ब्युटी पार्लरमध्ये केस कापण्याची हौस महागात, कोल्हापुरात मालकिणीसह दोन ग्राहकांवर गुन्हा

इचलकरंजीमध्ये गावभाग पोलिसांनी गुरुवारी गांधी पुतळा परिसरातील 'सवेरा ब्युटी क्लिनिक' या पार्लरवर कारवाई केली (Kolhapur Beauty Parlour Open During Lockdown)

ब्युटी पार्लरमध्ये केस कापण्याची हौस महागात, कोल्हापुरात मालकिणीसह दोन ग्राहकांवर गुन्हा

इचलकरंजी (कोल्हापूर) : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमध्ये सलून आणि ब्युटी पार्लर उघडण्यास बंदी आहे. मात्र इचलकरंजीमध्ये ब्युटी पार्लर सुरु केल्याने मालकीण आणि दोन महिला ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kolhapur Beauty Parlour Open During Lockdown)

इचलकरंजीमध्ये गावभाग पोलिसांनी गुरुवारी गांधी पुतळा परिसरातील ‘सवेरा ब्युटी क्लिनिक’ या पार्लरवर कारवाई केली. या प्रकरणी 41 वर्षीय मालकीण, तसेच 33 आणि 27 वर्षांच्या दोन महिला ग्राहकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महात्मा गांधी पुतळा परिसरात हे ब्युटी पार्लर आहे. या पार्लरमध्ये कोणत्याही प्रकारचा मास्क न लावता तसेच फिजिकल डिस्टन्स न ठेवता केस कटींग करण्यात येत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलीस नाईक उज्जवला यादव यांनी फिर्याद दिली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी दिली.

हेही वाचा : कॅन्सरतज्ज्ञ मुलगी केशकर्तनकाराच्या भूमिकेत, लेकीने महसूलमंत्र्यांचे केस घरीच कापले!

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्यामुळे अत्यावश्यक सेवा ठराविक वेळेत सुरु आहेत, मात्र सलून दुकानांना बंदी घालण्यात आली आहे. बरेच जणांनी घरच्या घरी हेअरकट करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. परंतु काही जण लपूनछपून सलूनचा रस्ता धरताना दिसत आहेत.

याआधी, लॉकडाऊन काळात दाढी आणि केस कटिंग केल्याने पुण्यातील हेअर सलून मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. अँगल हेअर सलूनमध्ये बाहेरुन शटर बंद करुन आत धंदा सुरु ठेवण्यात आला होता. पेट्रोलिंगवरील पोलिसांना संशय आल्याने तपास केला असता, आत दाढी कटिंग सुरु असल्याचं दिसलं होतं.

(Kolhapur Beauty Parlour Open During Lockdown)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *