AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्हाला बनवता, आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का?; अजित पवारांची राहुल गांधींवर टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांनी योजनांवरुन केलेल्या टीकेवर उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर ही टीका केली. ते म्हणाले की, जे लोकं आधी योजनांवर टीका करत होते. पैसे कुठून आणणार विचारत होते. तेच विरोधत आता निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या मोठ्या घोषणा करत आहेत.

आम्हाला बनवता, आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का?; अजित पवारांची राहुल गांधींवर टीका
| Updated on: Nov 09, 2024 | 6:07 PM
Share

सांगलीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले की, योजनेला पैसे दिले यामुळे विरोधक टीका करता. आम्ही काय मूर्ख आहोत का, आता निवडून येणार नाही, त्यामुळे असं काही सांगायचे की लोकं बावळून गेली पाहिजेत. पण मला महाराष्ट्रच्या जनतेला सांगायचं आहे. हे सगळे चुनावी जुमला चालू आहे. आपल्या राज्याचे वाटोळ करण्याचे काम चालले आहे.

राहुल गांधी यांची उडवली खिल्ली

अजित पवारांनी राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. काल काँग्रेसचे एक दिल्लीतले नेते आले, त्यांनी सांगितले आम्ही खटा खट देतो. अरे कुठलं खटा खट. अरे दरवाजा वाजवताय का ? खटा खट वाजवायला असं कुठे नोटा येतात का ? अरे काय तुम्ही देशाचे विरोधी पक्ष नेते आहात. आम्हला बनवता. आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का ? आम्ही स्पष्ट बोलणारे आहोत आणि खरं ते सांगणारे आहोत. योजना पूर्ण करण्यासाठी धमक आणि ताकत लोकप्रतिनिधीमध्ये असावी लागते. राष्ट्रवादी घडाळ्याला मत द्या. इस्लामपूर मतदारसंघाचा चेहरा मोहरा पाच वर्षात बदलला नाही तर नावाचा अजित पवार सांगणार नाही.

अजित पवार म्हणाले की, योजनांची जेव्हा घोषणा केली, तेव्हा विरोधक म्हणायचे की यामुळे राज्य दिवाळखोरीत जाईल. या योजनांमुळे कर्मचाऱ्यांना पगार मिळणा नाही. योजनेचे पैसे लोकांना मिळणार नाहीत. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून योजनांची घोषणा केल्याची आरोप ते करत होते. आता मात्र तेच विरोधक योजनांबाबत मोठ्या मोठ्या घोषणा करत आहेत. योजनेला लागणार पैसा आम्ही कसा देणार हे आमचं तोंड पाठ आहे. पण विरोधकांना विचारले तर त्यांच्याकडे याचं उत्तर नाही. विरोधकांनी ज्या योजना जाहीर केल्या त्यासाठी साडेतीन लाख कोटींचा खर्च येणारे, पण आम्ही जाहीर केलेल्या योजनांसाठी 75 हजार कोटी रुपये लागणार आहेत. त्यामुळे विरोधकांच्या योजना या जुमला असल्याचं अजित पवार यांनी म्हटले आहे.

आज एकूण गुंतवणुकीच्या 52 टक्के गुंतवणूक फक्त महाराष्ट्रात आहे. याबाबत महाराष्ट्र आधी तिसऱ्या क्रमांकावर होता, आता तो पहिल्या क्रमांकावर आहे. उद्योगधंदे गुजरातला नेते जात असल्याचं फेक नरेटीव विरोधक पसरवत आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसने 10 टक्के उमेदवार मुस्लीम समाजाचे दिलेत. 12 टक्के जागा या एससी आणि एसटी समाजासाठी दिल्या आहेत. तर 10 टक्के जागा महिलांना दिल्या आहेत. असं देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.

शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?.
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?.
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!.
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट.
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?.
यंदाच्या वर्षात सोन अडीच लाखांच्या घरात जाणार? काय आहेत सध्याचे दर?
यंदाच्या वर्षात सोन अडीच लाखांच्या घरात जाणार? काय आहेत सध्याचे दर?.
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.