूनही भाविक येत असतात. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला अंबाबाईचे तात्काळ दर्शन पाहिजे असते त्यासाठी रांगेत उभा राहण्यापासून ते अगदी ई-पास काढण्यासाठी वाटेल ते प्रयत्न भाविकांकडून केले जातात. आजही अंबाबाईच्या दर्शनासाठी महिला आणि पुरुष रांगेत थांबले असता ई-पास काढण्यावरून त्यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यानंतर सुरक्षिततेासाठी तैनात असणाऱ्या पोलिसांनी मध्यस्ती करून हा वाद मिठविण्यात आला.

फ्री स्टाईलने हाणामारी

आज सकाळी अंबाबाई मंदिर परिसरात रांगेत उभा राहण्यावरून भाविकामंध्ये फ्री स्टाईलने हाणामारी झाली. दर्शनासाठी लागणाऱ्या ई-पास काढताना हा वाद झाला आहे. ई-पास काढण्यासाठी उभा महिला आणि पुरूष रांगेत थांबलेले असताना पास काढण्यावरून हाणामारी झाली. ई-पास काढण्यासाठी उभा असताना वाद सुरू झाल्यानंतर एकमेकांना मारण्यासाठी खुर्च्या उचलण्याचा प्रकारही घडला आहे. हा वाद सुरु असताना अंबाबाई मंदिर परिसराच्या सुरक्षिततेसाठी थांबलेल्या पोलिसांच्या नजरेत हा वाद येताच त्यांच्या मध्यस्थीने वाद मिठविण्यात आला.

रांगा असूनही वादवादी

कोल्हापूरातील अंबाबाईच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. दर्शनासाठी होणाऱ्या वादावादीचे प्रसंग टाळण्यासाठी प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थाही पुरवण्यात आली आहे. तरीही अंबाबाई मंदिर परिसरात याआधीही अनेकदा वादावादीचे प्रसंग घडले आहेत. मंदिर प्रशासनाकडून वेळोवेळी योग्य ती व्यवस्था देण्याचे प्रयत्न झाले आहेत तरीही वादावादीचे प्रसंग घडत असल्याने लांबवरून येणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले असते.

संबंधित बातम्या

तेव्हा तुम्ही तोंडाची वाफ दवडत होता, अयोध्येच्या आंदोलनावर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना फटकारलं, मलंगगड दाखवलं

Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना

National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.