तेव्हा तुम्ही तोंडाची वाफ दवडत होता, अयोध्येच्या आंदोलनावर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना फटकारलं, मलंगगड दाखवलं

तेव्हा तुम्ही तोंडाची वाफ दवडत होता, अयोध्येच्या आंदोलनावर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना फटकारलं, मलंगगड दाखवलं
devendra fadnavis,

राम मंदिराबाबत तुम्ही बोलता, पण राम मंदिर आंदोलनाच्या वेळी तुम्ही कुठे होता? लाठ्याकाठ्या आम्ही खालल्या. तुम्ही तोंडाच्या वाफा दवडत होता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jan 24, 2022 | 5:51 PM

मुंबई: राम मंदिराबाबत तुम्ही बोलता, पण राम मंदिर आंदोलनाच्या वेळी तुम्ही कुठे होता? लाठ्याकाठ्या आम्ही खालल्या. तुम्ही तोंडाच्या वाफा दवडत होता, अशी खोचक आणि घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसैनिकांशी संबोधित करताना राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपवर घणाघाती हल्ला केला होता. राम मंदिराच्या आंदोलनात भाजप आणि संघाचे कारसेवक होते. राम मंदिरांच्या आंदोलनात तुम्ही कुठे होता? लाठ्याकाठ्या आम्ही खाल्ल्या. तुम्ही तोंडाची वाफ दवडत होता. कुठे होते तुम्ही?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

तुमचा हिंदुत्वाशी संबंध काय?

तुम्ही कोणत्या आंदोलनात होता? तुम्ही कोणत्याही आंदोलनात नव्हता. राम मंदिर-बाबरी सोडून द्या. मोदींनी करून दाखवलं. त्यांच्या नेतृत्वात अयोध्येत राम मंदिर तयार होत आहे. तुम्ही साधा दुर्गाडी किल्ल्याचा आणि मलंगगडाचा प्रश्न सोडवला नाही. तुमचा हिंदुत्वाशी संबंध काय? असा सवाल करतानाच शिवसेनेचं हिंदुत्व केवळ बोलण्यापुरतं आहे, असा टोला त्यांनी लगावला. आनंद दिघेंनी संघर्ष केला. तुमचा मुख्यमंत्री असताना तुम्ही मलंगगडाचा प्रश्न सोडवला नाही. आताही सोडवत नाही. तुमचं हिंदुत्व कागदावर आहे. औरंगाबादचं संभाजी नगरही केलं नाही. आम्ही प्रयागराज करून दाखवलं. हिंदुत्व हे बोलून दाखवायचं नसतं करून दाखवायचं असंत. काशी विश्वनाथाचं काम मोदींनी केलं, असंही त्यांनी सांगितलं.

एक ट्विट करून दाखवा

आम्ही बाळासाहेबांबद्दल नेहमी बोलतो त्यांना अभिवादन करतो. आमच्यासाठी ते वंदनीय आहेत. मात्र, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांना अभिवादन करणारं साधं ट्विटही केलं नाही. आधी त्यांच्याकडून ट्विट करून दाखवा. ते ट्विटही करत नाहीत. तरीही तुम्ही त्यांच्या मांडिला मांडी लावून बसत आहात. किती लाचार आहात तुम्ही. ज्यांना बाळासाहेबांना अभिवानद करायला लाज वाटते, त्यांच्यासोबत तुम्ही आहात अन् वर आम्हाला ज्ञान पाजळता?, अशी टीकाही त्यांनी केली.

चौथ्या क्रमांकावर फेकल्याचं शल्य

भाजपसोबत युतीत सडलो असं ते सांगत आहेत. पण भाजपसोबत असताना ते पहिल्या क्रमांकावर गेले. भाजपला सोडल्यावर चौथ्या क्रमांकावर गेले याचाही विचार त्यांनी केला पाहिजे. कुणाकडे सडले ते पाहावे. नगरपंचायत निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर गेले, त्याचं शल्य ते बोलून दाखवत आहेत, असं सांगतानाच तेच तेच मुद्दे त्यांच्या भाषणात असतात. कदाचित शिवसैनिकांनाही तेच तेच भाषण पाठ झालं असेल, असा चिमटाही त्यांनी काढला.

संबंधित बातम्या:

Exclusive: शिवसेना, राष्ट्रवादीच्या खात्यांकडे 8 हजार थकले, महावितरणच्या संकटाचं कारण उघड; नितीन राऊतांचा आघाडीलाच शॉक

VIDEO: आता प्रत्येक राज्यात निवडणुका लढवणार, संजय राऊतांनी सांगितला शिवसेनाचा पुढचा प्लान

औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघावर पुन्हा एकदा हरिभाऊ नानांचा झेंडा, उपाध्यक्षपद निवडीकडे लक्ष!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें