AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुठे किती कॉपी केसेस, किती शिक्षकांवर घरी बसण्याची वेळ? आकडेवारी हैराण करणारी

Maharashtra Board 10th Result 2026 Declared : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतंच पत्रकार परिषद घेत परीक्षेदरम्यान किती गैरप्रकार घडलेत याची आकडेवारी सांगितली आहे, जी हैराण करणारी आहे.

कुठे किती कॉपी केसेस, किती शिक्षकांवर घरी बसण्याची वेळ? आकडेवारी हैराण करणारी
| Updated on: May 08, 2026 | 12:16 PM
Share

Maharashtra Board 10th Result 2026 Declared : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या विभागातून लाखो विद्यार्थांनी परीक्षा दिला. पण परीक्षांदरम्यान अनेक गैरप्रकार देखील उघडकीस आले आणि याचा फटका अनेक कर्मचाऱ्यांना बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात चार ठिकाणी एफआयआर दाखल झाले आहे.

विद्येचं माहेर घर असलेल्या पुण्यात 3 एफआयआर दाखल झालेत, तर, लातून येथे 1 एफआयआर दाखल झाला आहे. याप्रकरणी पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजी नगर येथून एक, कोल्हापूर येथून २ आणि लातूर येथील देखील २ कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यामुळे त्यांच्यावर घरी बसण्याची वेळ आहे.

तर गैरप्रकार घडल्याची संख्या फार मोठी आहे. 402 गैरप्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. पुणे ४२, नागपूर ४६ , छत्रपती संभाजी नगर ७१, मुंबई ४४ , कोल्हापूर ४, अमरावती ६७, नाशिक ८२ आणि लातूर ४२ अशी संख्या समोर आली आहे.

दहावीच्या निकालांबद्दल सांगायचं झालं तर, १६ लाख १६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये १४ लाख ५२ हजार २४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे यंदाच्या वर्षी देखील मुलींनी बाजी मारली आहे. तर मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ५.४० टक्क्यांनी अधिक लागला आहे. ९४.९६ टक्के मुली पास झाल्या आहेत.

१०० टक्के निकाल लागलेले विद्यार्थी

मिळालेल्या माहितीनुसार १७९ विद्यार्थ्यांचा निकाल 100 टक्के लागला आहे. पुण्यात १२ विद्यार्थी 100 टक्क्यांनी पास झाल्या आहेत. नागपूर ३, संभाजीनगर २४, मुंबई ५, कोल्हापूर १५, अमरावती ३, नाशिक ६, लातूर १०४, कोकण मध्ये ७ विद्यार्थी 100 टक्क्यांनी पास झाले आहेत.

टेलिमानस हेल्पलाईन- 14416 मनोदर्शन हेल्पलाईन- 8448440632

या नंबरवर समुपदेशनासाठी पालक-विद्यार्थ्यांसाठी सेवा उपलब्ध आहे. एससीईआरटीमार्फत 315 समुपदेशक नेमले आहेत. तर गेल्या परीक्षपर्यंत मार्कशीट आणि सर्टिफिकेट वेगवेगळे छापण्यात येत होते. आता एकाच पेपरवर विद्यार्थ्यांना मार्कशीट आणि सर्टिफिकेट मिळणार आहेत.

Follow Us
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन