AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kurla Bus Accident : मद्यधुंद ड्रायव्हर की ब्रेक फेल ? कुर्ल्यातील जीवघेण्या अपघातामागचं कारण काय ?

कुर्ल्यात सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात चौघांनी जीव गमावला असून 25 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीत व्यक्त होत आहे. भरधाव वेगाने आलेल्या बसने अनेकांना चिरडलं, बसचा ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत होता असा अेकांचा आरोप आहे.

Kurla Bus Accident : मद्यधुंद ड्रायव्हर की ब्रेक फेल ? कुर्ल्यातील जीवघेण्या अपघातामागचं कारण काय ?
कुर्ला अपघातामागचं कारण काय ?Image Credit source: PTI
| Updated on: Dec 10, 2024 | 8:19 AM
Share

मुंबईतील कुर्ला येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण आणइ तेवढ्याच दुर्दैवी अपघाताचे हादरे आज सकाळीही बसत आहेत. अत्यंत वेगाने आलेल्या बेस्टच्या इलेक्ट्रॉनिक बसने गर्दीत घुसून अनेकांना चिरडलं. तसेच रस्त्यावरील अनेक वाहनांनाही जोरदार धडक देत त्यांचा चेंदामेंदा केला. या बसने अनघ्या 100 मीटरच्या अंतरात 40 हून अधिक वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातातामध्ये आत्तापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक नागरिक जखमी झालेत.. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. जखमी नागरिकांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मात्र हा भीषण अपघात कशामुळे झाला हाच प्रश्न सध्या अनेकांच्या मनात आहे. ज्या बसचा अपघात झाला त्याचा ड्रायव्हर मद्यधुंद होता की बसचे ब्रेक फेल झाले होते ? त्याबद्दल अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांच्या मते ड्रयव्हर हा मद्यधुंद होता. तर झोन 5 चे डीसीपी गणेश गावडे यांच्या सांगण्यानुसार या अपघाताचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी बसचा ड्रायव्हर संजय मोरे ( वय 54) याला अटक केली असून त्याच्याविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बस मध्ये तब्बल ६० प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलिस आणि एमएसएफ जवानही जखमी झाले आहेत. यातील पीएसआय प्रशांत चव्हाण या जखमी अधिकाऱ्याच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई कुर्ला पोलीस करत आहेत.

आरडाओरडा नी एकच गदारोळ

सोमवारी रात्री 9.50 च्या सुमारास ही दुर्घटना कुर्ला पश्चिमेकडील अंजुम-ए-इस्लाम शाळेजवळील एसजी बारवे रोडवर झाली. भरधाव वेगाने येणारी अनियंत्रित बस गर्दीत घुसली आणि ते पाहून लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. 100 मीटरच्या इंतरावर बसने 30-40 गाड्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे फूटपाथवरील तसेच गाडीत बसलेले काही लोकही जखमी झाले. चहूबाजूने नुसता आरडाओरडा, गोंधळ सुरू होता. अनेकांना चिरडल्यानंतर अखेर ही इलेक्ट्रॉनिक बस एका इमारतीला धडकून थांबली. संपूर्ण परिसरात अफरातफर माजली होती, प्रत्येक जण जीव वाचवण्यासाठी इकडेतिकडे पळत होता. या अपघाता अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

अपघातानंतर कुर्ला बेस्ट बस स्थानक बंद

कुर्लातील कालच्या भीषण अपघातानंतर कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील बेस्ट बस स्थानक आज बंद आहे. कालच्या घटनेनंतर कुठलाही अनुश्चित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे.बेस्ट बस बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत असून त्यांना चालत किंवा रिक्षाने इच्छिकस्थळी पोहचावे लागत आहे.

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.