
संसदेत काल धक्का-बुक्की झाली. त्यात भाजपचा एक खासदार जखमी झाला. त्याने राहुल गांधी यांनी ढकलल्यामुळे आपण पडलो, असा आरोप केला. कालच्या या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोठा निर्णय घेतला आहे. संसदेच्या कोणत्याही प्रवेशद्वारावर निदर्शन करता येणार नाहीत. सर्व खासदारांना दिल्या सूचना. कोणतीही अडवणूक किंवा निदर्शन आंदोलन न करण्याची सक्ती. काल भाजप आणि इंडिया आघाडीचे खासदार एकमेकांसमोर भिडल्यानंतर लोकसभा अध्यक्षांचा निर्णय. पुणे लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला गती येणार. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव राज्य सरकार सोबत बैठक करणार. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या पुणे लोणावळा लोहमार्गावरील ट्रॅकला आता गती मिळणार आहे.
नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत कंपनीला आग लागली आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं आहे. सध्यातरी कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही.
सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी उद्या शरद पवार हे बीडच्या मस्साजोग येथे येत आहेत. त्याच अनुषंगाने बीड पोलीस सतर्क झाले आहेत. उद्या सकाळी दहा वाजता शरद पवार देशमुख कुटुंबाशी संवाद साधणार आहेत, त्याच पूर्वी पोलिसांनी गावाची पाहणी केली आहे.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. ते वर्षानुवर्षे राज्याच्या राजकारणात सक्रिय राहिले आणि चौधरी देवीलाल जी यांचे कार्य पुढे नेण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. या दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना आणि समर्थकांप्रती माझ्या मनापासून संवेदना. ओम शांती.
दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवून संसदेतील हाणामारीचा तपास सुरू केला आहे.
नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत कंपनीला आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीचे कारण अजून समोर आले नाही.
सांगलीमध्ये द्राक्षाचा हंगाम अद्याप सुरू झाला नाही.मात्र निर्यातक्षम द्राक्ष तयार होऊन आता रवाना होऊ लागले आहेत, आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील प्रगतशील शेतकरी अरविंद माळी यांच्या द्राक्षे दुबईकडे रवाना झाली आहेत.
पुणे ताम्हिणी घाटात बस अपघात झाला. त्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू तर २७ जण जखमी झाले आहे. माणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ताम्हीणी घाटात हा अपघात झाला.
कल्याण पश्चिमेत मराठी कुटुंब मारहाण प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी दोन आरोपीला घेतले ताब्यात घेतले आहे. एकूण दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
“परभणीत पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलंय. संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोम्बिंग ऑपरेशनचे आमच्याकडे फुटेज आहेत. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली. सोमनाथच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मल्टिपल इन्ज्युरीचा उल्लेख आहे,” असं नितीन राऊत म्हणाले.
बीड- आरोपींना उद्या संध्याकाळपर्यंत अटक करा. संतोष देशमुखांचं उद्या तेरावं, त्याआधी आरोपींना अटक करा, अशी मागणी संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी सरकारकडे केली आहे. “सर्वकाही सहन करण्यापलीकडे गेलंय. वाल्मिक कराडच्या नावानं बाहेरून खंडणी मागायला आले होते”, असं ते म्हणाले.
“बीडमध्ये वाळू माफिया, उद्योगांना त्रास देणाऱ्यांविरोधात मोहीम राबवू. बीडमध्ये गुन्हे करणाऱ्यांची पाळंमुळं शोधून काढू. गुन्हेगारांवर मकोका लावू. एसआयटी संपूर्ण चौकशी करेल. बीड हत्या प्रकरणात बीडच्या एसपींची बदली करण्यात आली. सहा महिन्यांत बीड प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल,” असं फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं.
“सरपंचाचा भाऊ विष्णू चाटेच्या संपर्कात होता. विष्णू चाटे आता सोडू असं सांगायचा पण ते सोडत नव्हते. कंपनीच्या फिर्यादीत वाल्मिक कराडनं धमकी दिल्याचं नमूद आहे. वाल्मिक कराडनं 2 कोटी रुपये मागण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या घटनेतील मास्टरमाईंडवर कारवाई केली जाईल. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर कारवाई होणार. बीड हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असेल तरी कारवाई होईल,” असं आश्वासन फडणवीसांनी दिलं.
“बीडचं प्रकरण गंभीर असून संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाली. त्यांच्या हत्येमागची पाळंमुळं शोधली पाहिजे. कंत्राटं मिळवण्यासाठी खंडणी मागितली जाते. आरोपी मारहाण करत असल्याची तक्रार संतोष देशमुखांकडे केली गेली. टोलनाक्यावरून संतोष देशमुखांची गाडी निघाली. त्यांना स्कॉर्पिओ गाडीत टाकलं आणि गाडीमध्येच देशमुखांना मारहाण करण्यात आली. तारांनी संतोष देशमुखांना मारहाण झाली. पुढे गाडीतून उतरूनही देशमुखांना मारहाण झाली. डोळ्यांवर मारलं पण डोळे जाळण्यात आले नाहीत,” असं फडणवीसांनी सांगितलं.
“सोमनाथ सूर्यवंशी लॉचं शिक्षण घेत होते. जाळपोळ करताना दिसल्यानं सोमनाथ सूर्यवंशीला अटक झाली. सोमनाथला विचारलं गेलं की थर्ड डिग्रीचा वापर झाला का? त्याला श्वसनाचा दूर्धर आजार होता. सोमनाथला दोन वेळा मॅजिस्ट्रेटसमोर हजर केलं गेलं. कोठडीत कुठेही सोमनाथला मारहाण झाल्याचं दिसत नाही. सोमनाथच्या अंगावर जुन्या जखमा होत्या. सोमनाथच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत केली जाईल. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी केली जाईल,” असं आश्वासन फडणवीसांनी दिलं.
“परभणीत संविधानाची प्रतिकृती तोडणारा मनोरुग्ण होता. आरोपी मनोरुग्ण आहे की नाही याची 4 डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. आरोपीवर 2012 पासून उपचार सुरू आहे. पोलीस निरीक्षक घोरबांडला निलंबित केलं. अतिरिक्त बळाचा वापर केल्यानं निलंबित केलं. कोम्बिंग ऑपरेशन कुठेही केलं गेलं नाही”, असं फडणवीसांनी निवेदनात स्पष्ट केलं.
बीड आणि परभणीतील घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिलं. यावेळी ते म्हणाले, “परभणीत संविधानाची प्रतिकात्मक प्रत तोडली गेली. परभणीत जमाव आक्रमक झाला, दगडफेक झाली. 11 डिसेंबरला परभणी बंद पुकारला गेला. काही आंदोलकांनी टायर जाळायला सुरुवात केली. 300-400 आंदोलक जमले, मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. पोलिसांनी परभणीत जमावबंदी घोषित केली, लाठीचार्ज केला. काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला, तिथे तोडफोड केली. दगडफेक, जाळपोळ करणाऱ्या 51 लोकांना ताब्यात घेतलं. पुरुषांना अटक झाली, महिलांना नोटीस देऊन घरी सोडण्यात आलं. जे व्हिडीओ फुटेजमध्ये तोडफोड करणारे दिसले त्यांच्यावर कारवाई झाली.”
कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याने विधानसभेत त्याची प्रतिक्रिया उमटली. एकच गोंधळ झाला.
हे सरकार कुणाचेच नाही, तर ईव्हीएमचे सरकार आहे. मराठी माणसावर हल्ले होत असल्याने आदित्य ठाकरे हे आक्रमक झाले. त्यांनी हे वक्तव्य केले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील बाभळेश्वर भागात नगर – मनमाड महामार्गावर धावणारा ट्रक घरात घुसला. हॉटेल अजितजवळ ही घटना घडली. रात्री तीन वाजेच्या दरम्यान घटना घडली. घरात चारजण झोपलेले होते.सुदैवाने कुणालाही इजा नाही.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. मोदी यांनी मोहोळ कुटुंबाची आस्थेने चौकशी केली. मोदींनी मोहोळ कुटुंबांशी मराठी भाषेत संवाद साधला.मोहोळ यांच्याकडून दगडूशेट हलवाई गणपतीची मूर्ती मोदी यांना भेट देण्यात आली.मोहोळ यांच्या आईच्या तब्येतीची मोदी यांनी चौकशी केली.
डी फॉर डॉन, बीडमध्ये बॉस कुणाला म्हणतात, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आव्हाड आक्रमक झाले आहेत. पंकजा मुंडे अशा कोणत्याही प्रकारात नसतील असा मला विश्वास असल्याचे ते म्हणाले.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन सुरू केले आहे. भाजपाविरोधात हे आंदोलन होत आहे. मविआने हे आंदोलन सुरू केले आहे. तर दुसरीकडे संसदेबाहेर इंडिया आघाडीने भाजपाविरोधात आंदोलन केले.
देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी यांनी मराठी माणसाची फळी फोडली. मराठी माणसाची लढण्याची ताकद नष्ट व्हावी आणि आजूबाजूचा परिसर अदानी लोढा गुंडेच्या इतर मराठी बिल्डर व्यापाऱ्यांच्या घशात घालावा यासाठी मोदी शहा फडणवीस मराठी माणसाला कमजोर करत आहेत. कालच्या विधानसभा निवडणुकीनंतर मराठी माणसांवरचे हे हल्ले वाढत चालले आहेत.
सत्ताधारी पक्षाचे लोक जाऊन विरोधकांचे कार्यालय फोडतात, ही तर सत्तेची मस्ती आहे, अशी टीका विजय वडेट्टीवर यांनी केली. याप्रकरणी अजूनही कडक कारवाई होत नाहीये. मराठी माणसावर हल्ला होतो, कोणालाही अटक होत नाही, त्यावरूनही वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.
नवी दिल्ली – विजय चौकात इंडिया आघाडीतील खासदारांच आंदोलन. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे सर्व खासदार आंदोलनात सहभागी. जय भीमचा नारा देत सर्व खासदार रॅलीने संसदेकडे रवाना झाले. अमित शहा यांनी माफी मागून राजीनामा दिलाच पाहिजे, अशी सर्वपक्षीय खासदारांची मागणी आहे.
कालच्या मराठी माणसावरील हल्ल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. आपण महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे प्रतिनिधी आहात ना, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशी टीका राऊतांनी केली.
कल्याणमध्ये मराठी माणसावर परप्रांतीयांनी काल हल्ले केले. कल्याणमध्येच नव्हे तर मुंबईतही अशा घटना घडल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना निर्माण केली. भारतीय जनता पक्षाने, नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाची संघटना फोडून महाराष्ट्र आणि मराठी माणूस कमजोर केला, असा आरोप संजय राऊतांनी केला.
भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्याने आर्य वैश्य कोमटी समाज आक्रमक. सुधीर मुनगंटीवार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी आर्य वैश्य कोमटी समाजाच्या वतीने श्री विठ्ठल मूर्तीला दुग्धाभिषेक घालून महाआरती करत घातले साकडे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सुबुद्धी मिळावी आणि सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी पंढरपुरात श्री विठ्ठल मूर्तीला दुग्धाभिषेक घालून महाआरती.
संसदेच्या कोणत्याही प्रवेशद्वारावर निदर्शन करता येणार नाहीत. सर्व खासदारांना दिल्या सूचना. कोणतीही अडवणूक किंवा निदर्शन , आंदोलन न करण्याची सक्ती. काल भाजप आणि इंडिया आघाडीचे खासदार एकमेकांसमोर भिडल्यानंतर लोकसभा अध्यक्षांचा निर्णय.
मुंबई परिसरात गुलाबी थंडी वाढली आहे. मुंबईच्या तापमानात फारशी घट झाली नसली तरी किमान तापमानात बऱ्यापैकी घट झाली आहे. वारेही संथ गतीने वाहत असून वातावरणात मोठ्या प्रमाणात आद्रता ही आहे. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम मुंबईच्या हवा गुणवत्तेवर झाला असल्याची माहिती हवामान विभागाकडून मिळाली आहे.
परभणी प्रकरणावर आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलणार. परभणी घटनेला घडून दहा दिवस उलटले. दोषी पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंबेडकर अनुयायांनी कालपासून लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू केलय. सकाळी 11 ते दुपारी चार अशा वेळेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर येथे दररोज आंदोलन करण्यात येणार.