AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Massajog Election Result : मस्साजोगचा धक्कादायक निकाल, संतोष देशमुखांची पत्नी हरली, वहिनीच्या पराभवावर धनंजय देशमुख म्हणाले की..

Massajog Election Result : मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या निधनामुळे सरंपचपदासाठी पोटनिवडणूक झाली. पण निकाल खूप अनपेक्षित लागला. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख यांचा या निवडणुकीत पराभव झाला.

Massajog  Election Result : मस्साजोगचा धक्कादायक निकाल, संतोष देशमुखांची पत्नी हरली, वहिनीच्या पराभवावर धनंजय देशमुख म्हणाले की..
Massajog Election Result
| Updated on: Apr 29, 2026 | 1:28 PM
Share

दीड वर्षांपूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्राच राजकारणं ढवळून निघालं होतं. 9 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत क्रूर पद्धतीने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. माणूसकी कुठे हरवली? असा प्रश्न या हत्याकांडाने उपस्थित झाला होता. या प्रकरणात वाल्मिक कराड आजही तुरुंगात आहे. या हत्याकांडामुळे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. कारण वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणाशी नाव जोडलं गेल्याने धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभरात मोर्चे निघाले होते. मस्साजोगमध्ये ग्रामस्थ अनेकदा आंदोलनाला बसले होते.

त्याच मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या निधनामुळे सरंपचपदासाठी पोटनिवडणूक झाली. पण निकाल खूप अनपेक्षित लागला. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख यांचा या निवडणुकीत पराभव झाला. स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला. खरंतर हा शॉकिंग निकाल आहे. या निकालावर संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आमचा भाऊ गेल्याने सगळ्यात मोठं नुकसान झालं. त्यामुळे हा पराभव गौण आहे. झालेला पराभव, गावकऱ्यांनी दिलेला कौल मान्य करतो” अशी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाल्यानंतर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली.

न्यायाची लढाई शेवटी कुटुंबीयांना लढावी लागणार

“ज्या काही अफवा पसरवल्या त्या यापुढे पसरवू नयेत ही विनंती. न्यायाची लढाई शेवटी कुटुंबीयांना आणि आम्हाला लढावी लागणार आहे. गावकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही ती लढू. CSR फंड आणला असा आरोप केला ते पुराव्यानिशी दाखवावे. संतोष अण्णाच्या स्वप्नातलं गाव करण्यासाठी प्रयत्न करणार” असं धनंजय देशमुख म्हणाले.

कुठल्या फेरीत किती मतं मिळाली ?

स्वरुपानंद देशमुख 92 मताने विजयी झाले. पहिल्या फेरीत ते 156 मतांनी आघाडीवर होते.दुसऱ्या फेरीत 20 मतांनी आघाडीवर होते. शेवटच्या तिसऱ्या फेरीत ते 92 मताने विजयी झाले. स्वरुपानंद देशमुख हे संतोष देशमुख यांना अभिवादन करून देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध करुन संतोष अण्णांना खरी श्रद्धांजली द्यावी, अशी इच्छा व्यक्त करण्यात येत होती.मात्र स्वरूपानंद देशमुख यांनी शेवटपर्यंत अर्ज मागे घेण्यास नकार दिला.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान