
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
पालघर : वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपली कंबर कसली आहे. येणारी महापालिका निवडणुकीत कुणासोबतही युती न करता भाजपा स्वबळावर 115 जागा लढविणार असल्याची घोषणा भाजपाचे आमदार तथा वसई विरार प्रभारी प्रसाद लाड यांनी आज नालासोपाऱ्यात केली. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचा पगडा आहे. भाजप सेनेची युती आणि हा परिसर सेनेकडे असल्यामुळे आम्ही इकडे जास्त लक्ष दिले नाही. ती आमची चूक झाली. पण आता हितेंद्र ठाकूर यांच्या बविआच्या विरोधात जनतेसाठी सक्षम पर्याय म्हणून भाजपा मैदानात उतरली आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आम्ही स्वबळावर सत्ता स्थापन करू असा विश्वासही प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.
अमरावती : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण
या प्रकरणाचा तपास डीवायएसपी दर्जाच्या अधिकार्याकडे
सायंटिफिक तपास करण्याच्या दृष्टिकोनातून फॉरेन्सिक लॅबच्या दोन टीम धारनी रवाना
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांची माहिती
जळगाव – महावितरण कार्यालयातील अधीक्षक अभियंत्याला मारहाण करणे तसेच अधिकाऱ्याला बांधून ठेवणे या आरोपाखील गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह इतर 30 शेतकऱ्यांना पोलीस काठोडी देण्याता आली.
देवेंद्र फडणवीस पत्रकाराशी संवाद साधत आहेत. नवाब मलिक का चिंतेत आहेत हे मला माहिती आहे. फोन टॅपिंगचा रिपोर्ट हा केंद्र सरकारकडे दिलेला आहे. त्यामुळे आता अनेकांचं बिंग फुटणार आहे. हा रिपोर्ट खरं पाहायचं झालं तर नवाब मलिक यांनीच फोडाला आहे. सिंडिकेट राज्य चालवल्याने, बदल्यांसाठी दलाली घेतल्यामुळे आणि सचिन वाझे सारख्या लोकांना सेवेत घेऊन सिंडिकेट राज्य चालवल्याने महाराष्ट्र सरकार बदनाम झाले की त्यांचे नाव झाले हा प्रश्न आहे. हे सगळे वाझेंचे मालक चिंतेत आहेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
सचिन सावंत काहीही बोलतात. त्याच्या प्रश्नाला कशाला उत्तरं द्यायची. नागपुरात कोरोनाची स्थिती सद्या गंभीर आहे. लोकांसाठी बेड्स नाहीयेत. प्रशासनाला पूर्ण सक्रिय मोडमध्ये न्यावे लागेल. लोकांना आता मदत करावी लागेल. लोकांना आता धीर देण्याची गरज आहे.
पोलिसांचे जे सीसीटीव्ही आहेत. त्यांचा संपूर्ण बॅकअप हा मेन सर्व्हरला आहे. त्यामुळे सीसीटीव्हीचे फुटेज गायब होऊ शकत नाहीत. खासगी डीव्हीआर नष्ट करणे सोपे आहेत. मात्र, मुंबई पोलिसांचे सीसीटीव्ही आणि फुटप्रिंट अशा प्रकारे स्टोअर केले जाते, जो एक माणूस नष्ट करु शकत नाही.
सध्या एनआयएकडून मनसुख हिरेन मृत्यू आणि अंबानी धमकी प्रकरणाचा तपास सुरु आहे. वाझेंचे मालक हेच आहेत. या चौकशीतून काय बाहेर येईल हे माहीत नसल्यामुळे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. एनआयए चौकशी करत आहे. लवकरच सगळ्या गोष्टी बाहेर येतील.
चंद्रपूर:- जिल्ह्यात होळीच्या पार्श्वभूमीवर दारू जप्तीच्या कारवायांमध्ये वाढ
जिल्ह्यात जप्त केलेला दारूसाठा नष्ट करण्याची कारवाई सुरू
रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त दारूसाठा रोडरोलर खाली केला नष्ट
सुमारे 17 लाख रुपयांच्या साठ्यावर न्यायालयीन आदेशाने बुलडोझर
3 वर्षांत 53 गुन्ह्यातील दारूसाठा अज्ञात स्थळी नष्ट करण्यात आला.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची पत्रकार परिषद
जर एका बिल्डींगमध्ये पाच रुग्ण आढळले तर ती सोसायटी सील केली जाणार
कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे
विनाकारण नागरिक घराबाहेर पडत आहे.
वर्क फॉर्म होमच्या सूचना दिल्या आहेत.
तुम्ही स्वत:ला सावरा, आम्ही सर्व यंत्रणा तयार ठेवली आहे. पण तुम्ही स्वत:ला सांभाळा
एंटालिया कार स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरण मृत्यू प्रकरण
वाजेंच्या वकील एन आय ए कार्यालयात
सचिन वाझे 3 एप्रिलपर्यंत NIA कोठडीत
डोंबिवली :
डोंबिवलीत व्यापारी आणि दुकानदार उतरले रस्त्यावर
डोंबिवली पालिका समोरील रस्ता केला बंद
महापालिकेने दुकानबंद केल्याने केला विरोध
अंबरनाथ ब्रेकिंग :
अंबरनाथमध्ये रासायनिक कंपनीच्या भूमिगत टाकीत सफाईसाठी उतरलेल्या तीन कामगारांचा मृत्यू
टाकीत असलेल्या गॅसमुळे गुदमरून झाला कामगारांचा मृत्यू
अंबरनाथ पश्चिमेच्या आयटीआय जवळील कंपनीतील घटना
कलरच्या कामासाठी बोलावून टीम कामगारांना केमिकलच्या भूमिगत टाक्या साफ करायला उतरवलं
घटनेत हर्षद, बिंदेश, दिनेश या तीन उत्तर प्रदेशच्या कामगारांचा मृत्यू
ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे गेला तीन कामगारांचा बळी
नाशिक –
प्रवीण दरेकरांचा पाहणी दौरा सुरु
पठावे गावाला भेट देत गारपिटीने झालेल्या नुकसानी चे करत आहे पाहणी
दरेकरांनसोबत भाजप देवळ्याचे आमदार दिपील बोरसे, चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर सोबत
पुणे –
कॅम्पातील फॅशन स्ट्रीटला लागलेली आग विझवून घरी जाताना अग्निशमन अधिकाऱ्याचा दुर्देवी अपघाती मृत्यू
प्रकाश हसबे असे मृत्युमुखी पडलेल्या अधिकाऱ्याचे नाव
हसबे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाचे प्रमुख
आग विझल्यानंतर ते पहाटे घरी जात असतानाच येरवड्या जवळ त्यांच्या वाहनाचा अपघात
विरारच्या जीवदानी गडावर वणवा पेटला
फनीक्युलर ट्रेनच्या ट्रकपर्यंत आगीचे लोळ
सुदैवाने जीवितहानी नाही
वसईच्या डोंगराळ भागात आगीचे सत्र सुरूच
सांगली-
सोशल मीडियावर पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी 2 जणांवरं गुन्हा दाखल
कसीनो जुगारावर पैसे लावून तो जुगार खेळून पोलीस दरमहा हप्ते घेतात असा त्याचा विडिओ केला आणि सोशल मीडियावर केला व्हायरल
सांगली शहर पोलिसांनी आज्ञेत 2 जना वर केला गुन्हा दाखल
मुंबईतील प्रभादेवीत इलेक्ट्रिक वायर गोडाऊनला आग
16 फायर इंजिन घटनास्थळी दाखल
तळ मजला आणि बेसमेंटमध्ये लागली आग
एडीओ पवार आणि शिर्केसहीत 12 अधिकारी घटनास्थळी दाखल
आग मोठी आहे, आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु
कोल्हापूर :
गोकुळ निवडणुकीमुळे जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या शाहू शेतकरी आघाडीत अवघ्या चार दिवसात फूट
माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी सोडली शाहू आघाडीची साथ
गोकुळ निवडणुकीत सत्ताधार्यां सोबत राहणार असल्याच केल स्पष्ट
आमदार पी एन पाटील,आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सरूडकरांचा निर्णय
आमदार प्रकाश आबिटकर आणि राजेश पाटील देखील नाराज
आघाडीत राहण्याबाबत दोघेही आज निर्णय घेणार
गोकुळ मधील विरोधकांना एकत्र आणण्याचा पालकमंत्री सतेज पाटील यांचा प्रयत्न मात्र तालुका स्तरावरील राजकारण येऊ लागलय आडव
गळतीमुळे शाहू आघाडीत अस्वस्थता
पुणे
महापालिकेला मिळकतकरातून आतापर्यंत 1 हजार 515 कोटी रुपयांचे उत्पन्न
गेल्या वर्षी याच दिवसापर्यंत मिळकतकारातून १ हजार २६२ कोटी रुपये महापालिके च्या तिजोरीत जमा
दरम्यान, महापालिके ने ४९२ मिळकतींवर जप्तीची कारवाई के ली असून नऊ मिळकतींची लिलाव प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला
दरम्यान, आर्थिक वर्षांसाठी कर भरणा करण्यासाठी सात दिवस राहिल्यामुळे सुट्टीच्या दिवशी कर भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार
महापालिका हद्दीत समाविष्ट ११ गावांसह मिळकतींची संख्या ११ लाख ३ हजार ८९ एवढी आहे.
पुणे
सोमवारी धुलीवंदनानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला, फुल, केळी आणि पान बाजार बंद
शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणू नये, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव सतिश कोंडे यांचे आवाहन
पुण्यातील फॅशन स्ट्रीटला लागलेली भीषण आग तीन तासांनी आटोक्यात
अग्निशमन दलाच्या 16 गाड्यांनी तीन तासांच्या अथक परिश्रमाने मिळवले आगीवर नियंत्रण
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही
फॅशन स्ट्रीट मार्केटमधील तब्बल 800 दुकानं आगीच्या कचाट्यात सापडली
आगीमुळे व्यापारांचे करोडो रुपयांचे नुकसान