AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लक्ष्मण हाकेंच्या त्या व्हिडिओने मोठा भूकंप, बड्या नेत्यावर टीका; रोख नेमका कुणाकडे?

Laxman Hake Video : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात त्यांनी एका नेत्यांवर भाष्य केले आहे. त्या नेत्याचे बोलणे मला खटकलं होतं असंही हाके यांनी म्हटलं आहे.

लक्ष्मण हाकेंच्या त्या व्हिडिओने मोठा भूकंप, बड्या नेत्यावर टीका; रोख नेमका कुणाकडे?
Laxman Hake Viral VideoImage Credit source: Google
| Updated on: Jun 09, 2026 | 3:51 PM
Share

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ते एका बड्या नेत्यावर टीका करताना पहायला मिळत आहेत. या नेत्यावर हाके यांनी गंभीर आरोप केले आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. या व्हिडिओमध्ये हाके यांनी नेमकं काय म्हटलं? तसेच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हाकेची पहिली प्रतिक्रियाही समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हाके यांचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके म्हणत आहेत की, त्याची आपल्यामागे फरपट होत आहे. त्याचं कसं आहे त्यांच्याकडे आहे यंत्रणा, त्याच्याकडे आहे संघटन. मीडिया हँडल करण, मोठा स्टेज डेकोरम देणं, मीडियाला प्रॉपर बातमी देणं. ते म्हणाले आंदोलन करायचं नाही, मी दुसऱ्या दिवशी जाहीर केलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी जीआर फाडावा, होळी करावी, रस्त्यावर उतराव, निवेदनं द्यावी. बोलला होता ना काय करायचं नाही म्हणून. माझ्या उपस्थितीत म्हणला होता की आंदोलन थांबवा, स्टेजवरच होतो ना मी पण.’

पुढे बोलताना हाके म्हणाले की, ‘हा मुख्यमंत्र्यांना दोन उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेलाय. घेऊन कोणाला गेलाय, स्वत:, स्वत:चा मुलगा, स्वत:चा पुतण्या. हे तिघेजण गेले आणि सभेत सांगत आहे की, ते तिघेजण होते आणि आम्ही तिघेजण होतो. मला लय ते वाक्य खटकलं होतं, पण जाऊदे म्हटलं. आपल्याला सॉफ्ट कॉर्नर फक्त.’ मात्र हाके यांचा रोख नेमका कुणाकडे हे समजू शकले नाही.

मी बोलणं थांबवणार नाही – हाके

हाके यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीव्ही 9 मराठीने हाके यांच्याशी संपर्क साधला. यावेळी बोलताना हाके म्हणाले की, कोणता व्हिडिओ आहे, कधीचा व्हिडिओ आहे, तो पूर्ण का दाखवला जात नाही? मी ओबीसींच्या प्रश्नावर भांडत आहे, लढत आहे, रांत्रदिवस पळत आहे. त्यावर कोणी बोलत नाही. अशा गोष्टींमधून काय साध्य करायचं आहे? ओबीसींच्या प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाही. या लोकांचा उद्देश लक्ष्मण हाकेला डॅमेज करणं हा आहे. पण हाके डॅमेज होणाऱ्यातला नाही. मी बोलायचं थांबणार नाही.’ मात्र हाके यांनी डॅमेज करण्याचा प्रयत्न कोण करत आहे त्या नेत्याचे नाव मात्र घेतले नाही.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर