बिबट्याला ठोसे लगावून पत्नीने वाचविला पतीचा जीव; दरोडी-चपळदरा भागातील घटना

मध्यरात्री झाली असताना दोन वाजण्याच्या सुमारास जनावरांच्या गोठ्यात आवाज येत आहे म्हणून ते पाहण्यासाठी गोरख गोठ्यात गेले. त्याचवेळी बिबट्याने गोरख यांच्यावर अचानक हल्ला केला, या हल्ल्यात बिबट्याने त्यांचे अक्षरशः आपल्या जबड्यात घेतले. बिबट्याने केलेल्या या अचानक हल्ल्यामुळे गोरख यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केला.

बिबट्याला ठोसे लगावून पत्नीने वाचविला पतीचा जीव; दरोडी-चपळदरा भागातील घटना
Bibtya AhamdnagrImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 5:20 PM

अहमदनगरः सध्या वन्यप्राण्यांचा आदिवास बदलत आहे, वृक्षतोड आणि इतर कारणांमुळे वन्यप्राणी आता मानवीवस्तीकडे वळू लागले आहे. अहमदनगरलाही (Ahmednagar) बिबट्यासंदर्भात (Leopard Attack) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अहमदनगरला बिबट्याने जबड्यातील आपल्या पतीचे डोके सोडविण्यासाठी जीवाचीही पर्वा न करता अक्षरश: बिबट्याला ठोस लागवल्याची घटना अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील दरोडी चापळदरा येथे घडली आहे. या घटनेतील धाडसी पत्नीचे नाव आहे, संजना पावडे (Sanjana Pawade). तर गोरख पावडे असं बिबट्याने हल्ला केलेल्या पतीचे नाव आहे. पारनेर तालुक्यातील डोंगराच्या कुशीत असणाऱ्या दरोडी चापळदरा भागात पावडे कुटुंब वास्तव्य करत आहे.

मध्यरात्री झाली असताना दोन वाजण्याच्या सुमारास जनावरांच्या गोठ्यात आवाज येत आहे म्हणून ते पाहण्यासाठी गोरख गोठ्यात गेले. त्याचवेळी बिबट्याने गोरख यांच्यावर अचानक हल्ला केला, या हल्ल्यात बिबट्याने त्यांचे अक्षरशः आपल्या जबड्यात घेतले. बिबट्याने केलेल्या या अचानक हल्ल्यामुळे गोरख यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केला. त्यांचा आवाज ऐकून त्यांची पत्नी संजना हिने गोठ्याकडे तात्काळ धाव घेतली. त्यावेळी त्यांच्या समोर बिबट्याने त्यांच्या पतीचे डोके आपल्या जबड्यात पकडले होते. बिबट्याच्या हल्ल्यात आपल्यी पतीला कोणतीही हानी पोहचू नये म्हणून क्षणाचाही अवधी न घालवता त्यांनी बिबट्याच्याच शेपटीला धरुन मागे खेचण्याचा प्रयत्न करु लागल्या. त्या सगळ्यांचा आरडाओरड ऐकून त्यांच्या सासऱ्यांनीही बिबट्यावर हल्ला केला.

बिबट्याचा कुत्र्याने घेतला चावा

पतीला वाचवण्यासाठी पत्नीचे हे प्रयत्न चालू असतानाच त्यांच्या घरातील कुत्र्यानेही बिबट्यावर हल्ला चढवला, आणि त्याच्या गळ्याचा चावा घेतला. यावेळी गोरख यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी, त्यांचा पाळीव कुत्रा आणि गोरख यांचे वडिलांनी दगडाने हल्ला केला. बिबट्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे बिबट्या बिथरुन त्याने तिथून पळ काढला.

बिबट्याला हात लावण्याचे धाडस

तो आवाज ऐकून त्यांची पत्नी संजना यांनी गोठ्याकडे धाव घेतली आणि त्यांनी बिबट्याच्या शेपटीला धरून त्याला मागे खेचले.तर त्यांच्या पाळीव कुत्र्याने मालकाला वाचवण्यासाठी बिबट्याच्या गळ्याचा चावा घेतला, गोरख पावडे यांचे वडील दशरथ यांनी दगडाने बिबट्याचा प्रतिकार केला. त्यामुळे आपलीच शिकार होते की काय असं वाटू लागल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली.

संबंधित बातम्या

Nagpur Dogs | रामटेकमध्ये कुत्र्यांचा मुलीवर प्राणघातक हल्ला, 10 वर्षीय मुलगी गंभीर जखमी

Borivali | माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार, भिंत रचून कुत्र्यांना जिवंत गाडलं

Rajiv Gandhi Zoological Park : प्राण्यांनाही वाटेल गारेगार; उन्हापासून वाचण्यासाठी कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात आता फॉगर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.