VIDEO | तीन फूट खोल नदीपात्रात शिवरायांचे चित्र रेखाटण्याची जिद्द, पाण्याखाली जाऊन चित्र काढणारा ‘अवलिया’

थेट नदीपात्रात पाण्याखाली जाऊन श्वास रोखत छत्रपती शिवाजी महाराज आणि शिव महादेव यांचे दगडावर पेंटींग करून अनोखा विक्रम केला आहे.  (Konkan Artist Vijay Shinde made World First Underwater Painting)

VIDEO | तीन फूट खोल नदीपात्रात शिवरायांचे चित्र रेखाटण्याची जिद्द, पाण्याखाली जाऊन चित्र काढणारा 'अवलिया'
artist vijay shinde underwater painting
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 12:00 PM

चिपळूण : चित्रकला ही एक वेगळीच कला आहे. प्राणी, पक्षी, राजकीय नेते, देवीदेवता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची हुबेहूब चित्र काढणारे वेगवेगळे चित्रकार आपण पाहिले. पण पाण्याखाली जाऊन श्वास रोखून दगडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि शिव महादेव यांचे चित्र काढणारा अवलिया कधी पाहिला आहे का? नाही ना… रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे विजय शिंदे नावाचा असा एक अवलिया आहे. ज्याने थेट नदीपात्रात पाण्याखाली जाऊन श्वास रोखत छत्रपती शिवाजी महाराज आणि शिव महादेव यांचे दगडावर पेंटींग करून अनोखा विक्रम केला आहे.  (Konkan Artist Vijay Shinde made World First Underwater Painting Of Chhatrapati Shivaji Maharaj and Lord Shiva without swimming equipment)

पाण्याखाली जाऊन पेंटींग काढण्याचा विचार

चिपळूणमधील कुशीवडे गावातील विजय शिंदे याने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्याचा सावर्डेत स्टुडिओ आहे. त्याला लहानपणापासून चित्रकलेची आवड असल्यामुळे त्याने आतापर्यंत विविध चित्र काढली आहेत. पण काही तरी वेगळं करण्याची त्यांची जिद्द असल्यामुळे त्याने पाण्याखाली जाऊन पेंटींग काढण्याचा विचार केला.

पहिले चित्र रेखाटण्यासाठी 1 तास 39 मिनिटांचा कालावधी

त्यानुसार रत्नागिरी येथील जयगड नदीत पाण्याखाली 3 फूट खोल जाऊन त्याने एका दगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे पेंटींग काढण्यास सुरुवात केली. यावेळी एका दगडावर कोळशा आणि रंगीत खडूच्या सहाय्याने चित्र रेखाटले. हे चित्र रेखाटण्यासाठी त्याला 1 तास 39 मिनिटे लागली, पाण्याखाली राहून श्वास रोखत चित्र रेखाटताना त्याला 163 वेळा पाण्याबरोबर येऊन श्वास घ्यावा लागला.

छत्रपती शिवाजी महाराजांना आगळी वेगळी सलामी

मात्र त्याने दगडावर हे चित्र रेखाटताना कोणत्याही प्रकारच्या स्विमिंग उपकरणाचा म्हणजेच ऑक्सिजन सिलेंडर, स्विमिंग गॉगल्स इत्यादीचा वापर केला नाही. त्यामुळे अशाप्रकारे प्रथमच पाण्याखाली जाऊन दगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटून त्याने महाराजांना एक आगळी वेगळी सलामी दिली. त्यातून त्याने एक नवा विक्रम केला. विशेष म्हणजे याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

दुसरे चित्र काढण्यासाठी 43 मिनिटांचा अवधी

या व्हिडीओनंतर अनेकांनी कौतुकाची थाप पाठीवर मारली आहे. त्यातून चित्रकार विजय शिंदेचा आत्मविश्वास वाढला. त्यानतंर त्याने जयगडच्या नदीत पुन्हा त्याने पाण्याखाली जाऊन एका दगडावर शिव महादेवचे चित्र काढले. यासाठी त्याला 43 मिनिटे लागली. त्यावेळी त्याने 73 वेळा पाण्याबाहेर येऊन श्वास घेतला. याचाही व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर अपलोड केल्यावर त्याला हजारो लाईक्स मिळाले.

विजय शिंदेंची गिनीज बुकात नोंद करण्याची मागणी

आपण केलेल्या अनोख्या कामाचं चीज झाल्यानंतर त्यावर शाबासकीची थाप पाठीवर पडते तेव्हा अविस्मरणीय आनंद होतो. असेच कौतुकाचे शब्द कानावर पडताच चित्रकार विजय शिंदेंना आनंद झाला. पाण्याखाली जाऊन श्वास रोखत दगडावर पेंटींग करण्याचा विक्रम करणारा विजय शिंदेची गिनीज बुकात नोंद व्हावी, असा अनेकांचा मानस आहे. (Konkan Artist Vijay Shinde made World First Underwater Painting Of Chhatrapati Shivaji Maharaj and Lord Shiva without swimming equipment)

संबंधित बातम्या :

PHOTO : उभ्या पावसात नेते रस्त्यावर, मराठा मोर्चातील क्षणचित्रे

Ajit Pawar | कडक इस्त्रीच्या सफारी सुटावर काळा बूट, अजित दादांच्या स्वॅगची गल्ली ते दिल्लीपर्यंत चर्चा !

PHOTO | केवळ 11 हजार रुपयात पुरी, गंगासागर, बनारस, गयाला जाण्याची संधी, असे करा बुकिंग

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.