
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला कलाटणी देणाऱ्या दोन मोठ्या घटना 2022 आणि 2023 मध्ये घडल्या. याआधीच्या इतिहासात मूळ पक्ष सोडून इतर पक्षात जाणाऱ्यांची संख्या मोठी असायची. पण, एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची स्थापन केलेल्या शिवसेना पक्षात उठाव करून पक्षच आपल्या ताब्यात घेतला. तर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड करून राष्ट्रवादी पक्षावर हक्क सांगितला. निवडणुका आयोगाने विधान सभेतील आमदारांच्या बळावर शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना तर राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांच्या हाती सुपूर्द केला. या दोन मोठ्या घडामोडीनंतर लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या. भाजप, शिवसेना ( शिंदे गट ) आणि राष्ट्रवादी ( अजित दादा गट ) यांची महायुती या निवडणुकांना एकत्रितपणे सामोरी गेली. तर, इकडे हातातून पक्ष गेलेले उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी कॉंग्रेसला सोबत घेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीला शह देण्याचा प्रयत्न केला. शिंदे, अजितदादा यांच्याकडे मूळ पक्ष आणि चिन्ह आले असले तरी जनतेच्या मनात कोणता पक्ष आहे हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दिसून येणार...