Latur Election Results 2026 LIVE: लातूरमधील निष्ठावंतांच्या बंडखोरीचा कुणाला फटका? धनुष्यबाण सुटणार? घड्याळ्याचे काटे फिरणार? निकाल इथं वाचा

Latur Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपमधील मोठी खदखद समोर आली. पालिकेच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला. निष्ठावंतांच्या आघाडीने राजकारण पार बदलून टाकले. काय लागला निकाल?

Latur Election Results 2026 LIVE: लातूरमधील निष्ठावंतांच्या बंडखोरीचा कुणाला फटका? धनुष्यबाण सुटणार? घड्याळ्याचे काटे फिरणार? निकाल इथं वाचा
लातूर महापालिका निवडणूक निकाल
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:26 AM

लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत मोठा गेम झाला. भाजपच्या निष्ठावंतांनी मोठी खेळी खेळली. निष्ठावंत कार्यकर्ता आघाडीने भाजपच नाही तर इतर पक्षांची समीकरणं बदलवून टाकली. महापालिकेच्या गणितात नवा ट्विस्टला आला.बंडखोर मैदानात उतरल्याने अनेकांच्या सत्तेच्या स्वप्नाला सुरूंग लागला. निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी महापालिकेच्या मैदानात उतरल्याने धनुष्यबाण आणि घड्याळाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. गेल्या दहा दिवसांच्या प्रचाराच्या धुराळ्यात हा मुद्दा सतत समोर आला. स्थानिकांची त्यांच्या प्रभागात चांगली पकड असल्याने तिकीटधारी उमेदवारांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. आता निष्ठावंतांची आघाडी कुणाला धूळ चारते हे लगेच समोर येईल. आज निकालात कुणाची स्वप्न वाहून जातात आणि कुणाचं स्वप्न स्वस्तात येतात हे समोर येईल.

गेल्यावेळी लातूर महापालिकेत, 2017 मध्ये 36 जागांवर भाजपचे कमळ फुलले होते. तर 32 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जिंकले होते.तर राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवला होता.यंदा कुणाच्या पारड्यात मतदार कौल देणार? हे आज समोर येईल.लातूर महानगरपालिकेत चार सदस्य असलेल्या प्रभागांची संख्या 16 इतकी आहे. तर तीन सदस्यांची संख्या 02 इतकी आहे. लातूर शहरासाठी एकूण 18 प्रभाग आहेत. या प्रभागात एकूण 70 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. या पालिकेत तिरंगी निवडणूक होणार आहे. तर बंडखोरांसह काही जण पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जात आहे. यंदा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये निवडणुकीची चुरस दिसून येत आहे.

Live

Municipal Election 2026

10:58 PM

सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर

09:12 PM

जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही

08:00 PM

BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?

06:58 PM

एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का

11:39 PM

ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा

11:00 PM

राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज

प्रभाग क्रमांक 4

गेल्यावेळी प्रभाग क्रमांक 4 मध्ये 4 उमेदवार होते. याप्रभागात काँग्रेसने कुणालाच शिरू दिले नाही. कैलास कांबळे, गौरीबी बागबान,रफादबी शेख, अहेमदखान पठाण हे विजयी झाले होते. या प्रभागात भाजपला गेल्यावेळी खातं उघडता आलं नव्हतं. यावेळी प्रभाग क्रमांक 4 मध्ये कोण विजयी होणार याची चर्चा सुरू आहे.

प्रभाग 4 मध्ये एकूण लोकसंख्या 22,615 इतकी आहे. या प्रभागात आनंदनगर, संजय नगर, इंद्राळे नगर, इस्लामपुरा, न्यू काजी मोहल्ला, आझम चौक, मिलींद कॉलेज, सुरज सदन, सुभाष किराणा स्टोअर्स, सिद्धार्थ चौक, जयभीमनगर, सिंकदरपूरपर्यंत रिंग रोड हद्द, नवशा मारुती चौक असा मोठा भाग आहे.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवारपक्ष

प्रभाग क्रमांक 5

प्रभाग क्रमांकमध्ये गेल्यावेळी 2017 मध्ये काँग्रेसचा वरचष्मा होता. या प्रभागात चारही उमेदवार काँग्रेसचे होते. गौरव काथवटे, पुजा पंचाक्षरी, विक्रांत गोंजगुंडे, फर्झाना बागवान या विजयी झाल्या होत्या. इतर पक्षांना या प्रभागात खातं उघडता आलं नव्हतं.

प्रभाग क्रमांक 5 ची एकूण लोकसंख्या 21,577 इतकी आहे. या प्रभागात मंठाले नगर, डालडा फॅक्ट्री, शिवाजी कॉलेज, मोची गल्ली, बादाडे नगर, गौर पुरा, गूळ मार्केट, सोनवणे चौक, नांदेड रोड, सम्राट चौक, आझम चौक, पुढे कातपूर रोड, महाराष्ट्र विद्यालय शिवनेरी गेट असा मोठा परिसर यामध्ये आहे.

प्रभाग क्रमांक 6

प्रभाग क्रमांक 6 मध्ये गेल्यावेळी, 2017 मध्ये भाजपनं सुरुंग लावला. या प्रभागात सर्व चारही उमेदवार भाजपचे होते. काँग्रेसला एकही खातं उघडता आले नाही. या प्रभागात तुळशीराम दुधिले, ज्योती अवास्कर, भाग्यश्री कोळखैरे, सुरेश पवार हे सर्व चारही उमेदवार निवडून आले होते. यंदा या प्रभागात कोण बाजी मारणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रभाग क्रमांक 6 ची एकूण लोकसंख्या 19,928 इतकी आहे. या प्रभागात वीर हणमंतवाडी, मार्कट यार्ड, गांधीनगर, गंजगोलाई, शासकीय मेडिकल कॉलेज, हनुमान चौक, चंद्रनगर, मारवाडी स्मशान भूमी, शाहू चौक, हनुमान चौक, सुभाष चौक, हत्ते चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रत्नदिप थिएटर समोरील कव्हा रोड, बसवेश्वर चौक, कडबा चौक, गांधी नगर मिनी मार्केट याचा समावेश आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

लातूर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE