कॅन्सरतज्ज्ञ मुलगी केशकर्तनकाराच्या भूमिकेत, लेकीने महसूलमंत्र्यांचे केस घरीच कापले!

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Maharashtra Congress president Balasaheb Thorat hair cutting) आहे.

कॅन्सरतज्ज्ञ मुलगी केशकर्तनकाराच्या भूमिकेत, लेकीने महसूलमंत्र्यांचे केस घरीच कापले!

अहमदनगर : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Maharashtra Congress president Balasaheb Thorat hair cutting) आहे. लॉकडाऊनमुळे जीवनाश्यक वस्तू वगळता सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांबरोबरच सेलिब्रिटी ते नेतेमंडळींनादेखील याचा फटका बसताना दिसत आहे. लॉकडाऊनमुळे हेअर कटिंग सलूनदेखील बंद आहे. त्यामुळे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची कनिष्ठ कन्या कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी वडिलांचे केस घरीच (Maharashtra Congress president Balasaheb Thorat hair cutting) कापले आहेत.

बाळासाहेब थोरात यांचा घरी केस कापतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांची कन्या वडिलांचे केस कापत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व सलून बंद आहेत. अशामध्ये केस वाढल्याने थोरात यांनी घरीच केस कापले.

नुकतेच काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही आपल्या वडिलांचे केस कापतानाचे फोटो फेसबुकवर शेअर केले होते. त्यासोबत केस कापतानाचा आपला अनुभवही त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे मांडला होता.

“कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आता नविनचं संकट आलं आहे. सगळे हेअर कटिंग सलून बंद असल्याने केस कसे कापायचे? हा प्रश्नच निर्माण झाला. मात्र, आम्ही यावर घरगुती उपाय शोधला. मी स्वत: माझ्या पप्पांचे केस कापले.लहानपणापासून आमचा नेहमीचा हेअर ड्रेसर द्वारका पवार याचं काम बघून मला कायम वाटायचं की केस कापणे म्हणजे सोपंच काम असे. आपण केस कापणाऱ्याला नेहमी असं काप किंवा तसं काप अशा सूचना देत असतो. आज पप्पांचे केस कापताना जगात कुठलेच काम सोपे नाही आणि कामापेक्षा मोठा कोणता धर्म नाही या एका गोष्टीची जाणीव झाली”, असं सत्यजीत तांबे म्हणाले.

आपल्याला या कामात मुलगी अहिल्यानेदेखील साथ दिल्याचं सत्यजित तांबे म्हणाले. सत्यजीत यांनी आपल्या वडिलांचे हेअर कटिंग करण्याचे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंना हजारो लोकांनी लाईक केले आहेत. याशिवाय अनेकांनी सत्यजीत तांबे यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. कोणतंही काम सोपं नसतं. मात्र सत्यजीत यांनी प्रयत्न केला, याबाबत त्यांचं कौतुक केलं जात आहे.

संबंधित बातम्या :

कोणतंही काम सोपं नसतं, वडिलांचे केस स्वत: कापले : सत्यजीत तांबे

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *