Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, लाभार्थी महिलांचं ते सर्वात मोठं टेन्शन दूर, देवाभाऊंची मोठी घोषणा

ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे, लाडकी बहीण योजनेबाबत आता मोठी बातमी समोर आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, लाभार्थी महिलांचं ते सर्वात मोठं टेन्शन दूर, देवाभाऊंची मोठी घोषणा
लाडकी बहीण योजना
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 05, 2026 | 3:53 PM

ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिंलासाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.  या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला  1 हजार 500 रुपये सन्मान निधी म्हणून दिले जातात. दरम्यान राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे, आधी नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू होती, आणि त्यानंतर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिल्याचे पैसे रखडले होते, मात्र त्यापैकी नोव्हेंबर महिन्याच्या हाप्त्याचं वितरण लाभार्थी महिलांना करण्यात आलं आहे. तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे देखील लवकरच मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान राज्यात अशा देखील अनेक महिला आहेत, ज्या या योजनेसाठी पात्र नसून देखील त्यांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला आहे, अशा महिलांची नाव लाभार्थी यादीतून वगळण्यासाठी आता सरकारने या योजनेसाठी ई केवायसी प्रक्रिया सुरू केली होती. या योजनेसाठी केवायसी करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2025 होती, मात्र तारीख उलटून गेल्यानंतर देखील अनेक महिलांची केवायसी अद्यापही बाकी आहे, अशा महिलांना आता या योजनेचा लाभ बंद होणार असल्याची शक्यता आहे. ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्या महिलांची नावं यादीतून वगळली जाणार आहेत, तसेच ज्या महिला पात्र नसून देखील या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांची नावं देखील या योजनेतून वगळण्यात येणार आहेत.

सरकारने या योजनेसाठी केवायसी सुरू केल्यानंतर आणि आधी देखील काही महिलांची नाव या योजनेतून वगळण्यात आली होती. तेव्हापासून ही योजना बंद होणार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे, त्यामुळे ही योजना खरच बंद होणार का? असा प्रश्न लाडक्या बहिणींना देखील पडला आहे, त्याचं उत्तर आज जालन्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच लाडक्या बहिणींना लखपती दीदी करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.