AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : या लाडक्या बहिणींचे पैसा आता बंद, तुमचंही नाव यादीत आहे का?

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात.

Ladki Bahin Yojana : या लाडक्या बहिणींचे पैसा आता बंद, तुमचंही नाव यादीत आहे का?
Ladki Bahin YojanaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 30, 2026 | 3:07 PM
Share

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली होती. जर आमचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही या योजनेतील लाभार्थी महिलांना 2100 रुपये देऊ असं आश्वासन देखील त्यावेळी देण्यात आलं होतं. परंतु आता राज्यात महायुतीचं सरकार येऊन जवळपास दोन वर्ष होत आले आहेत, परंतु अजूनही सन्मान निधीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाहीये. 2100 रुपये कधी मिळणार याकडे आता या लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून ही योजना चांगलीच चर्चेत आली आहे. या योजनेसाठी सरकारने केवायसी सक्तीची केली, केवायसीनंतर लाखो महिलांना या योजनेतून वगळ्यात आलं आहे, यावरून विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवडणुकीसाठीच ही योजना सुरू केली होती का? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित होत आहे.

दरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे महिलांना एकावेळी एकाच योजनेचा लाभ घेता येणार असल्याचं देखील सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. म्हणजे सरकारच्या धोरणानुसार जर एखादी महिला संजय गांधी निराधार योजना किंवा इतर एखाद्या योजनेचा लाभ घेत असेल तर अशा महिलांची नाव या योजनेतून वगळ्यात येत आहेत. त्यामुळे आता अशा महिलांना या योजनेंतर्गत पैसे मिळणार नाहीयेत.

या सर्व पार्श्वभूमीवर आता  जळगाव जिल्ह्यातील दोन हजार लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारला आहे. एकावेळी एकच योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेता येणार असल्याचे शासनाचे धोरण असल्याने या  महिलांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतो म्हणत जिल्ह्यातील तब्बल दोन हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारला आहे, त्यांनी तसा अर्ज जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांना दिला आहे.

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना