AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC Result 2026 : दोन पोरी सर्वांना भारी… इयत्ता 10वीच्या परीक्षेत अशी कमाल केली की अख्खा जिल्हा पाहातच राहिला…

दहावी बोर्ड परीक्षेत धाराशिवच्या गायत्री पाटील आणि पुण्याच्या ओजसी ओगले यांनी १००% गुण मिळवत अभूतपूर्व यश संपादन केले. त्यांची कठोर मेहनत, नियमित अभ्यास आणि डॉक्टर व संशोधक बनण्याचे ध्येय प्रेरणादायी आहे. या यशाने त्यांनी केवळ जिल्ह्याचेच नव्हे, तर महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे, इतरांनाही प्रोत्साहित केले.

SSC Result 2026 : दोन पोरी सर्वांना भारी... इयत्ता 10वीच्या परीक्षेत अशी कमाल केली की अख्खा जिल्हा पाहातच राहिला...
दोन पोरी सर्वांना भारी
| Updated on: May 08, 2026 | 3:31 PM
Share

राज्याचा इयत्ता 10वीचा निकाल अखेर लागला आहे. या निकालाने अनेक विद्यार्थ्यांमध्ये कभी खूशी, कभी गमचं वातावरण आहे. काही विद्यार्थी केवळ पास झाले म्हणून नाराज आहेत. तर काही विद्यार्थी अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाल्याने नाराज आहेत. तर काही विद्यार्थी नापास झाल्याने निराश झाले आहेत. पण राज्यातील दोन जिल्ह्यात अक्षरश: दिवाळी साजरी होत आहे. कारण या दोन जिल्ह्यातील पोरींनी सर्वांपेक्षा भारी कामगिरी गेली आहे. या दोन पोरींनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत एका झटक्यात 100 पैकी 100 मार्क मिळवून हम भी कुछ कम नही हेच दाखवून दिलं आहे.

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील डॉक्टर के. डी. इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी गायत्री महादेव पाटील हिने 100 टक्के गुण घेत दहावीला घवघवीत यश मिळवले आहे. गायत्रीला 500 पैकी 492 गुण मिळाले. तसेच संगीताचे 8 गुण मिळून 500 पैकी 500 गुण मिळाले आहेत. ती सध्या नीटची तयारी करीत आहे. गायत्रीला डॉक्टर होऊन आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.

या यशानंतर गायत्रीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुरुवातीपासूनच चांगले गुण मिळवण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी मेहनतही घेतली आणि त्याचे फळ मला मिळाले. मी रोज सकाळी लवकर उठून अभ्यास करत होते. मला डॉक्टर होण्याची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया शंभर टक्के गुण मिळवत उमरगा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गायत्री पाटील हिने व्यक्त केली आहे. गायत्रीच्या या विजयाने गावकरी प्रचंड खूश झाले आहेत. आपल्या तालुक्याचे नाव पोरीनं उज्ज्वल केल्याची भावना गावकरी व्यक्त करत आहेत.

माहीत होतं 100 पैकी 100 मिळतील

तर, गायत्रीसह पुण्यातील ओजसी अमोल ओगले हिनेही इयत्ता दहावीच्या परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. ओजसी ही पुण्याच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी आहे. या यशाबद्दल ओजसीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला 100 पैकी 100 गुण मिळाले याचा आनंद आहे. पैकीच्या पैकी मार्क मिळतील याचा मला ठाम विश्वास होता. या यशात आई-वडील शिक्षकांचं मार्गदर्शन मला मिळालं.प्रमाणिकपणे अभ्यास केला की यश नक्की मिळते. आता मला 11 वी सायन्सला प्रवेश घ्यायचा आहे. पुढे मला रिसर्च करायचा आहे, असं ओजसीने सांगितलं.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?