Video : लातूरयं हे..! अमित देशमुखांच्या तिकिटावर खा.शृंगारे यांनी गाठली राज्याची राजधानी, राजकीय क्षेत्रातला असा हा ‘लातूर पॅटर्न’

| Updated on: May 08, 2022 | 1:05 PM

पालकमंत्री अमित देशमुख यांना लातूरहून मुंबईला मंत्रीमंडळाच्या बैठकीला उपस्थित जायचे होते. मात्र, काही कारणांमुळे ती बैठक अचानक रद्द झाली. त्याच दरम्यान एका कार्यक्रमात पालकमंत्री आणि खासदार यांची भेट झाली आणि खा. शृंगारे यांनी मुंबईला जाण्याबाबत विचारणा केली मात्र, आमची बैठक रद्द झाल्याने मी जाणार नसल्याचे सांगितले.

Video : लातूरयं हे..! अमित देशमुखांच्या तिकिटावर खा.शृंगारे यांनी गाठली राज्याची राजधानी, राजकीय क्षेत्रातला असा हा लातूर पॅटर्न
पालकमंत्री अमित देशमुख आणि खा. सुधाकर शृंगारे
Follow us on

लातूर :  (Latur District) लातूर जिल्ह्याची ओळख तशी सुसंस्कृत आणि सुशिक्षीत शहर म्हणूनच आहे. ज्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रात ‘लातूर पॅटर्न’ची ओळख आहे अगदी त्याप्रमाणेच (P0litics) राजकीय क्षेत्रातही होईल असे वातावरण जिल्ह्याचे आहे. (Maharashtra) राज्यात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील चिखलफेक ही दररोजचीच झाली आहे पण लातुरात पालकमंत्री आणि खासदार यांच्यामध्ये झालेल्या किस्स्याची चर्चा आता जिल्हाभर होऊ लागलीय. तिकीट म्हंटल कि राजकरणात खेचाखेची आलीच , मग ते तिकीट निवडणुकीतले असो की रेल्वे प्रवसाचे. तिकीट कन्फर्म झालं पाहिजे अशी नेत्यांची भावना असते. मात्र, लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी आपले कन्फर्म झालेले तिकीट खासदार सुधाकर शृंगारे यांना दिले आहे. आणि खासदार सुधाकर शृंगारे यांनी याच तिकीटावर लातूर-मुंबई असा प्रवासही केला. त्यामुळे राजकारणाच्या पलिकडे जाऊन कसे संबंध जोपासले जाऊ शकतात याचे उत्तम उदाहरण लातुरात समोर आले आहे.

नेमका काय प्रकार घडला होता?

पालकमंत्री अमित देशमुख यांना लातूरहून मुंबईला मंत्रीमंडळाच्या बैठकीला उपस्थित जायचे होते. मात्र, काही कारणांमुळे ती बैठक अचानक रद्द झाली. त्याच दरम्यान एका कार्यक्रमात पालकमंत्री आणि खासदार यांची भेट झाली आणि खा. शृंगारे यांनी मुंबईला जाण्याबाबत विचारणा केली मात्र, आमची बैठक रद्द झाल्याने मी जाणार नसल्याचे सांगितले. तेव्हा तुमच्या तिकिटावर मी जाऊ का अशी विचारणा खा.शृंगारे यांनी केल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितले. त्यामुळे मतभेद असले तरी आमच्यामध्ये मनभेद नसल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले.

राजकीय मतभेद निवडणुकांपुरतेच

लातूरची वेगळी संस्कृती आहे. राजकीय मतभेद हे केवळ निवडणुकांपुरतेच मर्यादीत असतात. इतर वेळी विकास कामांमध्ये विरोधकांचीही तेवढीच भूमिका महत्वाची राहिलेली आहे. इतर वेळी मतभेद बाजूला सारुन सत्ताधारी-विरोधक हे एकत्र आलेले आहेत. पण ती राजकारणातील कटूता कुठेही पाहवयास मिळालेली नाही.

अखेर त्या मतभेदावरही पडदा

मागच्या काही दिवसात भाजपा खा.सुधाकर शृंगारे यांनी महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांच्यावर अनेक आरोप केले होते . त्यामुळे काँग्रेस आणि खासदार यांच्यात तणाव निर्माण झाल्याची चर्चा होती . मात्र रमजान ईदच्या निमित्ताने खा.सुधाकर शृंगारे आणि मंत्री अमित देशमुख हे अनेक कार्यक्रमात एकत्र आले होते . याच कार्यक्रमांमध्ये त्यांच्यात संवाद झाला , याच संवादा दरम्यान अमित देशमुखांनी खासदारांना आपले लातूर-मुंबई कन्फर्म तिकीट दिले , विशेष म्हणजे खासदारांनी या तिकिटावरून प्रवासही केला . लातूरच्या राजकारणात आता या प्रवासाची कमी मात्र दिलेल्या तिकीटाची चर्चा जास्त होते आहे.