
Kolhapur Election Exit Poll : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. आता या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. त्याआधी राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकीचा एक्झिट पोट समोर आला आहे. या एक्झिट पोलच्या अंदाजात मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची महायुती बाजी मारण्याची शक्यता आहे. तर पुण्यातही भाजपालाच विजय मिळण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता चर्चेत असलेल्या कोल्हापूर महापालिकेत कोणाची सत्ता येणार याचाही अंदाज समोर आला आहे. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार कोल्हापुरात भाजपालाच सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.
पोल ऑफ पोल संस्थेच्या अंदाजानुसार कोल्हापुरात भाजपाला एकूण 29 ते 32 जागा मिळू शकतात. तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 18 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 9 ते 11 मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला एकूण 19 ते 23 जागा मिळू शकतात. कोल्हापुरात शरद पवार यांच्या पक्षाला 1 जागा मिळू शकते. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला एकूण 3-4 मनसेला येथे 1 जागा मिळू शकते. इतर अपक्षांना 2 ते 4 जागा मिळू शकतात.
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
संभाजीनगर : निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार - किशोर शितोळे
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
पिंपरी चिंचवडमध्ये भरघोस मतदान, सत्ता कुणाची येणार? धाकधूक वाढली
मालेगावकर घराबाहेर पडले, दणदणीत मतदान
दरम्यान, राज्यातील मुंबई महापालिकेत नेमकी कोणाची सत्ता येणार? असे विचारले जात होते. त्याचाही आता एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीला 131-151 जागा मिळू शकतात. तसेच ठाकरे बंधू आणि शरद पवार यांच्या युतीला 58 ते 68 जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे येथे भाजपाला 42 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळू शकतात. मुंबईत भाजपाला 97 ते 108 जागा मिळू शकतात. शिंदे यांच्या शिवसेनेला 32 ते 38 जागा मिळू शकतात. तसेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 52 ते 29 जागा मिळण्याची शक्ता आहे. काँग्रेसला 21 ते 25 जागा मिळू शकतात.
(टीप- हा फक्त एक्झिट पोलचा अंदाज आहे. प्रत्यक्ष मतमोजणी बाकी आहे. 16 जानेवारी रोजी मतमोजणी केली जाईल.)