AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑफिसला जाऊन येतो… लोणावळा येथे यूवकाने उचलले टोकाचे पाऊल, नेमकं काय घडलं?

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एक युवक घरातून ऑफिसला जात आहे असे सांगून निघाला होता. पण घरी न आल्यामुळे कुटुंबियांनी तक्रार दाखल केली. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे.

ऑफिसला जाऊन येतो... लोणावळा येथे यूवकाने उचलले टोकाचे पाऊल, नेमकं काय घडलं?
लोणावळाImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 04, 2026 | 2:45 PM
Share

लोणावळ्याच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ लायन्स पॉइंटजवळील खोल दरीत ३८ वर्षीय युवकाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतकाचे नाव परेश हटकर असे आहे. तो घरातून ‘ऑफिसला जातो’ असे सांगून घरातून निघाला होता. पण तो घरी घरतला नसल्यामुळे कुटुंबीयांनी तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला. ही घटना अपघात आहे की कट-कारस्थान, याची चौकशी आता लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

परेश हटकर बुधवारी घरातून ऑफिसला जाण्यासाठी निघाले होते. मात्र ते ऑफिसला पोहोचलेच नाहीत. दरम्यान, लोणावळ्यातील लायन्स पॉइंटवर त्यांची कार कालपासून बेवारस उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पाटील संतोष मरगळे यांनी याबाबत माहिती दिली, त्यानंतर शोध अभियान सुरू करण्यात आले.

लायन्स पॉइंटवर सापडला मोबाईल

परेशचा मोबाईल फोन लायन्स पॉइंटवरच सापडला, मात्र विशेष बाब अशी की त्यांचे टॉवर लोकेशन ‘पाली’ किंवा ‘इमेजिका’ परिसरात दाखवत होते. लोणावळ्याच्या घाटातील भौगोलिक स्थितीमुळे अनेकदा लोकेशनमध्ये असा तांत्रिक फरक पडतो. हे समजून ‘शिवदुर्ग बचाव टीम’ने दरीत शोध घेण्याचा निर्णय घेतला.

७०० फूट खोल दरीत शोध अभियान सुरु करण्यात आले. ज्या ठिकाणी मोबाईल सापडला होता, तेथूनच शिवदुर्ग टीमचे सदस्य दोरीच्या मदतीने सुमारे ७०० फूट खोल दरीत उतरले. प्रचंड मेहनतीनंतर बचाव दलाला परेशचा मृतदेह सापडला. श्रुती शिंदे, योगेश उंबरे आणि सचिन गायकवाड यांनी दरीत उतरून मृतदेह शोधला. सुमारे चार तासांच्या कष्टानंतर मृतदेह दरीतून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

अपघात की कट-कारस्थान?

परेश हटकर दरीत कसे पडले? त्यांनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबत काही कट-कारस्थान घडले? आता हे प्रश्न उपस्थित होत आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे आणि प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

बिनविरोध नगरसेवक निवडीवरुन मनसे कोर्टात, वकील असीम सरोदे थेट म्हणाले..
बिनविरोध नगरसेवक निवडीवरुन मनसे कोर्टात, वकील असीम सरोदे थेट म्हणाले...
...त्याशिवाय मुंबईचा महापौर शक्य नाही, नवाब मलिकांच्या दाव्यानं खळबळ
...त्याशिवाय मुंबईचा महापौर शक्य नाही, नवाब मलिकांच्या दाव्यानं खळबळ.
माघारीसाठी थेट उमेदवाराला फोन, ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाचा ऑडिओ व्हायरल
माघारीसाठी थेट उमेदवाराला फोन, ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाचा ऑडिओ व्हायरल.
अर्जांच्या गोंधळावरून पालिका अधिकाऱ्यांवर ठपका, कुलाब्यात घडलं काय?
अर्जांच्या गोंधळावरून पालिका अधिकाऱ्यांवर ठपका, कुलाब्यात घडलं काय?.
सत्ताधाऱ्यांची मनमानी अन् यंत्रणांचा उन्माद... 'सामना'तून टीकास्त्र
सत्ताधाऱ्यांची मनमानी अन् यंत्रणांचा उन्माद... 'सामना'तून टीकास्त्र.
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कधी लाँच होणार? कोणत्या मार्गावर धावणार?
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कधी लाँच होणार? कोणत्या मार्गावर धावणार?.
66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसे आज हायकोर्टात, निवडणुकीपूर्वी...
66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसे आज हायकोर्टात, निवडणुकीपूर्वी....
बदलापूरच्या चंदेरी गडावरून गिर्यारोहक खाली कोसळला अन् थेट मृत्यू
बदलापूरच्या चंदेरी गडावरून गिर्यारोहक खाली कोसळला अन् थेट मृत्यू.
...ते डॉन असतील तर मी ही डॉन, शिंदे सेनेतील आमदाराचं वादळी वक्तव्य
...ते डॉन असतील तर मी ही डॉन, शिंदे सेनेतील आमदाराचं वादळी वक्तव्य.
आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, पंकजा मुंडेंच विरोधकांना चॅलेंज
आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, पंकजा मुंडेंच विरोधकांना चॅलेंज.