
राजकीय पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा मुख्य सामना आहे. त्यात दोन्ही आघाड्यांमधील सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. फक्त काही जागांवर अजूनही तिढा आहे. त्यासाठी सातत्याने बैठका, चर्चा सुरु आहेत. आजही काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अमित शाह यांच्यासोबत जागावाटपाच्या विषयावरील चर्चा यशस्वी झाल्याची माहिती आहे. महायुतीच्या नेत्यांची कोणताही वादविवाद न होता खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाल्याची मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती दिली आहे. इलेक्टिव मेरिट हाच मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी होता. ज्या जागांबाबत संदिग्धता आहे तिथे जिंकण्याची क्षमता विचारात घेऊनच निर्णय होणार. विधानसभा निवडणुकीतील सर्व महत्त्वाच्या घडामोडी ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी JMM ने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. पक्षाने लुईस मरांडी यांना या जागेवरून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. जेएमएमने आतापर्यंत 43 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, या महिन्याच्या 28-29 ऑक्टोबरपर्यंत भारतीय लष्कर आणि चिनी लष्कर पूर्णपणे माघार घेतील.
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. पीएम मोदींशिवाय केंद्रीय मंत्री आणि भाजपचे प्रमुख जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावांचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात दिल्लीत काँग्रेसची सीईसी बैठक सुरू झाली आहे. काँग्रेस मुख्यालयात सुरू असलेल्या या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि पक्षाचे नेते राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि इतर नेते सहभागी झाले आहेत.
मागाठाण्यातील शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. सुर्वे 28 ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार आहेत. “मी केलेले काम जनतेला माहीत आहे, अजून बरीच कामं करायची आहेत”, असं प्रकाश सुर्वे म्हणाले. तसेच सुर्वे यांनी तिसऱ्यांदा तिकीट मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकमध्ये दोन सभा घेणार असल्याचे मनसे उमेदवार दिनकर पाटील यांनी म्हटले आहे. सिडको आणि सातपूर येथे राज ठाकरे यांच्या सभेचे नियोजन केले आहे.
मेधा सोमय्या अब्रुनुकसान प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. याआधी न्यायालयाने संजय राऊत यांना 25 हजाराचा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत माढ्यातून अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहेत. महायुतीच्या जागा वाटपात माढा मतदार संघ अजितदादा गटाकडे गेल्याने सावंत बंडखोरी करणार आहेत. २९ ऑक्टोबर रोजी सावंत माढ्यातुन अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
अमळनेर मतदार संघातून पुन्हा विजय होण्याचं मंत्री अनिल पाटील यांचं वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल की हसीन सपने होय.माजी आमदार तथा अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनिल पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे.
करवीर विधानसभा मतदारसंघातून जनशराज्य शक्ती पक्षातर्फे संतांची घोरपडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख विनय कोरे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. महायुतीमध्ये शिंदे गटाने चंद्रदीप नरके यांची करवीर मधून उमेदवारी जाहीर केली असतानाच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्याने देखील उमेदवार दिला.
काँग्रेसने चांगले उमेदवार गमावले. निवडून येण्यासाठी संपर्क आणि विकासकामे हे दोन गुण लागतात, हिरामण खोसकर यांच्यात खूप गुण आहेत. ते चांगल्या मतांनी निवडून येतील असे हेमंत गोडसे म्हणाले.
माढा विधानसभा मतदार संघाची जागा महायुतीने रयत क्रांती संघटनेला सोडावी, अशी मागणी अजित पवारांची भेट घेऊन रयत क्रांती संघटनेचे नेते सुहास पाटील यांनी केली आहे. रयत क्रांती संघटनेचे सुहास पाटील माढ्यातुन घड्याळाचे चिन्ह घेऊन निवडणुक लढवण्यास इच्छुक आ
महायुतीचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार. माझी लाडकी बहीण योजना सूर्य चंद्र असे पर्यंत सुरु राहणार.कोकणातल्या 15 मतदार संघातील आमचे उमेदवार निवडून येतील. महाराष्ट्रात युतीचं सरकार गरजेचं आहे, असं उदय सामंत म्हणाले.
२५-३० वर्ष ज्यांनी पक्षांचा झेंडा हातात घेऊन पुढे नेला त्यांना उमेदवारी द्यावी. कार्यकर्त्यांची भावना पक्षश्रेष्ठी पर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे. उमेदवारी निश्चीत करायचं काम पक्षश्रेष्ठींचं आहे.
माझा पहिला फॉर्म भरून मी सर्व प्रथम वैशाली सूर्यवंशी यांचा फॉर्म भरण्यासाठी आलोय. काही लोक सुरतला पळून गेले गुहावटीला पळून गेले. पन्नास खोके एकदम ok शिवसैनिकांची घोषणाबाजी
नालासोपारा विधानसभेचे भाजपचे उमेदवार राजन नाईक यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे. नालासोपारामध्ये मागच्या ३० वर्षा पासुन एकाच कुटुंबाची सत्ता आहे. आता एकदा भाजपाला येथील जनतेने संधी द्यावी असे अहवान ही विनोद तावडे यांनी केले आहे.
चिमूर विधानसभेतून काँग्रेस नेते धनराज मुंगले भरणार अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज.धनराज मुंगले यांनी पक्षाकडे केली होती उमेदवारीची मागणी मात्र सतीश वारजूरकर यांच्या नावाची झाली आहे घोषणा.
नालासोपारा विधानसभेचे भाजपचे उमेदवार राजन नाईक यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे. नालासोपारामध्ये मागच्या ३० वर्षांपासून एकाच कुटुंबाची सत्ता आहे.
नागपूरला स्वच्छ आणि सुंदर शहर केल्याशिवाय शांत बसणार नाही. नागपूर शहरात आतापर्यंत कोणी केले नाही, असे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
रत्नागिरीत वेळेअभावी उदय सामंत यांची उमेदवारी अर्ज भरताना होणारी रॅली रद्द झाली आहे. आता उदय सामंत उमेदवारी अर्ज भरणार त्यानंतर जाहीर सभेला संबोधन करणार आहेत.
हिंगोलीत नाकाबंदी दरम्यान चौकशी पथकाला एक कोटींची रक्कम सापडली. ती जप्त करण्यात आली आहे.
महायुतीमध्ये केवळ ११ जागांवर निर्णय बाकी आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या जागांपैकी दहा टक्के जागा अल्पसंख्याक उमेदवारांना देणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
महाविकास आघाडी मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाने प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर केली असताना हडपसर मधुन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महादेव बाबर लढणार आहे. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार आहे.
परंडा भूम विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रीय समाज पक्षाकडून नाना मदने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास पाटील व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला .
भाजपचे नेते, देवेंद्र फडणवीस आज नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे औक्षण केलं. केंद्रीय मंत्री नेते नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीचे अनेक नेतेही फडणवीस यांच्यासोबत आहेत.
माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस आहे मी माझ्या आयुष्यातील नवीन निवडणूक लढवणार आहे. मी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मला ही संधी केवळ आणि केवळ ठाकरे कुटुंबांने दिली. बाळासाहेब आणि मीनाताई त्याचा मी कायम ऋणी राहीनच .त्यासोबत राजा साहेबांनी देखील मला वारंवार संधी दिली. आजचा अत्यंत दिवस महत्त्वाचा आहे, मी कोणावर टीका करणार नाही असे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.
जळगावच्या पारोळा -एरंडोल मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे डॉ. संभाजी पाटील बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार.
पारोळा एरंडोल मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील यांच्याविरुद्ध बंडखोरी करत डॉ संभाजी पाटील अपक्ष निवडणूक लढवणार असून 28 रोजी अर्ज दाखल करणार आहेत.
महाविकासआघाडीत जागांचा तिढा नाही. आज रात्री हायकमांडकडून यादी जाहीर करण्यात येईल. महाविकासाआघाडीत मेरीटवर जागावाटप केले जात आहे. अहेरी मतदारसंघात काही प्रमाणात वाद आहे. पण तेथील कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
पाचोरा विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून वैशाली सूर्यवंशी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे जळगाव पाचोरा विधानसभेत भाऊ विरुद्ध बहीण असा सामना रंगणार आहे. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. किशोर पाटील यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वैशाली सूर्यवंशी आज आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
जळगाव जिल्ह्यात उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले एरंडोल आणि जळगाव शहर मतदार संघात भाजपचे पदाधिकारी बंडखोरी करणार असून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. भाजपचे माजी खासदार ए. टी.नाना पाटील पारोळा – एरंडोल मतदार संघातून उमेदवारी अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत. जळगाव शहर मतदार संघात भाजपचे माजी उपमहापौर डॉ अश्विन सोनवणे हे सुद्धा अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. यावेळी कुठलीही बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही, कुणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे.
शिरूरमधून अजित पवार गटाकडून ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माऊली कटके यांनी दोन दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे शिरूर विधानसभा मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी असा सामना होणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अशोक पवारांना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके आव्हान देणार आहेत.
भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांना मावळ मतदार संघातून उमेदवारी न दिल्याने अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. शिरूर मधील पुणे जिल्हा उत्तर ग्रामीण उपाध्यक्ष मितेश गादिया यांनी आपल्या भाजप जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. भाजप नेत्यांवर केलेला अन्याय सहन केला जाणार नसून त्यामुळे व्यतीत होऊन हा राजीनामा देत असल्याचे पत्रात म्हटले आहे. मावळ विधानसभेबाबत घेतलेल्या निर्णयामुळे आता भाजपचे जिल्ह्यातील पदाधिकारी देखील नाराज होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
माऊली कटके यांनी दोन दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला… शिरूर विधानसभा मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी असा होणार सामना…
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संतोष पवारांना ए. बी फॉर्म देण्यात आला… वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार दिल्याने दक्षिण सोलापूरची निवडणूक चौरंगी होणार आहे.. संतोष पवार हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत….
चिखलीकर यांच्या अजित दादा गटात प्रवेशाने कवळे गुरुजींचा नांदेड लोकसभा पोट निवडणुकीसाठी उमेदवारीचा मार्ग मोकळा… नांदेड लोकसभेसाठी पोट निवडणुकीसाठी भाजपाकडून मारोतराव कवळे गुरुजी यांचे नाव चर्चेत… सहकार क्षेत्रात मारोतराव कवळे गुरुजी यांचे काम… खासदार अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख… काम होंगे दमदार, जब गुरुजी बनेंगे खासदार… अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
नवी मुबंईत वाशी खाडी पुलावर भीषण अपघात… मुंबईच्या दिशेने जाताना डंपरला भरधाव एरर्टिका गाडीने धडक दिली आहे… या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे…
संजय काका पाटील, निशिकांत पाटील, सना मलिक यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश. निशिकांत पाटील यांना सांगली इस्लामपूरमधून, संजय काका पाटील यांना तासगावमधून तर सना मलिक यांना चेंबूर अणूशक्ती नगर येथून उमदेवारी. नवाब मलिक यांचा पत्ता कट.
“आपल्याला गद्दारी गाडायची आहे. निष्ठेला विजयी करायचं आहे. ही लढाई व्यक्ती-व्यक्ती मधील नाही, तर विचार-विचारांमधील आहे. या राज्य सरकारने महाराष्ट्रापेक्षा गुजरातचा विचार जास्त केला. मला हसन मुश्रीफ यांना विचारायचं आहे, 25 वर्षात शरद पवारांनी तुम्हाला काहीच दिलं नाही का?. तुम्हाला दिलेल्या ताकदीचा वापर, तुम्ही सर्वसामान्यांसाठी कराल असं पवार साहेबांना वाटलं होतं. ईडीच्या कारवाईला घाबरून हसन मुश्रीफ पळून गेले” अशी टीका रोहित पवार यांनी केली.
माजी आमदार, दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे सुपूत्र झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. महायुतीमध्ये वांद्रे पूर्वच्या जागेचा तिढा सुटला असून आता इथून झिशान सिद्दीकी महायुतीचे उमेदवार असतील. काही दिवसांपूर्वी झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगवर संशय आहे. झिशान सिद्दीकी हे काँग्रेस पक्षात होते. त्यांनी 2019 साली काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक जिंकलेली.
यवतमाळ जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात अजून ही मविआचा उमेदवार ठरेना. उमेदवारीचा सस्पेन्स अजूनही कायम. यवतमाळ, राळेगाव, दिग्रस, पुसद, उमरखेड , आर्णी , या मतदारसंघात अजूनही जागा कोणाकडे हीच चर्चा कायम. यवतमाळच्या उमेदवारीचा पेच पक्ष श्रेष्ठींकडे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा दावा कायम.
आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंतांचे पुतणे पृथ्वीराज सावंत आणी शरद पवार गटाचे नेते शिवाजी कांबळे मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांची यांची भेट घेतली. महायुतीत माढ्याची जागा अजित पवारांकडे गेली असून आमदार बबनराव शिंदेनी महायुतीतून उभं न राहण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे अजित पवारांना माढ्यात उमेदवार मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. या स्थितीत अजित पवार गटात प्रवेश करुन निवडणुक लढविण्यासाठी पृथ्वीराज सावंत व शिवाजी कांबळे या दोघा बड्या नेत्यांनी अजित पवारांची भेट घेऊन इच्छुक असल्याचे सांगितले आहे. दोघांपैकी कुणाला ही तिकीट दिल्यास ताकदीने निवडणुक लढविण्याचा अजित पवारांना शिंदे-कांबळेनी दिला शब्द. दोनच दिवसांत निर्णय घेऊ अजित पवारांनी दिली ग्वाही.