AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुका जाहीर होण्याआधीच वंचितची पहिली यादी जाहीर, रावेरमधून तृतियपंथीयाला उमेदवारी; यादीत कोण कोण?

आता वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

निवडणुका जाहीर होण्याआधीच वंचितची पहिली यादी जाहीर, रावेरमधून तृतियपंथीयाला उमेदवारी; यादीत कोण कोण?
| Updated on: Sep 21, 2024 | 2:09 PM
Share

Vanchit Bahujan Aghadi First Candidate list : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र निवडणुकांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्वच पक्षांकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात वंचितने राज्यातील ११ जागांवर उमेदवार दिले आहेत. यात प्रामुख्याने रावेर, नागपूर दक्षिण मध्य, वाशिम, शिंदखेड राजा, शेवगाव, नांदेड दक्षिण या जागांचा समावेश आहे.

रावेर मतदारसंघातून तृतीयपंथी उमेदवार रिंगणात

विशेष म्हणजे वंचितने रावेर मतदारसंघातून तृतीयपंथी उमेदवार रिंगणात उतरवला आहे. शमिभा पाटील असे वंचितच्या रावेर मतदारसंघातून लढणाऱ्या उमेदवाराचे नाव आहे. शमिभा भानुदास पाटील या एक मराठी पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या असून, तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक संस्थापक आहेत. त्या 2019 पासून वंचित बहुजन आघाडी सोबत सक्रिय असून काम करत आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे पहिले उमेदवार

  • रावेर – शमिभा पाटील
  • शिंदखेड राजा – सविता मुंढे
  • वाशिम – मेघा किरण डोंगरे
  • धामणगाव रेल्वे – निलेश विश्वकर्मा
  • नागपूर दक्षिण मध्य – विनय भागणे
  • साकोली – डॉ. अविनाश नान्हे
  • नांदेड दक्षिण- फारुख अहमद
  • लोहा – शिवा नारांगले
  • औरंगाबाद पूर्व- विकास रावसाहेब दांडगे
  • शेवगाव – किसन चव्हाण
  • खानापूर – संग्राम कृष्णा माने

देवेंद्र फडणवीसांविरुद्धही  दिला उमेदवार

तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही उमेदवार दिला आहे. नागपूर दक्षिण मध्य या विधानसभा मतदारसंघातून विनय भागणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे नागपूर दक्षिण मध्य विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस विरुद्ध विनय भागणे अशी लढत होणार आहे.

BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.