लॉकडाऊनमुळे बांगड्यांचा व्यवसाय थांबला, सासू-सुनेने ढोकळा पीठ विक्रीतून 3 महिन्यात दीड लाख कमवले

ढोकळे बनविण्याच्या छंदाला लातूरमधल्या सासू आणि सुनेच्या जोडीने लॉकडाऊनमध्ये व्यवसायाचं स्वरुप दिलं आहे.

लॉकडाऊनमुळे बांगड्यांचा व्यवसाय थांबला, सासू-सुनेने ढोकळा पीठ विक्रीतून 3 महिन्यात दीड लाख कमवले

लातूर : ढोकळे बनविण्याच्या छंदाला लातूरमधल्या (Latur Dhokla Story) सासू आणि सुनेच्या जोडीने लॉकडाऊनमध्ये व्यवसायाचं स्वरुप दिलं आहे. विशेष म्हणजे घरगुती ढोकळे बनविण्याच्या या छंदातून त्यांना तीन महिन्यात दीड लाखांचा नफा झाला आहे (Latur Dhokla Story).

लातूरमधल्या दैवशाला शेटे आणि त्यांच्या सासूबाई सुरेखा शेटे या दोघींचं मुळात बांगड्या विकण्याचा व्यवसाय आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये बांगड्यांचा व्यवसाय ठप्प झाला आणि हातचं काम थांबलं. घरात छंद म्हणून सुनबाई चांगले ढोकळे बनवायच्या. मग, याच छंदाला त्यांनी व्यवसाय बनवायचे ठरवलं.

युट्यूबवरुन त्यांनी याबाबतची सर्व माहिती मिळवली. आता त्या घरातल्या मिक्सरवरुन 45 प्रकारचे ढोकळे बनविण्याचे पीठ तयार करतात. व्यवस्थित पॅकिंग करुन त्यांनी आता मोठ्या मॉलमध्येही विक्रीला सुरुवात केली आहे.

आता त्यांना हा व्यवसाय वाढवायचा आहे. लॉकडाऊनच्या तीन महिन्यात त्यांना या ढोकळे पिठाच्या विक्रीपासून दीड लाखांचा निव्वळ नफा झाल्याचं त्या सांगतात.

लॉकडाऊनमध्ये घरातल्या-घरात उद्योग सुरु करुन यशस्वी करणाऱ्या या सासू-सुनेच्या ढोकळ्यांची उपलब्धता लवकरच देशभरात होईल, अशी त्यांची जिद्द आहे (Latur Dhokla Story).

संबंधित बातम्या :

रेल्वे दुर्घटनेत दोन्ही पाय गमावले, रिक्षा चालवत कुटुंबाचा उदरनिर्वाह, पिंपरीतील तरुणाचा प्रेरणादायी प्रवास

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *