AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा, अल्पवयीन मुलीचा बळी घेणार तितक्यात पोहोचले पोलिस, थेट..

लातूर येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तब्बल 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा केली जात होती. एका अल्पवयीन मुलीचा बळी घेतला जाणार होता.

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा, अल्पवयीन मुलीचा बळी घेणार तितक्यात पोहोचले पोलिस, थेट..
Latur police
| Updated on: Aug 17, 2026 | 11:24 AM
Share

लातूर येथे झोप उडवणारा प्रकार उघडकीस आला. ज्याने एकच खळबळ उडाली. पैश्याचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजेच्या तयारीत असलेल्या 15 जणांना लातूर जिल्ह्यातल्या उदगीर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे पैश्याचा पाऊस पाडण्यासाठी एका अल्पवयीन मुलीचा विधी दरम्यान बळी देण्यात येणार होता, अशी धक्कादायक माहिती पुढे आली. उदगीर ते लातूर रस्त्यावरच्या करडखेल पाटी जवळ वाहनांसह थांबलेल्या या 15 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंध्रप्रदेशातून आणलेल्या पीडित मुलीची सुटका पोलिसांनी केली. पैश्याचा पाऊस पाडण्याच्या अघोरी पूजेत सहभागी असलेले आरोपी हे अकोला, परभणी, बीड, पुणे या शहरांसह कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातील आहेत. आता या आरोपींची पोलिस लिंक शोधत आहेत.

आरोपीचे नाव व पत्ता पुढील प्रमाणे आहेत. कुंडलीक देवराव रूपनर वय 46 वर्ष व्यवसाय मजूरी रा तितरवणी ता शिरूर कासार बीड, सचिन साहेबराव भोंगळे वय 35 व्यवसाय चालक रा धानोरा वैदय ता मुर्तीजापुर अकोला, अनिकेत सुभाष राठोड वय 27 वर्ष व्यवसाय मजुरी रा वडी ता जिंतुर परभणी, समिर टिनघरे पुणे, लक्ष्मण विठ्ठल करंजी वय 33 वर्ष लिंगमपल्ली तेलंगणा.

सनेश सुकुमार पनिके 45 वर्ष लिंगमपल्ली आरसीपुरम संगारेड्डी, दुर्गाप्रसाद मल्लेश ईरकला वय 20 वर्षे लिंगमपल्ली तेलंगणा,  श्रीनिवास विरख्या चिलमुला 45 संगारेड्डी तेलंगणा,  बालाजी रघुनाथराव बिरादार वय 25 वर्षे  तेलंगणा, चंद्रया सुंदरराव कारम वय 41 आंध्रप्रदेश, अनंतराव गंगाराम खुनिकार वय 48 वर्ष तेलंगणा, राजेश मोगली ईपन्नापल्ली वय 42 हैद्राबाद,

सुनिल कल्याण डेंगले वय 52 वर्ष पुणे,  राजू सेवु पवार वय 48 वर्ष कर्नाटक, आणि बालाजी अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी मोठी धाड टाकून सर्व प्रकार उघडकीस आणला. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी आरोपींकडून अघोरी विद्या केली जात होती. यासोबतच एका मुलीचा बळी देखील दिला जाणार होता. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, मुलीची सुटका केली. हे आरोपी तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचे रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...