AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharashiv News : 15 कृषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई; कृषिमंत्री दत्ता भरणे यांचा मोठा दणका

धाराशिव जिल्ह्यातील कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी राज्य शासनाने कठोर कारवाई केली आहे. 15 कृषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

Dharashiv News : 15 कृषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई; कृषिमंत्री दत्ता भरणे यांचा मोठा दणका
| Updated on: Aug 06, 2026 | 8:12 AM
Share

धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागात निविष्ठा वाटपातील कथित घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्य शासनाने मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान (National Food Security Mission) अंतर्गत राबवण्यात आलेल्या एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (INM) या महत्त्वाच्या योजनांच्या अंमलबजावणीत गंभीर अनियमितता झाल्याचे समोर आल्यानंतर तब्बल 15 कृषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ माजली असून सर्वत्र याचीच चर्चा सुरू आहे.

या प्रकरणी कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी कठोर भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे कृषी विभागात मोठी खळबळ उडाली असून, राज्यभरातील कृषी यंत्रणेला स्पष्ट इशारा मिळाल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत (2025-2026) धाराशिव जिल्ह्यात 24 कोटींच्या निविष्ठा वाटण्यात आल्या. यात मयत शेतकरी तसेच बनावट नावे टाकून निविष्ठा वाटप दाखवून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप होता. त्यानंतर हे प्रकरण तापलं. अखेर आता कृषी अधिकाऱ्यांना कारवाईचा दणका बसला आहे.

निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, जिल्हा कृषी उपसंचालक, कृषी अधिकारी तसेच कृषी सहायक यांचा समावेश आहे. या सर्व अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करून संबंधित अनियमिततेची सखोल तपासणी केली जाणार आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागात मोठी खळबळ उडाली असून, चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच दोषी आढळणाऱ्यांवर पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई होण्याचीही शक्यता आहे.

Follow Us
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं