AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : दुष्काळात लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, परभणीमध्ये एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, आता टेन्शनच मिटलं

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जामा करण्यात येतात. या योजनेसंदर्भात आता मोठी बातमी समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana : दुष्काळात लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, परभणीमध्ये एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, आता टेन्शनच मिटलं
Ladki Bahin Yojana Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 07, 2026 | 3:16 PM
Share

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ही योजना वेगवेगळ्या कारणांमुळे कायमच चर्चेत राहिली आहे. दरम्यान त्यानंतर आता परभणीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.  ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेसाठी काही अटी देखील त्यावेळी घालण्यात आल्या होत्या. परंतु या अटींचं उल्लंघन करून देखील अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं, काही ठिकाणी तर या योजनेचा पुरुषांना देखील लाभ मिळाला.

दरम्यान या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी तसेच या योजनेचा लाभ हा केवळ पात्र महिलांनाच मिळावा यासाठी सरकारने या योजनेसाठी केवायसी सुरू केली. केवायसी बंधनकारक केल्यानंतर या योजनेतील लाखो महिलांची नावं वगळण्यात आली. काही महिलांनी तर केवायसी केलीच नाही, त्यामुळे त्याचं या योजनेतून नाव आपोआप कट झालं, तर केवायसीनंतर काही महिला या योजनेसाठी अपात्र असल्याचं समोर आल्यानं त्या महिलांची नावं या योजनेतून वगळण्यात आली.

दरम्यान या योजनेतून अनेक महिलांची नाव वगळ्यात आल्याने विरोधकांकडून ही योजना लवकरच बंद होणार आहे, असा आरोप करण्यात येत आहे. तसेच या योजनेसाठी लागणाऱ्या पैशांसाठी सरकारला मोठी कसरत करावी लागत आहे, अशी देखील चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चेच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये बोलताना एकाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. कोणीही आलं तरी लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं आश्वासन देखील त्यावेळी महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं होतं, मात्र अजूनही लाडक्या बहिणांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपयेच जमा होत आहेत.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप