कधी महायुतीसोबत असणाऱ्या या नेत्याची राहुल गांधींसोबत भेट, राज्यात नवीन समीकरणाची नांदी?

mahadev jankar: एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीत आल्यावर भाजपला छोट्या पक्षांची गरज नाही. त्यामुळे दुसरा पर्याय निवडला पाहिजे, हा विचार केला. काल राहुल गांधी यांनी घरी बोलवले होते. मला सन्मानाची वागणूक दिली. राहुल गांधी सोबत जनगणना बाबत चर्चा झाली.

कधी महायुतीसोबत असणाऱ्या या नेत्याची राहुल गांधींसोबत भेट, राज्यात नवीन समीकरणाची नांदी?
mahadev jankar
| Updated on: May 06, 2025 | 11:58 AM

कधी महायुतीसोबत असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर नवीन मार्ग निवडत आहे. महायुतीमध्ये त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला स्थान मिळत नसल्याने महादेव जानकर नाराज झाले आहे. त्यामुळे आता काँग्रेससोबत जाण्यासाठी त्यांनी पावले उचलली आहे. त्यांनी नुकतीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. माझाही पक्ष आहे. पक्षाला पक्षाप्रमाणे वागणूक मिळायला पाहीजे, अशी मनातील खदखदही त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर म्हणाले, भाजपने आम्हाला विचारले नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीत आल्यावर भाजपला छोट्या पक्षांची गरज नाही. त्यामुळे दुसरा पर्याय निवडला पाहिजे, हा विचार केला. काल राहुल गांधी यांनी घरी बोलवले होते. मला सन्मानाची वागणूक दिली. राहुल गांधी सोबत जनगणना बाबत चर्चा झाली. त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर अखिलेश यादव यांच्याशी चर्चा झाली. यापुढे स्टॅलिन, शरद पवा, तेजस्वी यादव यांचीही भेट घेणार असल्याचे जानकर यांनी सांगितले.

माझ्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे मोठे आहेत. मोठा पक्ष छोट्याला दाबतो, त्याचा अनुभव त्यांना येईल, असे सांगत महादेव जानकर म्हणाले, आमच्यासाठी भाजपने दार बंद केली आहे. आमची काही चूक नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो की, त्यांनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करायचे आश्वासन दिले होते, ते पाळले गेले पाहिजे. धनगर समाजाचा एसटीमध्ये समाविष्ट करावा आणि मराठा आरक्षण द्यावे, असा निर्णय चोंडीच्या कॅबिनेटमध्ये घ्यावा. तसेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजना बंद करू नये, अशी मागणी महादेव जानकर यांनी केली.

लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास अघाडीत असलेले महादेव जानकर महायुतीत आले होते. त्यानंतर महादेव जानकर यांना महायुतीने परभणी लोकसभा निवडणुकीत उतरवले होते. परंतु मविआचे उमदेवार संजय जाधव यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांचे राजकीय पुनर्वसन होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु महायुती सत्तेत आल्यानंतर त्यांच्या रासपला सत्तेत काही स्थान मिळाले नाही.