AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार गटाकडून माढा, पंढरपूर आणि मोहोळच्या सस्पेन्सवर पडदा, आणखी 5 उमेदवारांची घोषणा

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पाचवी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

शरद पवार गटाकडून माढा, पंढरपूर आणि मोहोळच्या सस्पेन्सवर पडदा, आणखी 5 उमेदवारांची घोषणा
Sharad Pawar
| Updated on: Oct 29, 2024 | 12:42 PM
Share

Sharad Pawar Candidate List : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पाचवी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाने नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन पाचवी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत शरद पवारांकडून माढा, पंढरपूर आणि मोहोळमधील सस्पेन्सवर अखेर पडदा टाकला आहे. शरद पवारांनी माढा मतदारसंघातून अभिजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, संजय बाबा कोकाटे, अॅड. मिनल साठे हे इच्छुक होते. पण शरद पवारांनी अभिजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

शरद पवार गटाची यादी 

अभिजीत पाटील – माढा

संगीता वाजे – मुलुंड

गिरीश कराळे – मोर्शी

अनिल सावंत – पंढरपूर

राजू खरे – मोहोळ

पंढरपुरातून महाविकासाघाडीकडून दोन उमेदवार रिंगणात

तर दुसरीकडे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून महाविकासाआघाडीचे दोन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून यापूर्वीच काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवारांनी नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते अकलूज येथे अनिल सावंत यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.

चौरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार?

यामुळे पंढरपूर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. भाजपकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे, मनसेकडून दिलीप धोत्रे, काँग्रेसकडून भगीरथ भालके आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत हे पंढरपूरच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या चौरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार गटाचे  88 उमेदवार रिंगणात

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आतापर्यंत 88 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यातील पहिल्या यादीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 45 उमेदवारांची नावाची घोषणा करण्यात आली होती. तर दुसऱ्या यादीत 22, तिसऱ्या यादीत 9, चौथ्या यादीत 7 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. यानंतर आता पाचव्या यादीत शरद पवारांकडून 5 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या उमेदवारामध्ये माढा मतदारसंघातून अभिजीत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पंढरपूर-मंगळवेढा मतदारंसघातून अनिल सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....