AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिद्दीने लढली, पण नियतीपुढे हरली… निवडून आलेल्या नगरसेविकेचा अचानक मृत्यू; सर्वांनाच धक्का

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटातून निवडून आलेल्या नगरसेविकेचा अचानक मृत्यू झाला आहे. पैसे नसताना देखील त्या लढल्या आणि जनतेच्या विश्वासामुळे जिंकल्या... पण नियतीला काही वेगळं आणि धक्कादायक मान्य होतं...

जिद्दीने लढली, पण नियतीपुढे हरली... निवडून आलेल्या नगरसेविकेचा अचानक मृत्यू; सर्वांनाच धक्का
नगरसेविका शाहूताई कांबळे
| Updated on: Jan 13, 2026 | 1:01 PM
Share

नियतीपुढे कोणाचं काहीच चालत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. नवनिर्वाचित नगरसेविकेच्या मृत्यूने परिसर आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पहाटे नगरसेविकेची अचानक प्रकृती खालावली म्हणून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण पहाटेची वेळ असल्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार झाले नाहीत आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जवळ पैसे नसताना त्यांनी मोठ्या जिद्दीने निवडणूक लढवली आणि विजय देखील मिळवला. जनतेचं त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे हे शक्य झालं. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं.

ज्या नगरसेविकेचं निधन झालं आहे, त्यांचं नाव शाहूताई कांबळे असं होतं. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर येथील नवंनिर्वाचित नगरसेविका शाहूताई कांबळे यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. छातीत दुखत असल्याने त्यांना अहमदपूरच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्या तिथे त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. शाहूताई कांबळे यांनी नुकताच झालेल्या नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाकडून निवडून आल्या होत्या.

नक्की झालं तरी काय?

मंगळवारी म्हणजे आज पहाटे अचानक शाहूताई यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. म्हणून कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण पहाटेची वेळ असल्यामुळे शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टर उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार झाले नाहीत. अखेर त्यांना ग्रामीन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना जर जवळपास 20 मिनिटांपूर्वी उपचार मिळाले असते, तर त्यांचे प्राण वाचले असते.. असं देखील सांगण्यात येत आहे.

दरम्यान, नगरसेविका शाहूताई कांबळे यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना मोठा धक्का बसला. बाबासाहेब पाटील म्हणाले, ‘पक्षासाठी आणि माझ्यासाठी हा फार मोठा धक्का आहे.’ शाहूताई कांबळे यांच्या जाण्याने संपूर्ण प्रभागात शोककळा पसरली आहे.

दिवंगत नगरसेविका शाहूताई कांबळे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, 2017 मध्ये त्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. फक्त 12 मतांनी त्यांनी हार मानावी लागली.. पण जनतेचा त्यांच्यावर विश्वास होता आणि याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी निवडणूक लढवली आणि वियज मिळवला. या प्रवासात बाबासाहेब पाटील यांची मोठी साथ शाहूताई कांबळे यांना लाभवी. पण त्यांच्या निधनानंतर आता सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

राज ठाकरेंची पूर्णपणे जिरलीय... गुणरत्न सदावर्तेंची जीभ घसरली
राज ठाकरेंची पूर्णपणे जिरलीय... गुणरत्न सदावर्तेंची जीभ घसरली.
देवाभाऊ पब्लिकमध्ये... थेट बाईकवरून साधला संवाद... तुफान तुफान गर्दी
देवाभाऊ पब्लिकमध्ये... थेट बाईकवरून साधला संवाद... तुफान तुफान गर्दी.
... तर मी माझी दाढी काढून टाकणार! इम्तियाज जलील यांचं मोठं चॅलेंज
... तर मी माझी दाढी काढून टाकणार! इम्तियाज जलील यांचं मोठं चॅलेंज.
भाजप-शिंदेंचे लोक एकमेकांची धुलाई करताय; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
भाजप-शिंदेंचे लोक एकमेकांची धुलाई करताय; संजय राऊतांचा खळबळजनक दावा.
हिंदी-मराठी वाद निवडणुकीचा मुद्दा नाही; मैथिली ठाकूरची स्पष्ट भूमिका
हिंदी-मराठी वाद निवडणुकीचा मुद्दा नाही; मैथिली ठाकूरची स्पष्ट भूमिका.
पैसे वाटप करण्याआधी यादी व्हायरल! संभाजीनगरचा धक्कादायक व्हिडीओ
पैसे वाटप करण्याआधी यादी व्हायरल! संभाजीनगरचा धक्कादायक व्हिडीओ.
नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी
नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी.
नाशिक सिव्हिल ICU घोटाळा उघड, डॉक्टर निखिल सैंदाणेंना अटक
नाशिक सिव्हिल ICU घोटाळा उघड, डॉक्टर निखिल सैंदाणेंना अटक.
मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशात जाऊन निवडणूक लढवावी; राऊतांचा निशाणा
मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशात जाऊन निवडणूक लढवावी; राऊतांचा निशाणा.
भाजपच्या माजी मंत्र्यांची जीभ घसरली अन् भर सभेत नको ते बोलून गेले
भाजपच्या माजी मंत्र्यांची जीभ घसरली अन् भर सभेत नको ते बोलून गेले.