Maharashtra Breaking News in Marathi : नायगावमध्ये ऍक्टिव्हा गाडी चोरून नेताना चोरटा सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Mar 24, 2024 | 7:07 AM

Maharashtra Breaking News in Marathi : आज 23 मार्च 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News in Marathi : नायगावमध्ये ऍक्टिव्हा गाडी चोरून नेताना चोरटा सीसीटीव्हीत कैद

आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा या ब्लॉगमधून घेणार आहोत. शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांनी मुंबईत बोलावलेल्या बैठकीत ते पक्षप्रवेश करणार आहेत. पुणे विद्यापीठात ठाकरे गटाच्या युवासेनेची विद्यार्थ्याला मारहाण झालीय. व्हॉट्सऍप पोस्ट डिलीट केल्याच्या किरकोळ वादावरून विद्यार्थ्याला मारहाण झाली आहे. यासह लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध घडामोडी घडत आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Mar 2024 09:49 PM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यात भर दिवसा मोठा दरोडा

    नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात भर दिवसा मोठा दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. शहादाहून तळोदाच्या दिशेने सोन घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याला बंदुकाचा धाक दाखवत लुट झाल्याची माहिती समोर आली आहे. शहादा शहरापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर घटना घडली. व्यापारांकडे अंदाजे 1 किलो आणि 400 ग्राम सोनं असल्याची प्राथमिक माहिती आहे. अंदाजे 1 कोटी रुपयांची सोन्याची चोरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शहादा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

  • 23 Mar 2024 08:56 PM (IST)

    शाहजी बापू पाटलांना घरातच धक्का, सख्खा पुतणा शरद पवार गटात जाणार

    सोलापूर | शिंदे गटाचे आमदार शाहजी बापू पाटलांना घरातच धक्का बसणार असल्याची माहिती समोर येत आहे. आमदार शहाजी बापू पाटलांचे सख्खे पुतणे संग्रामसिंह पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार आहेत. संग्रामसिंह पाटील उद्या शरद पवारांना भेटून पक्ष प्रवेश करणार आहेत. संग्रामसिंह यांना शरद पवारांची विचारसरणी पटते म्हणून उद्या पक्ष प्रवेश करणार अशल्याची माहिती समोर येत आहे.

  • 23 Mar 2024 04:47 PM (IST)

    शिर्डी मतदारसंघ शिवसेनेचा - श्रीकांत शिंदे

    ठाणे : कोण कुठून निवडणूक लढवणार हे येत्या दोन दिवसात कळेल. शिर्डीमध्ये आमचे विद्यमान खासदार आहे आणि येणाऱ्या काळात त्या ठिकाणी शिवसेनाचं निवडणूक लढवेल. मराठा समाजासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या ज्या सूचना होत्या त्या सूचनेवर सरकार सकारात्मक होत. सरकारने सगळ्यांवर निर्णय घेतला आहे. महायुती हे पहिले सरकार आहे ज्याने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.

  • 23 Mar 2024 04:35 PM (IST)

    मुंबई नियोजित थीम पार्कची आयुक्त यांनी केली पाहणी

    मुंबई : मुंबई महानगर पालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या महालक्ष्मी रेसकोर्स येथील नियोजित थीम पार्कची आयुक्त भूषण गगराणी यांनी पाहणी केली. या भेटीनंतर संबंधित खात्यांना त्यांनी योग्य ते निर्देश दिले आहेत. या भेटीनंतर मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या प्रगतिपथावरील कामाचीदेखील त्यांनी पाहणी केली.

  • 23 Mar 2024 04:24 PM (IST)

    काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचा कॉर्नर सभांचा धडाका

    सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गीत बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचे विद्यमान खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यावर टिका केलीय. मागच्या दहा वर्षात भाजपने काय केलं..? एक योजना जरी सांगितली तरी मी खाली बसेन असे आव्हान त्यांनी दिले.

  • 23 Mar 2024 04:06 PM (IST)

    बीडमध्ये शरद पवार गटाचा निष्ठावंत मेळाव्यात नाराजीचा सूर

    बीड : शरद पवार गटाचा निष्ठावंत मेळावा आंबेजोगाई येथे पार पडला. यावेळी लोकसभेचे इच्छुक उमेदवार नरेंद्र काळे यांनी बजरंग बप्पा सोनवणे यांच्या पक्षप्रवेशावर उघड नाराजी व्यक्त केली. बीड लोकसभेमध्ये शरद पवार पक्षाकडून बजरंग बप्पा सोनवणे आणि ज्योती मेटे यांच्या उमेदवारी आघाडीवर असताना शरद पवार पक्षामध्ये देखील आता निष्ठावंतांनी आपल्या नाराजीचा सूर आळवला आहे.

  • 23 Mar 2024 02:52 PM (IST)

    निलेश लंके यांची मविआच्या बैठकीला हजेरी

    निलेश लंके अहमदनगरच्या राष्ट्रवादी भवन येथे दाखल. राष्ट्रवादी भवन येथे "महाविकास आघाडी"ची महत्वाची बैठक. आ.निलेश लंके यांनी "मविआ" बैठकीला हजेरी लावल्याने, ते शरद पवार गटात जाणार यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब. माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे , माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची बैठकीला उपस्थिती.

  • 23 Mar 2024 02:48 PM (IST)

    सुजयच्या विजयात शिवेसनेचा सिंहाचा वाटा राहिल ही ग्वाही - दादा भुसे

    अहमदनगर - महायुतीचे जिथे उमेदवार तिथे आम्ही उभे राहू. रात्रदिवस कष्ट करून आपल्याला सुजय विखे पाटील यांना निवडुन आणायचे आहे. अहमदनगरची शिवसेना म्हटली की अनिलभैय्या राठोड आठवतात. स्व.अनिल भैय्या राहिले असते तर ते देखील शिंदेसोबत असते. शेतकरी आणि महिलांसाठी राज्य सरकारने अनेक योजना दिल्या. किंतू परंतू बाजुला ठेवून महायुतीचा विजय करायचा आहे. श्रीकांत शिंदे यांना ताप असताना , तब्यत बरी नसताना ते आले आहेत. त्यांना बोलण्याचा त्रास मात्र ते आपला ‌संदेश देतील.सुजयच्या विजयात शिवेसनेचा सिंहाचा वाटा राहिल ही ग्वाही - दादा भुसे

  • 23 Mar 2024 02:05 PM (IST)

    नायगावमध्ये ऍक्टिव्हा गाडी चोरून नेताना चोरटा सीसीटीव्हीत कैद

    वसई - नायगावच्या अमोल नगर परिसरातील कमल सागर सोसायटीत 22 मार्च रोजी मध्यरात्री दुचाकी चोरताना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिस तपास करीत आहेत.

  • 23 Mar 2024 01:52 PM (IST)

    प्रकाश अण्णा शेंडगे यांनी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली

    प्रकाश अण्णा शेंडगे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आबेडकर यांची राजगृह येथे भेट घेतली आहे. ह्या निवडणुकीत तिसरी आघाडी होईल आणि राज्यात राजकीय भूकंप होईल अस भाकीत त्यांनी केल आहे.

  • 23 Mar 2024 12:54 PM (IST)

    शिवाजीराव आढळराव पाटील यांचे मोठे विधान

    सुनील तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे माझा पक्षप्रवेश हा माझ्या मतदारसंघात 26 तारखेलामोठ्या प्रमाणात होणार आहे, असे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले.

  • 23 Mar 2024 12:40 PM (IST)

    कल्याण पूर्वेतील कचोरे गावदेवी मंदिरात चोरी

    भर दिवसा चोरटे आले देवीची पूजा केली आणि देवीच्या चांदीच्या पादुकाची चोरी केली. ही चोरीची घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झालीये, टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

  • 23 Mar 2024 12:10 PM (IST)

    किरीट सोमय्या यांनी केले मोठे विधान

    अरविंद केजरीवाल आत गेले संजय राऊत वाचले. संजय राऊत परिवार यांनी देखील दारूचा धंदा सुरू केला होता, असे भाजप नेते  किरीट सोमय्या यांनी म्हटले.

  • 23 Mar 2024 12:03 PM (IST)

    भागवत कराड यांनी केली जोरदार टीका

    एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांना यावेळी आम्ही संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातुन हद्दपार करणार आहोत, माजी खासदार चंद्रकांत खैरे हे आता पुन्हा कधीही निवडून येणार नाहीत, चंद्रकांत खैरे हे दिवास्वप्न पाहत आहेत, खैरे हे आता कायमस्वरूपी माजी खासदार असणार आहेत, असे भागवत कराड यांनी म्हटले आहे.

  • 23 Mar 2024 11:59 AM (IST)

    Maharashtra News | शिवाजीराव आढळराव पाटील कधी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार?

    शिवाजीराव आढळराव पाटील 26 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील. शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर शिरुरमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या अमोल कोल्हेंच आव्हान आहे.

  • 23 Mar 2024 11:55 AM (IST)

    Maharashtra News | गिरीश बापटांचा फोटो वापरल्यावरून गोऱ्हेची धंगेकरांवर टीका

    काही लोकं फोटो वापरत आहेत, रविंद्र धंगेकरांनी गिरीश बापटांचा फोटो वापरला, मात्र मला असं वाटतं गिरीश बापट त्या फोटोतून सांगत असणार याला मतदान करू नका, धंगेकरांनी असं केलं, तर निकालाच्या दिवशी त्यांना बापटांच्या फोटोजवळ अश्रू ढाळावे लागतील, गिरीश बापटांचा फोटो वापरल्यावरून गोऱ्हेची धंगेकरांवर टीका

  • 23 Mar 2024 11:51 AM (IST)

    Maharashtra News | मराठ्यांना काही द्यायचे म्हटले की खूप जणांचे पोट दुखते - मनोज जरांगे पाटील

    "मराठा समाजावर खोट्या केसेस करायच्या. आचारसंहिते अगोदर झालेली कॅबिनेट सग्या सोयऱ्यांची होती. काय झाले माहीत नाही, पण सरकारने अंमलबजावणी केली नाही. मराठ्यांना काही द्यायचे म्हटले की खूप जणांचे पोट दुखते. पण नेमके मराठा आरक्षणाच्या कोण आडवे येते तेच कळत नाही. आता आचारसंहिता लागलेली आहे आणि आता बैठका लावत आहेत. जे 10 टक्के आरक्षण दिले ते घ्यावे असे त्यांचे म्हणणे आहे. फडवणीस यांचे नाव घेतले की त्यांना राग येतो. तुम्ही करून करून काय करणार जेल मध्ये टाकणार" असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

  • 23 Mar 2024 11:49 AM (IST)

    Maharashtra News | उदयनराजे भोसले आज अमित शहा यांना भेटणार

    राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आज अमित शहा यांना भेटणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उदयनराजे भोसले भेटणार असल्याची माहिती. गेल्या दोन दिवसांपासून उदयनराजे भोसले राजधानी दिल्लीत. सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उदयनराजे भोसले इच्छुक

  • 23 Mar 2024 11:01 AM (IST)

    मी लोकसभा निवडणूक लढवणार

    मला तर लोकसभा निवडणूक लढायचीच आहे, असा निर्धार विजय शिवतारे यांनी पुन्हा बोलून दाखवला. महायुतीत आपल्याला जागा तर सुटणार नाही. त्यांना अडचण आहे म्हणून मी बाहेर पडतो. मी लोकसभेत विजयी होणार हे दैदिप्यमान यश असेल, असं विजय शिवतारे म्हणाले.

  • 23 Mar 2024 10:53 AM (IST)

    कल्याण लोकसभेत दिघे विरुद्ध शिंदे 'सामना'?

    ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने ठाणे आणि कल्याण या दोन लोकसभा मतदारसंघांकडे राज्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच कल्याण लोकसभेत मुख्यमंत्री यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आनंद दिघे यांचे पुतणे तथा ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. दिघे यांचा वारसदार थेट निवडणूक रिंगणातच उतरल्याने कल्याणच्या 'सुभेदारी'साठी दिघे विरुद्ध शिंदे असा ' सामना ' रंगण्याची शक्यता आता वर्तवली जाऊ लागली आहे.

  • 23 Mar 2024 10:45 AM (IST)

    सुनेत्रा पवार इंदापूर दौऱ्यावर

    सुनेत्रा पवार या आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. शेटफळगढे येथून सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. आज दिवसभर सुनेत्रा पवार या इंदापूर तालुक्यातील विविध गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.

  • 23 Mar 2024 10:32 AM (IST)

    सोने आणि चांदी झाले स्वस्त

    सोने आणि चांदीने गुरुवारी जोरदार मुसंडी मारली. दोन आठवड्याच्या ब्रेकनंतर गुरुवारी मौल्यवान धातूंनी हा विक्रम केला होता. त्यामुळे सोने 67,000 रुपयांच्या घरात तर किलोभर चांदीने 75,000 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. आता किंमती स्वस्त झाल्या आहेत.

  • 23 Mar 2024 10:21 AM (IST)

    पारा 37.6 अंशावर

    छत्रपती संभाजीनगर शहरातील कमाल तापमानात वाढ झाली. यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच तापमान 37° पेक्षा जास्त नोंदले गेले आहे. एकाच दिवसात तापमानात 2.2 अंशांनी वाढ झाली आहे. गुरुवारी शहरातील कमाल तापमान 35.5 अंश सेल्सिअस होते. तापमानात वाढ होत जाणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

  • 23 Mar 2024 10:12 AM (IST)

    तर टंचाईच्या झळा

    सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरणात आता 45% पाणीसाठा शिल्लक आहे.उन्हाची तीव्रता वाढत असून धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे धरणात 12.60 टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दनातील 5 टीएमसी पाणीसाठा हा कमी झाला आहे.तर सध्याची उन्हाची स्थिती अशीच राहिली,तर मे महिन्याच्या अखेरीस धरणातील पाणीसाठयात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.

  • 23 Mar 2024 10:01 AM (IST)

    केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर

    अरविंद केजरीवाल यांना बेकायदेशीर आणि बदल्याच्या भावना आणि घाबरून खोट्या केस मध्ये अटक केली हे सर्व जण जाणत आहेत विश्वगुरू देखील जाणतात, असा टोला खासदार संजय राऊत यांनी हाणला.

  • 23 Mar 2024 09:58 AM (IST)

    विद्यापीठात मारहाण करणं युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याला भोवलं

    विद्यापीठात मारहाण करणं युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याला भोवलं, चार जणांविरुद्ध चतुर्शिंगी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    324, 323 अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उबाठा गटाच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्याला मारहाण केली होती

  • 23 Mar 2024 09:41 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाला वाहली श्रद्धांजली

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाला वाहली श्रद्धांजली. यावेळी अजित पवार यांच्यासोबत दिलीप वळसे पाटील व शिवाजीराव आढळराव पाटील हेदेखील उपस्थित होते.

  • 23 Mar 2024 09:35 AM (IST)

    नाशिक पोलिसांनी 111 वाहनांच्या सायलेन्सरवर फिरवले रोडरोलर

    नाशिक पोलिसांनी 111 वाहनांच्या सायलेन्सरवर फिरवले रोडरोलर.  विशेष मोहीम राबवत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांचे सायलेन्सर जप्त केले. दुचाकींची तपासणी करून कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर पोलिसांनी ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दुचाकींवर कारवाई केली.

  • 23 Mar 2024 09:32 AM (IST)

    भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठक

    भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री हे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. जागावाटपाचा तिढा या बैठकीत सुटणार अशी चर्चा आहे.

  • 23 Mar 2024 09:21 AM (IST)

    नाशिक - स्थानिक विरुद्ध परप्रांतीय मोबाईल विक्रेत्यांच्या वादात मनसेची उडी

    नाशिक - स्थानिक विरुद्ध परप्रांतीय मोबाईल विक्रेत्यांच्या वादात मनसेची उडी,  मनसेच्या हस्तक्षेपानंतर मोबाईल मार्केट सुरळीत.

    परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मोबाईल ॲक्सेसरीजची होलसेल विक्री करावी तर स्थानिक व्यापाऱ्यांना मोबाईल रिपेरिंग करू द्यावे.   मोबाईल मार्केट बंद असल्याने जवळपास कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होते.

  • 23 Mar 2024 09:04 AM (IST)

    कोकणात तेरसे शिमगोत्सवाला उत्साहात सुरवात

    रत्नागिरी- कोकणात तेरसे शिमगोत्सवाला उत्साहात सुरूवात झाली आहे.  संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील वरदान देवीचा शिमगोत्सवाला देखील सुरवात. होळी भोवती पालखीच्या फेऱ्या घेवून पालखी घरोघरी फिरण्यास सुरवात.  कोकणात सर्वत्रच भक्तीमय वातावरण, लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिमग्यानंतरच होणार.

  • 23 Mar 2024 08:45 AM (IST)

    Live Update | शिवसेना शिंदे गटाचा आज अहमदनगर येथे संवाद मेळावा...

    खा.श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे, अहमदनगर भाजपचे लोकसभा उमेदवार सुजय विखेंची राहणार उपस्थिती... शहरातील माऊली सभागृहात सकाळी 11 वाजता होणार संवाद मेळावा...भाजप निवडणूक पूर्वतयारी बैठकीत महायुतीच्या इतर पक्षांचे मेळावे व्हावेत म्हणून झाली होती मागणी... स्थानिक पातळीवर मतभेद दूर करण्यासाठी मेळाव्याला महत्व... खा.श्रीकांत शिंदे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन...

  • 23 Mar 2024 08:35 AM (IST)

    Live Update | पुणे विद्यापीठात उबाठा गटाच्या युवासेनेची विद्यार्थ्याला मारहाण

    पुणे विद्यापीठात उबाठा गटाच्या युवासेनेची विद्यार्थ्याला मारहाण... व्हॉट्सऍप पोस्ट डिलीट केल्याच्या किरकोळ वादावरून विद्यार्थ्याला मारहाण... या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे... या प्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राम थरकुडे, वैभव दिघे, करण वाकवडे आणि इतर 6 जणांवर कारवाई करण्याची केली मागणी...

  • 23 Mar 2024 08:25 AM (IST)

    Live Update | मार्च महिन्यातच राज्यात पाणी संकट..

    राज्यातील एकूण धरणांपैकी 20 टक्के जलसाठे पूर्णपणे कोरडे ठाक... अठराहून अधिक धरणांमध्ये केवळ दहा टक्के पाणीसाठा शिल्लक... राज्यात एकूण 40.72 टक्के पाणीसाठा शिल्लक... गेल्या वर्षी याच तारखेला 55.45 टक्के होता पाणीसाठा... मागील वर्षीच्या तुलनेत 14.12 टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट... राज्यात पाण्याची स्थिती गंभीर

  • 23 Mar 2024 08:13 AM (IST)

    Live Update | सोलापुरातील आम आदमी पक्षाच्या 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

    अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनप्रकरणी गुन्हे दाखल... आपचे शहराध्यक्ष निहाल किरनल्ली, युवा आघाडी अध्यक्ष निलेश संगेपागसह इतर 12 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले... दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांना ईडीने अटक केल्यामुळे सोलापुरातील पूनम गेटवर आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं.

  • 23 Mar 2024 07:59 AM (IST)

    आपच्या 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

    सोलापुरातील आम आदमी पक्षाच्या 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपचे शहराध्यक्ष निहाल किरनल्ली, युवा आघाडी अध्यक्ष निलेश संगेपागसह इतर 12 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांना ईडीने अटक केल्यामुळे सोलापुरातील पूनम गेटवर आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने आचारसंहिता लागू असताना जमावबंदीचा भंग केल्याने गुन्हे दाखल करण्यात आले. सदर बझार पोलीस ठाण्यात कलम 37 आणि 135 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेत.

  • 23 Mar 2024 07:57 AM (IST)

    ठाकरे गटाच्या युवासेनेच्या विद्यार्थ्याला मारहाण

    पुणे विद्यापीठात ठाकरे गटाच्या युवासेनेची विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली आहे. व्हॉट्सऍप पोस्ट डिलीट केल्याच्या किरकोळ वादावरून विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राम थरकुडे, वैभव दिघे, करण वाकवडे आणि इतर ६ जणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • 23 Mar 2024 07:56 AM (IST)

    पुणे शहरात जड, अवजड वाहतूक बंदी

    पुणे शहरातून येणारी सर्व प्रकारची जड, अवजड वाहतूक यापुढे बंदी असणार आहे.  शहरातून सोलापूर, नगर, सातारा, मुंबई, नाशिक, सासवड, पौड, आळंदी या रस्त्यांवरून जाणारी जड वाहतूक बंद करण्यात आली आहे.  ट्रक आणि इतर वाहनांनी येताना आणि जाताना शहरामधील अन्य मार्ग वापरण्यास २३ मार्चपासून पूर्ण वेळ बंदी असेल. या वाहतूक मार्ग बदलाबाबतचे आदेश पुणे शहर पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांच्याकडून जारी करण्यात आला आहे.

  • 23 Mar 2024 07:54 AM (IST)

    शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अजित पवार गटात आज प्रवेश होणार

    शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.  अजित पवारांनी मुंबईत बोलावलेल्या बैठकीत प्रवेश करणार आहेत.  बैठकीला शिरूर लोकसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार उपस्थित राहणार आहेत. आढळराव पाटील यांनाही बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे.  आज सकाळी 10 वाजता मुंबईत देवगिरी बंगल्यावर बैठक होणार आहे.

Published On - Mar 23,2024 7:47 AM

Follow us
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.